‘टॉक्सिक’ हा ऑक्स्फर्डच्या मते २०१८चा प्रातिनिधिक शब्द!
- जगप्रतिष्ठित ऑक्स्फर्ड शब्दकोशाने २०१८चा ‘वार्षिक शब्द’ म्हणून ‘टॉक्सिक’ या शब्दाची निवड केली आहे. जो शब्द त्या वर्षांतील समाजवास्तवाचे प्रतिनिधित्व करतो त्याची निवड दरवर्षी ऑक्स्फर्ड दरवर्षी ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून करते.
- या वर्षी अनेक शहरांतले वातावरण प्रदूषणाने विषारी होते, राजकीय क्षेत्रही विषारी वक्तव्यांनी दूषित होते आणि ‘मीटू’सारख्या मोहिमेनेही विषारी पौरुषाचा प्रथमच उल्लेख केला. त्यामुळे हा शब्द या वर्षभरात विविध संदर्भात सातत्याने वापरात आल्याने त्याची निवड झाली.
- ‘गॅसलाइटनिंग’, ‘इन्सेल’, ‘टेकलॅश’ आणि ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ हे शब्द निवड समितीसमोर अंतिम फेरीत आले होते. जगभर खळबळ उडवून दिलेल्या ‘मी टू’ मोहिमेने ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ अर्थात विषारी पौरूष हा शब्द जन्माला घातला होता आणि तो सर्वाधिक प्रचलितही झाला. त्यामुळे या शब्दावर सर्वाचेच एकमत झाले. मात्र त्याचवेळी ‘टॉक्सिक’ हा शब्दच या वर्षांत कितीतरी संदर्भात वापरला गेल्याचा मुद्दा पुढे आला.
पृथ्वीच्या आणखी एका शेजाऱ्याचा शोध
- खगोल शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या नव्या शेजाऱ्याचा शोध लावला आहे. हा नवा ग्रह पृथ्वीपासून अवघी सहा प्रकाश वर्षे दूर आहे. तो सूर्यमालेबाहेर असला तरी सूर्याच्या कक्षेजवळ आहे.
- या ग्रहाला बर्नार्ड स्टार बी या नावाने संबोधले जाते. तो पृथ्वीपासून जवळ असलेला दुसरा ग्रह आहे. त्याच्याविषयी माहिती देताना ‘इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस स्टडिज ऑफ कॅटालोनिया अॅण्ड स्पेन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स’च्या इग्नासी रिबास म्हणाले की हा ग्रह आपला शेजारी आहे. त्यावर जीवसृष्टीची शक्यता नाही. तेथे वायू किंवा पाणी घनरूपात आहे.
- खगोल शास्त्रज्ञांनी १९९५मध्ये या ग्रहाविषयी संशोधन सुरू केले होते. त्याचा अभ्यास करण्यासाठी ५० संशोधक आणि २५ खगोल शास्त्रज्ञांच्या चमूने २० वर्षे संशोधन केले. विविध देशांतील दुर्बीणींनी घेतलेल्या छायाचित्रांनंतर या ग्रहाची गुपिते उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
- ग्रहाची वैशिष्टय़े –
- या ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा ३.२ पटीने जास्त
- त्याला त्याच्या सूर्याकडून पृथ्वीपेक्षा दोन टक्के कमी ऊर्जा मिळते
- या ग्रहाचे तापमान वजा १७० अंश सेल्सिअसच्या आसपास
- त्यावर जीवसृष्टी असणे अशक्य
- थंड वातावरणामुळे सर्वत्र बर्फाचा मोठा थर
- बर्फाच्या थराखाली पाणी असल्याचा संशोधकांचा अंदाज
- या ग्रहाला त्याच्या सूर्याभोवती फिरण्यास २३३ दिवस लागतात
‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’
- महाराष्ट्रासाठी जवळपास दोन हजार पाचशे कोटींच्या एकूण १०९ अन्न प्रक्रिया उद्योग प्रकल्पांना केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यातून दहा हजार कोटींची गुंतवणूक व रोजगार निर्मिती होईल, असे मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी व्यक्त केले.
- महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योग वाढतो आहे. महाराष्ट्रात केंद्र शासनाने सातारा, औरंगाबाद आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर ५३ शीतगृहे, १८ अन्न तपासणी प्रयोगशाळा, आठ मिनी फूड पार्क, ११ बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे.
- फूड पार्कची वैशिष्टय़े –
- भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेअंतर्गत प्रकल्प.
- नाथ ग्रुप फूड पार्कचे मुख्य प्रवर्तक.
- जवळपास ५०० शेतकरी प्रत्यक्षपणे जोडले जाणार.
- ५०० एकरावर मका पिकाची तंत्रशुद्ध लागवड.
लिव्ह-इनः महिलेला पोटगीचा अधिकार
- लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेली महिला आपल्या जोडीदाराकडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत पोटगी मागू शकते, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.केवळ शारीरिक, मानसिक नव्हे तर आर्थिक प्रकरणातही महिलेचा छळ केल्याप्रकरणी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलादेखील पोटगी मागू शकतात
- सदर महिलेचा विवाह झाला नसला, तरी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. घरगुती हिंसाचारामध्ये आर्थिक प्रकरणांचाही समावेश आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.