‘सुपरमॉम’ मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल
- नवी दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॉक्सर मेरी कोम हिने ४८ किलो वजनी गटात विजेतेपद मिळवले होते. या विजेतेपदाबरोबर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम तिने केला होता. त्यानंतर सुपरमॉम मेरी कोम हिने भारतीयांना अभिमान वाटावी अशी आणखी एक कामगिरी केली आहे.
- मेरी कोम हिने जागितक बॉक्सिंग क्रमवारीत (AIBA) अव्वल स्थान पटकावले आहे.
- राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा अशा दोनही स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले होते.
- याशिवाय, भारताच्या पिंकी जांगरा हिने ५१ किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर आशियाई खेळात रौप्य पदक मिळवणाऱ्या मनीषा मौन हिने ५४ किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर, सोनिया लाथर हिने ५७ किलो वजनी गटात दुसरे स्थान पटकावले आहे.
जीएसटी परिषद बैठक : ४० लाखांपर्यंतच्या उलाढालीवर जीएसटी
- जीएसटी परिषदेच्या बैठकीत ४० लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यवसायांवर आता जीएसटी लागू करण्यात येणार आहे. जीएसटी परिषदेची ही ३२ वी बैठक होती. निवडणुकांच्या तोंडावर छोट्या व्यापाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. व्यापाऱ्यांची जीएसटीची मर्यादा ४० लाखांपर्यंत करण्यात आली आहे. ही मर्यादा आधी २० लाखांपर्यंत होती आता ती वाढवण्यात आली आहे.
- छोट्या व्यावसायिकांना कॉम्पोझिशन स्किमचा फायदाही घेता येणार आहे. त्याची मर्यादा वाढवून आता दीड कोटी करण्यात आली आह. या योजनेत सहभागी असलेल्या आता दर तीन महिन्याला कर भरावा लागणार आहे. मात्र रिटर्न्स हे वर्षातून एकदाच भरावे लागतील.
- १ एप्रिल २०१९ पासून हा नवा नियम लागू होणार आहे. या नियमामुळे व्यापाऱ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र ५७ पदकांसह अग्रस्थानी
- खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करत एकूण १५ सुवर्ण, १९ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह ५७ पदकांची कमाई करीत आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्स आणि अॅथलेटिक्समध्ये घवघवीत यश मिळवले.
- महाराष्ट्राच्या सौरभ रावतने १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अॅथलेटिक्समध्ये शानदार कामगिरी केली. धैर्यशील गायकवाडने १७ वर्षांखालील गटात उंचउडीत रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या आधार दत्ताने १७ वर्षांखालील मुलांच्या उंचउडीत तर ताई बामणे हिने १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरे हिने राज्याला आणखी एक सोनेरी यश मिळवून दिले. तिने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीचे विजेतेपद पटकाविले.
- जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण, चार रौप्य व पाच कांस्यपदकांची लयलूट केली.
- महाराष्ट्राच्या प्रथम गुरवने १७ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलो गटात कांस्यपदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली.
- जलतरणात ती पाटील व ऋतुजा तळेगावकर यांनी रौप्यपदक तर साध्वी धुरीने एक रौप्य आणि एक कांस्य पटकावले.