⁠  ⁠

Current Affair 08 January 2019

Chetan Patil
By Chetan Patil 6 Min Read
6 Min Read

‘ग्रीन बुक’ला सर्वाधिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार

  • तिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात अनेक धक्कादायक निकाल लागले असून, ‘ग्रीन बुक’ या कालनाटय़ाधारित चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात उत्तम चित्रपट, संगीत व विनोद या तीन प्रवर्गात या चित्रपटाने बाजी मारली आहे.
  • राणी अ‍ॅनीच्या जीवनचरित्रावरील ‘बोहेमियन ऱ्हापसोडी’ चित्रपटाने उत्तम नाटय़प्रकारात ‘अ स्टार इज बॉर्न’ला मात दिली आहे. चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांच्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. अँडी सॅमबर्ग व सँड्रा ओह यांनी या हॉलिवूड पुरस्कार कार्यक्रमाचे संचालन केले.
  • ग्रीन बुकला उत्तम नाटय़, उत्तम सहायक अभिनेता (महेरशाला अली), उत्तम पटकथा (लेखक पीटर, फॅरेली, ब्रायन क्युरी व निकल व्हॅलेलोंगा) हे तीन पुरस्कार मिळाले. बोहेमियन ऱ्हापसोडीने उत्तम नाटय़ गटात (संगीत चरित्रपट), अ स्टार इज बॉर्न, ब्लॅक पँथर , इफ बिएल स्ट्रीट कुड टॉक, ब्लॅक्सान्समन यांना मागे टाकले. निर्माते
  • मुंबईत जन्मलेल्या ब्रिटिश रॉकर फ्रेडी मक्र्युरीची भूमिका त्याने केली होती.
  • गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते
    सर्वोत्कृष्ट चित्रपट (नाटय़)- बोरेमियन रापसोडी
    सर्वोत्कृष्ट चित्रपट ( संगीत व विनोद)- ग्रीन बुक
    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अल्फान्सो क्युरॉ- रोमा
    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाटय़)- ग्लेन क्लोज (दी वाईफ)
    सर्वोत्कृष्ट अभिनेता (नाटय़)- रामी मलेक (बोहेमियन रापसोडी)
    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सांगितिक व विनोदी) – ऑलिव्हिया कोलमन ( द फेव्हराइट)
    सर्वोत्कृष्ट अभिनेता (सांगितिक व विनोदी)-ख्रिस्तीयन बेल (व्हाइस)
    सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री- रेगिना किंग (इफ बिएल स्ट्रीट कुड टॉक)
    सर्वोत्कृष्ट सहअभिनेता-महेरशाला अली (ग्रीन बुक)
    सर्वोत्कृष्ट पटकथा- निक व्हॅलेलोंगा, ब्रायन क्युरी व पीटर फॅरेली (ग्रीन बुक)
    सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपट- स्पायडर मॅन- इनटू दी स्पायडर व्हर्स
    सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट- रोमा
    सर्वोत्कृष्ट मूळ संगीत- जस्टीन हुरवित्झ (फर्स्ट मॅन)
    सर्वोत्कृष्ट मूळ गीत- शॅलो (अ स्टार इज बॉर्न)
  • दूरचित्रवाणी मालिका
    नाटय़- द अमेरिकन्स एफएक्स
    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सँड्रा ओह (कििलग फाइव्ह)
    सर्वोत्कृष्ट अभिनेता- रिचर्ड मॅडेन (बॉडीगार्ड)
    सर्वोत्कृष्ट मालिका (सांगीतिक किंवा विनोदी)- दी कोमेन्स्कीर मेथड- नेटफ्लिक्स
    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सांगीतिक किंवा विनोदी)- राशेल ब्रॉसनहान (दी माव्‍‌र्हलस मिसेस मेसेल)
    सर्वोत्कृष्ट अभिनेता (सांगीतिक किंवा विनोदी)- मायकेल डग्लस (दी कोमेन्स्की मेथड)
    दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका- दी अ‍ॅसेसिनेशन ऑफ गियानी व्हेर्सेस अमेरिकन क्राइम स्टोरी- एफएक्स.
    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका)- पॅट्रिशिया अरक्वेट ( एस्केप अ‍ॅट डॅनेमोरा)
    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका)- डॅरेन क्रिस (दी अ‍ॅसेसिनेशन ऑफ गियानी व्हेर्सेस अमेरिकन क्राइम स्टोरी- एफएक्स.)
    सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री (दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका)- पॅट्रिशिया क्लार्कसन (शार्प ऑब्जेक्ट्स)
    सर्वोत्कृष्ट सहअभिनेता- बेन विशॉ (अ व्हेरी इंग्लिश स्कँडल)

बांगलादेशच्या पंतप्रधानपदी शेख हसिना यांचा शपथविधी

  • बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शेख हसिना यांनी सोमवारी चौथ्यांदा शपथ घेतली.
  • बंगभवन येथे झालेल्या समारंभात अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांनी ७१ वर्षांच्या हसिना यांना पदाची शपथ दिली. हसिना या चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या असून, सलग तीन वेळा या पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
  • सर्वप्रथम १९९६ साली आणि त्यानंतर २००८, २००९ व २०१४ साली त्यांनी पंतप्रधानपद भूषवले.

भारत-पाकची इच्छा असल्यास काश्मीरप्रश्नी मध्यस्थीला तयार;
नॉर्वेच्या पंतप्रधानांची ग्वाही

  • भारत आणि पाकिस्तानमधील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या काश्मीरप्रश्नावरुन नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग यांनी मोठे विधान केले आहे.
  • जर या दोन्ही देशांची संमती असेल तर काश्मीरप्रश्नी आम्ही मध्यस्थाची भुमिका निभावू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. सोलबर्ग या तीन दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. दरम्यान त्यांनी सोमवारी दिल्लीत बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
  • काश्मीरचा प्रश्न सोडवण्याची भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये क्षमता आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना कोणाही बाहेरच्या देशाच्या मदतीची गरज नाही.
  • दोन्ही देशांचा सर्वाधिक खर्च हा लष्करावर होतो. कारण तुमच्यात मैत्रीपूर्ण वातावरण नाही. तुमचा सर्वाधिक पैसा हा नागरिकांच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च व्हायला हवा, असे सोलबर्ग यांनी म्हटले आहे.

मेंदूरोगांवर उपचारासाठी यंत्र विकसित

  • मेंदूतील पेशींना विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून उद्दीपन देऊन रुग्णांना फेफरे व पार्किन्सन (कंपवात)यात उपचार करण्यासाठी बिनतारी यंत्र विकसित करण्यात आले असून ते ब्रेन पेसमेकर वॉण्ड या नावाने ओळखले जाईल.
  • हे यंत्र म्हणजे मेंदूउद्दीपक असून त्याचे काम मेंदूतील विद्युत घडामोडी तपासून काही वावगे आढळल्यास विद्युत उद्दीपन देणे हे आहे.
  • अमेरिकेत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यामुळे मेंदूरोगातील उपचारात बदल होणार आहेत.
  • मेंदूला धक्का किंवा इजा होण्यापूर्वीचे विद्युत संदेश त्यांची कंप्रता यात तपासली जाणार आहे. त्यानंतर किती विद्युत उद्दीपन गरजेचे आहे हे ठरवले जाईल
  • मेंदूच्या १२८ बिंदूवरील विद्युत सक्रियता व्ॉण्ड यंत्रात नोंदली जाते. इतर उपकरणांत केवळ आठ बिंदूवरील विद्युत संदेश टिपता येतात.

गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर यांना ‘पिफ डिस्टींग्विश्ड अ‍ॅवॉर्ड’

  • भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे (पिफ) यंदाचा पिफ डिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड ने गौरविण्यात येणार आहे.
  • प्रसिद्ध संगीतकार राम-लक्ष्मण यांना एस.डी.बर्मन इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

अहमदाबादेत उभं राहतंय जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान

  • अहमदाबाद शहरात जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान उभं राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद मधील या मैदानाला सरदार पटेल यांचं नाव देण्यात आलं असून, आसनक्षमतेच्या बाबतीत हे मैदान कोलकात्याचं इडन गार्डन्स आणि मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानालाही मागे सोडणार आहे.
  • या नवीन मैदानाती आसनक्षमता ही 1 लाख 10 हजारांच्या घरात असणार आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानाची आसनक्षमता सध्या 1 लाख आहे, तर कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानाची आसनक्षमता 80 हजारांच्या घरात आहे.
  • 63 एकर जमिनीवर या मैदानाचं बांधकाम सुरु असून यासाठी अंदाजे 700 कोटींचा खर्च येणार आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीला या मैदानाचं कंत्राट मिळालेलं आहे.
  • 1982 साली बांधण्यात आलेलं हे मैदान गुजरात क्रिकेट असोसिएशनने 2015 साली संपूर्णपणे तोडून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला.
Share This Article