⁠  ⁠

Current Affair 18 January 2019

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

भारतीय-अमेरिकींची उच्च पदांवर निवड

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन भारतीय-अमेरिकींची प्रशासनामध्ये उच्चपदांवर नियुक्ती केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. रिटा बरनवाल, आदित्य बामझाय आणि विमल पटेल अशी तिघांची नावे आहेत.
  • रिटा यांची ऊर्जा (अणू) सहसचिवपदावर, आदित्य यांची ‘प्रायव्हसी अँड सिव्हिल लिबर्टीज ओव्हरसाइट बोर्ड’चे सदस्य म्हणून आणि विमल यांची खजिनदार विभागातील सहसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. या तिघांच्या नियुक्तीमुळे ट्रम्प प्रशासनातील भारतीय-अमेरिकींचे प्रमाण तीन डझनाहून अधिक झाले आहे.
  • ट्रम्प प्रशासनामध्ये नियुक्त झालेल्या कॅबिनेट स्तरावरील पहिल्या भारतीय अमेरिकी निकी हॅले आणि पहिले माध्यम उपसचिव राज शाह आता प्रशासनामधून बाहेर पडले आहेत. रिटा या ‘गेटवे फॉर अॅक्सिलरेटेड इनोलव्होशन इन न्युक्लिअर इनिशिएटिव्ह’च्या संचालक पदावर काम करतील.
  • यापूर्वी त्यांनी वेस्टिंगहाउस येथे ‘टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड अॅप्लिकेशन’च्या संचालक म्हणून आणि बक्टेल बेटिस येथे मटेरियल टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. बामझाय प्रशासन, कायदा, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, कम्प्युटरमधील गुन्हे यावर लेखन आणि अध्यापन करतात.

इस्त्रोने सॅटेलाईटशी जोडले रेल्वे इंजिन

  • रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांना आता रेल्वेच्या स्थितीची माहिती सहज आणि अचूक मिळणार आहे. रेल्वेने आपले इंजिन इस्त्रोच्या उपग्रहाशी जोडले आहेत. त्यामुळे उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे आगमन आणि प्रस्थानांची माहिती नोंदवणे सोपे जाणार आहे. यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसेल.
  • रेल्वेच्या आगमन, प्रस्थानाची माहिती मिळणे आणि कंट्रोल चार्ट नोंदवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) उपग्रहावर आधारित रिअल टाइम ट्रेन इन्फर्मेशन सिस्टिमचा (आरटीआयएस) वापर सुरू करण्यात आला आहे.
  • ही प्रणाली 8 जानेवारीला माता वैष्णोदेवी-कटरा वांद्रे टर्मिनस, नवी दिल्ली- पाटणा, नवी दिल्ली-अमृतसर आणि दिल्ली-जम्मू मार्गावरील काही मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेत अंमलात आली आहे.
  • नव्या प्रणालीमुळे रेल्वेला आपल्या नेटवर्कमध्ये रेल्वेच्या संचालनासाठी नियंत्रण तसेच रेल्वे नेटवर्कला आधुनिक करण्यासाठी मदत मिळेल.
  • इंजिनमध्ये आरटीआयएसयुक्त इस्त्रो व्दारा विकसित गगन जियो पोजिशनिंग सिस्टिमचा वापर केला जात आहे. यामुळे रेल्वेचा वेग आणि स्थितीबाबत माहिती मिळू शकते.

कांदळवन क्षेत्रातील भरीव वाढीची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद

  • लोकसहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याची प्रचिती वनखात्याने कांदळवन क्षेत्रातील कामाद्वारे दिली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने याची दखल घेत या कामावर उत्कृष्टतेची मोहोर उमटवली असून कांदळवन क्षेत्रात भरीव वाढ करणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
  • यापूर्वी २०१६ मध्ये दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प दोन कोटी ८२ लाख वृक्ष लावून पूर्णत्वास नेण्यात आला होता. ज्याची नोंद लिम्का बुकमध्ये पहिल्यांदा घेतली गेली.
  • कांदळवन कक्षाने ‘स्वच्छ कांदळवन अभियानाची’ अंमलबजावणी २०१५ मध्ये सुरु केली. या अंतर्गत मुंबई, नवी मुंबई, बांद्रा, वर्सोवा, दहिसर, शिवडी, ऐरोली, भांडूप, गोराई, वाशी अशा विविध ठिकाणच्या कांदळवनाची स्वच्छता करण्यात आली.

Google Play वरून अॅप डाउनलोड करण्यात भारतीय अव्वल


वर्ष २०१८मध्ये भारताने जगात Google Play स्टोरमधून डाउनलोड करण्यात अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षी भारतीयांनी गुगल प्ले स्टोरमधून सर्वाधिक अँड्रॉइड अॅप्स डाउनलोड केले आहेत.
ही गोष्ट अॅप अॅनालिटिक्स फर्म ‘अॅप अॅनी(App Annie) की द स्टेट ऑफ मोबाइल इन २०१९’ च्या अहवालात स्पष्ट झाली आहे. गुगल प्ले स्टोरमधून अॅप डाउनलोड करण्याच्या बाबतीत ब्राझील आणि अमेरिका अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

खो-खोमध्ये महाराष्ट्राला दुहेरी सुवर्णपदके

  • पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले. खो-खो क्रीडा प्रकारात १७ वर्षांखालील मुले व मुली अशा दोन्ही गटांत महाराष्ट्राने विजेतेपद मिळवले. त्याशिवाय टेनिस, बॉक्सिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.
  • खो-खो क्रीडा प्रकारात मक्तेदारी गाजवणाऱ्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे १७ वर्षांखालील (कुमार) मुले व मुली या दोन्ही विभागांत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अलाहिदा डावानंतर दिल्लीचे आव्हान १९-१७ असे परतवले, तर मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर १९-८ असा एकतर्फी विजय नोंदवला.

aayushman bharat: गेट्स यांच्याकडून ‘आयुष्मान’चे कौतुक

  • जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेची भुरळ पडली आहे. योजनेच्या सादरीकरणानंतर केवळ १०० दिवसांतच सहा लाखांहून अधिक रुग्णांनी फायदा घेतल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. योजनेच्या यशस्वी नियोजनाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.
  • केंद्र सरकारने २०१८च्या अर्थसंकल्पात ‘आयुष्मान भारत’ योजनेची घोषणा केली होती. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने चाल‌विण्यात येणाऱ्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबरला लोकार्पण केले होते.
Share This Article