अग्नि ५ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- भारताच्या अग्नि ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी येथील डॉ. अब्दुल कलाम बेटांवर सोमवारी यशस्वीरीत्या घेण्यात आली. त्याचा पल्ला पाच हजार किलोमीटरचा आहे. स्वदेशी बनावटीच्या अग्नि ५ क्षेपणास्त्राची ही सातवी चाचणी असून ते जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
- अग्नि ५ हे तीन टप्प्यांचे क्षेपणास्त्र असून १७ मीटर उंच व २ मीटर रुंद आहे. १.५ टन अण्वस्त्रे वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
- सामरिक दल कमांड तसेच संरक्षण संशोधन व विकास संस्था यांनी ही चाचणी केली. यात रडार, देखरेख उपकरणे, देखरेख स्थानके यांचा सहभाग होता.
- हे क्षेपणास्त्र जेव्हा पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते तेव्हा त्याचे घर्षण होऊन तापमान चार हजार अंश सेल्सियसपर्यंत वाढते पण त्याला स्वदेशी बनावटीचे उष्णतारोधक कवच असल्याने आतले तापमान पन्नास अंश सेल्सियसच्या खाली राहते.
- अग्नि ५ क्षेपणास्त्राच्या पहिल्या दोन चाचण्या २०१२ व २०१३ मध्ये घेण्यात आल्या होत्या. ३१ जानेवारी २०१५ रोजी तिसरी, २६ डिसेंबर २०१६ रोजी चौथी, तर या वर्षी अठरा जानेवारीला पाचवी चाचणी करण्यात आली. अखेरची चाचणी ३ जून २०१८ रोजी झाली होती.
- क्षेपणास्त्रांचा पल्ला –
- अग्नि १- ७०० कि.मी.
- अग्नि २- २००० कि.मी.
- अग्नि ३- २५०० कि.मी.
- अग्नि ४- ३५०० कि.मी.
- अग्नि ५-५००० कि.मी.
RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
- RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद सोडतो आहे असे उर्जित पटेल यांनी म्हटले आहे.
- २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्जित पटेल यांची नियुक्ती केली होती. आता वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी पद सोडल्याचे जाहीर केले असले तरीही हा मोदी सरकारसाठी झटका मानला जातो आहे.
- १९ नोव्हेंबरला एक बैठक पार पडली ज्यात आरबीआय आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी होते. या बैठकीनंतर उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातला वाद मिटला अशाही बातम्या समोर आल्या होत्या.
उपेंद्र कुशवाह यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
- राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे (आरएसएलपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी मानव संसाधन मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला
- सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपसोबत निवडणूक लढून कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या होत्या. सोमवारी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधानांच्या कार्यालयाला पाठवून दिला.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य
सुरजीत भल्ला यांचा राजीनामा
- पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सुरजीत भल्ला यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी राजीनामा दिला. आता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुरजीत यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून सुरजीत यांनी राजीनाम्याची माहिती दिली.
एनपीएसमध्ये सरकारी हिस्सा आता १४ टक्के
- राष्ट्रीय पेन्शन योजनेतील (एनपीएस) सरकारतर्फे दिला जाणारा १० टक्क्यांचा हिस्सा वाढवून १४ टक्क्यांवर करण्याच्या निर्णयावर सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्याचे अर्थ मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
- कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणारा किमान १० टक्क्यांचा हिस्सा कायम ठेवण्यात आला असून, तो प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० अन्वये सवलतप्राप्त असेल, असेही जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाचा लाभ देशभरातील १८ लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना होईल.
- एनपीएस म्हणजे काय ?
- नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे निवृत्तीनंतरचे बचत खाते होय. 1 जानेवारी 2004 साली भारत सरकारने याची सुरुवात केली आहे. सुरुवातीला केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच ही योजना होती. मात्र, 2009 नंतर या योजनेला खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही सुरू करण्यात आले. एनपीएस अकाऊंट उघडण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्षे तर जास्तीत जास्त 65 वर्षे ठेवण्यात आली आहे.