जमाल खशोगींसह ४ पत्रकार ठरले यंदाचे ‘टाइम पर्सन ऑफ द इअर’
- अमेरिकेच्या प्रतिष्ठित टाइम मॅगेझीनने जगभरातील धाडसी पत्रकारांची यंदाच्या ‘पर्सन ऑफ द इअर’साठी निवड केली आहे. प्रतिष्ठित टाइम पर्सन ऑफ द इअर चा सन्मान यंदा चार पत्रकारांना आणि एका वर्तमानपत्राला संयुक्तरित्या देण्यात आला आहे.
- या सर्वांना या मासिकाने जगभरात हक्कांसाठी लढा देणाऱ्या असंख्य ठिकाणांचे प्रतिनिधी म्हणून संबोधले आहे. यामध्ये असे अनेक पत्रकार आहेत ज्यांची हत्या करण्यात आली आहे. तर काहींना आपल्या कामासाठी शिक्षा आणि त्रास सहन करावा लागला आहे.
तेलंगणच्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी के. चंद्रशेखरराव
- तेलंगण विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेल्या तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
- तेलंगण राज्याच्या स्थापनेनंतर राव सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. राज भवनमध्ये झालेल्या सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली.
- तेलंगणमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्तेत वापसी करणाऱ्या तेलंगण राष्ट्र समितीच्या खात्यात राज्यातील एकूण मतांपैकी ४६.९ टक्के मते पडली.
- राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसनं राज्यात ८८ जागांवर विजय मिळवला आहे.
कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
- मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. गुरूवारी रात्री उशीरा काँग्रेसने ट्विटरद्वारे कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. शनिवारी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
- मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री कोण?, हा प्रश्न गेल्या दोन दिवसांपासून कळीचा ठरला होता. अखेर मध्य प्रदेशची धुरा कमलनाथ यांच्याकडे असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नेपाळमध्येही नोटाबंदी
- काठमांडू- भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळनंहीनोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत सरकारनं नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत नेपाळनं 100 रुपयांहून अधिक मूल्यांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला असून, त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत.
- नेपाळ सरकारनं लोकांना आवाहन केलं आहे की, 100 रुपयांहून अधिक मूल्याचे म्हणजेच 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोट बाळगू नका. नेपाळमध्ये आता फक्त 100 रुपयांच्या नोटच चलनात आहेत.
- या समस्येमुळेच नेपाळनं भारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवरच बंदी घातली आहे. भारतीय चलन हे नेपाळमध्येही वापरलं जातं.
राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन
- राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 76व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होते.
- बोंगीरवार हे 1966 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी सरकारच्या विविध खात्यांमध्ये आयएएस अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
- तसेच त्यांनी महाराष्ट्रातील 25 वे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. 1999मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.