भारत अमेरिकेकडून घेणार संरक्षण सामग्री
- भारताने अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध बळकट करण्यावर भर दिला आहे. भारत दरवर्षी अमेरिकेकडून पाच अब्ज डॉलर्सचे तेल, गॅस विकत घेण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच १८ अब्ज डॉलर्सची संरक्षण सामग्रीही विकत घेणार आहे.
- अमेरिकेकडून भारतात होणाऱ्या निर्यातीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे असे अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी अमेरिकेतील उद्योजकांसमोर बोलताना सांगितले. मागच्या दोन वर्षात भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारामध्ये ११९ अब्ज डॉलर्सवरुन १४० अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.
- तेल आणि गॅस क्षेत्राचा विचार केल्यास भारत अमेरिकेकडून दरवर्षी पाच अब्ज डॉलर्सची खरेदी करण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतीय हवाई कंपन्यांनी ३०० विमानांसाठी ४० अब्ज डॉलर्सची ऑर्डर दिल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत असलेले २ लाख २७ हजार विद्यार्थी अमेरिकेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ६.५ अब्ज डॉलर्सचा हातभार लावत आहेत.
Windows 7 चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा
- विंडोज 7 चे कम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत. प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ (Windows 7) चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे.
- पुढील वर्षी 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. म्हणजे याचे अपडेट्स मिळणार नाहीत. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे.
- पुढील वर्षी 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. म्हणजे याचे अपडेट्स मिळणार नाहीत. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे.
- आता कंपनी Windows 7 Extended Security Updates विकणार आहे यासाठी पैसे मोजावे लागतील. कारण इंटरप्राइजेस युजर्स अनेक वर्षांपासून विंडोज 7 चा वापर करत आहेत, त्यामुळे याचा वापर एकदम बंद करणं त्यांच्यासाठी कठीण आहे.
- यापूर्वी मायक्रोसॉफ्टने Windows XP आणि Vista चाही सपोर्ट बंद केला आहे.
मुकेश अंबानींचा ग्लोबल थिंकर्समध्ये समावेश
- फॉरेन पॉलिसी या अमेरिकी प्रकाशनगृहातर्फे दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या टॉप ग्लोबल थिंकर्स या सूचीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजच्या मुकेश अंबानी यांचा समावेश करण्यात आला आहे.
- या प्रकाशनगृहातर्फे शंभर जणांची सूची प्रसिद्ध करण्यात येते. यातील प्रमुख नावांची घोषणा करण्यात आली. उर्वरित नावे २२ जानेवारीला घोषित होतील.
- या सूचीमध्ये अंबानी यांच्यासह अलीबाबाचे संस्थापक जॅक मा, अॅमेझॉनलचे सीईओ जेफ बेझोस, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ख्रिस्टाइन लॅगार्ड यांचाही समावेश आहे.
- ‘४४.३ अब्ज अमेरिकी डॉलरची व्यावसायिक उलाढाल असणाऱ्या अंबानी यांनी गेल्या वर्षी जॅक मा यांना मागे टाकले. इंधन, वायू व रिटेल व्यवसायात त्यांच्या कंपनीने मोठी झेप घेतली आहे.
विहिंपचे माजी प्रमुख विष्णु हरी दालमिया यांचं निधन
- रामजन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख नेते आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णु हरी दालमिया यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ९१ वर्षीय दालमियांनी अखेरचा श्वास घेतला.
- द्योगपती असलेल्या दालमिया यांनी रामजन्मभूमी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. श्रीकृष्ण मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. १९९२ मध्ये वादग्रस्त बाबरी मशीद कोसळल्यानंतर दोनच दिवसांत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत दालमिया यांनाही अटक करण्यात आली होती.