किलोग्रॅमची विद्युतप्रवाहावर आधारित नवी व्याख्या:
- एक किलोग्रॅम वजन मोजण्याची आजवरची पद्धत रद्द करून किलोग्रॅमची विद्युतप्रवाहावर आधारित नवी व्याख्या करण्यास जगभरातील शास्त्रज्ञांनी फ्रान्समधील व्हर्साय येथे पार पडलेल्या वजने आणि मापेविषयक परिषदेत मंजुरी दिली.
- अतिसूक्ष्म किंवा खूप जास्त वजने मोजताना या नव्या व्याख्येचा फायदा होणार आहे. मात्र त्याने जगभरच्या बाजारांत आणि दैनंदिन व्यवहारांत वापरल्या जाणाऱ्या एक किलोच्या वजनावर काही परिणाम होणार नाही. आजवर आपण एक किलोचे जे वजन वापरत आलो आहोत ते 1889 साली फ्रान्समध्ये निश्चित करण्यात आले होते.
- पॅरिसजवळील एका तिजोरीत हा एक किलोचा मूळ प्लॅटिनम आणि इरिडियम या धातूंच्या मिश्रणातून बनवलेला दंडगोल जतन करून ठेवला आहे. त्याला ग्रँड के असे म्हणतात. त्याच्या सहा प्रतिकृतीही तेथेच आहेत. त्याबरहुकूम सर्व देशांनी आपापली एक किलोची वजने तयार केली आहेत. काही वर्षांनी सर्व देशांना आपापली एक किलोची वजने त्या मूळ एक किलोच्या वजनाशी जुळवून तपासण्यासाठी पाठवावी लागतात. तर शास्त्रज्ञांच्या मते देशोदेशींच्या वजनांत थोडाफार फरक पडू शकतो. तसेच फ्रान्समधील मूळ किलोच्या दंडगोलातही अनेक वर्षांत अल्पसा बदल होऊ शकतो.
भारतातील साखर अनुदानाला ऑस्ट्रेलियाचा आक्षेप:
- जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असलेल्या भारतात साखर उद्योगाला दिल्या जात असलेल्या अनुदानांबद्दल जागतिक व्यापार संघटनेकडे (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूटीओ) कायदेशीर कारवाईसाठी दाद मागत असल्याचे ऑस्ट्रेलियाने जाहीर केले.
- भारतातील अनुदानांमुळे जागतिक पातळीवर साखरेचे भाव मोठय़ा प्रमाणावर उतरत असून त्यामुळे ऑस्ट्रेलियातील ऊस उत्पादकांना फटका बसल्याचे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे. Sugar
- जागतिक व्यापार संघटनेच्या नियमावलीत परवानगी दिलेल्या शेतकरी साह्य़ाच्या मर्यादेपेक्षा भारतातील साखर उद्योगाची अनुदाने कितीतरी जास्त आहेत. त्यामुळे यंदा भारतातील ऊस उत्पादन सरासरी 20 दशलक्ष टनांवरून 35 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचल्याचा दावा ऑस्ट्रेलियाने केला आहे.
मिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू:
- मिताली राजने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 2283 धावा केल्या आहेत. भारताकडून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा मितालीच्या नावावर आहे.
- मिताली राजने यावेळी रोहित शर्मा (2207) आणि विराट कोहली (2102) यांना पिछाडीवर टाकले आहे. तसेच मितालीनंतर भारताची ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर 1827 धावा आहेत.