‘व्हिलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर
- ऑस्करसाठी भारताचे अधिकृत नामांकन असलेला ‘व्हिलेज रॉकस्टार्स‘ हा चित्रपट स्पर्धेतून बाद झाला असून, 91व्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्याचे नामांकन उत्कृष्ट परदेशी चित्रपट गटात झाले होते. आता हा चित्रपट बाद झाला असून 87 पैकी केवळ नऊ चित्रपट पुढील फेरीत पोहोचले आहेत.
- ‘व्हिलेज रॉकस्टार्स‘ चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा दास यांनी केले असून, तो आसामी चित्रपट आहे. खेडय़ातील मुलांच्या चमूला रॉकस्टार बनण्याचे स्वप्न असते असे त्याचे कथानक आहे. दास यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे, की ऑस्करचे स्वप्न भंगले असले तरी या अविश्वसनीय प्रवासासाठी मी सर्वाची ऋणी आहे. प्रत्येक पावलावर तुम्ही माझ्यासमवेत होतात. ऑस्करचे स्वप्न भंगले असले तरी स्वप्ने पाहण्यावरची आमची श्रद्धा कायम राहील.
- तसेच आतापर्यंत परदेशी चित्रपट गटात आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान‘ चित्रपट 2001 मध्ये अखेरच्या पाच चित्रपटांत होता. मदर इंडिया (1958), सलाम बॉम्बे (1989) हे दोन भारतीय चित्रपट पहिल्या
- पाचात होते.
- ऑस्कर विजेते अल्फान्सो क्युरॉ यांचा ‘रोमा‘ हा चित्रपट अखेरच्या आठात आहे. त्याला पावेल पावलिकोवस्की यांच्या ‘कोल्ड वॉर’ चित्रपटाचे कडवे आव्हान असणार आहे. त्यांना 2013 मध्ये ‘इडा’ या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाले होते.
- जपानचा ‘शॉप लिफ्टर्स’ ही शर्यतीत आहे. बर्ड्स ऑफ पॅसेज (कोलंबिया), दी गिल्टी (डेन्मार्क), नेव्हर लुक अवे (जर्मनी), अयाका (कझाकिस्तान), बर्निग (दक्षिण कोरिया) हे चित्रपट स्पर्धेत आहेत. 24 फेब्रुवारीला 91वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉसएंजल्स येथील डॉल्बी थिएटर्स येथे होणार आहे.
इस्रो आज लाँच करणार जीसॅट-7ए उपग्रह
- इस्त्रोने मंगळवारी आपल्या संचार उपग्रह जीसॅट-7 ला लाँच करणार असल्याच काऊंटडाऊन सुरू केला आहे. श्रीहरिकोटात असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून मंगळवारी याच काऊंटडाऊन सुरू झालं.
- संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी जीएसएलवी-एफ 11 रॉकेटला घेऊन लाँच केलं जाणार आहे. इस्त्रोद्वारे निर्मित जीसॅट-7ए चे वजन 2,250 किलोग्रॅम आहे.
- हे मिशन आता आठ वर्षांच झालं आहे. इस्त्रोने मंगळवारी सांगितलं की, मिशन रेडिनेस रिव्ह्यू कमेटी आणि लाँच ऑथरायझेशन बोर्डने काऊंटडाऊन सुरू केलं आहे.
- जीएसएलवी-एफ 11 ची हे 13 वे प्रक्षेपण आहे. सातव्यांदा हे स्वदेशी क्रायोनिक इंजिनसोबत लाँच होणार आहे. याद्वारे कू-बँडच्या संचारला उपलब्ध करून देणार आहे.
- इस्त्रोचं हे 39 वं संचार उपग्रह असून याला खासकरून भारतीय वायुसेनेला उत्तम संचार सेवा देण्याच्या उद्देशाने लाँच केलं आहे.
- या प्रक्षेपणाला जवळपास 500-800 करोड रुपये लागले आहेत. वायुसेनाला पुढच्या काही वर्षांमध्ये आणखी एक उपग्रह जीसॅट -7 सी मिळण्याची आशा आहे. ज्यामुळे नेटवर्कद्वारे त्याच्या ऑपरेशन्सच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.
- जीसॅट – 7 ए च्या अगोदर इस्त्रोने 29 सप्टेंबर 2013 मध्ये जीसॅट – 7 ला देखील लाँच केलं. जे ‘रूक्मिणी’ नावाने ओळखले जाते. हे उपग्रह भारतीय नौसेने करता होते.
सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत बदल
- मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता केंद्राने डिसेंबर 2014 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली.
- मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेचाही ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला. सुकन्या समृद्धी योजना
- तर केंद्र सरकारने या योजनेमध्ये आणखी सुधारणा करून नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सरकारने या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 8.5 टक्के केले आहे.
- 1 ऑक्टोबरपासून नवे व्याजदर लागू झाले असून, आपल्याला या व्याजदरामुळे मोठा फायदा मिळू शकतो. काही दिवसांपूर्वीच सराकरने या योजनेत बदल केले आहेत. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत आपण फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडू शकतो. ज्यासाठी पहिल्यांदा 1000 रुपये मोजावे लागत होते.
- तसेच आपल्यालाही जर मुलगी असेल तर केंद्राची ही योजना भरपूर फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे सदर खाते भारतात कुठेही एका डाकघरातून दुसऱ्या डाकघरात स्थानांतरित करण्यात येते. या योजनेत पालकाला समाविष्ट होण्यासाठी कुठलीही अट ठेवण्यात आली नाही.
मेसीला पाचव्यांदा विक्रमी ‘गोल्डन शू’
- मागील हंगामात युरोपमधील सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम करणाऱ्या फुटबॉलपटू लिओनेल मेसीने विक्रमी पाचव्यांदा ‘गोल्डन शू’ पुरस्कारावर नाव कोरले.
- आक्रमणपटू मेसीने बार्सिलोनासाठी ६८ सामन्यांत ३४ गोल नोंदवले.
- लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह आणि टॉटेनहॅमच्या हॅरी केनला मागे टाकून मेसीने हा पुरस्कार पटकावला.
- आतापर्यंत चार वेळा हा पुरस्कार जिंकणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदसाठी ५२ सामन्यांत २६ गोल झळकावले आहेत.
महिलांसाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना
- देशामध्ये महिलांच्या अधिकारावर सगळेच पक्ष बोलत असतात. मात्र, निवडणुकीमध्ये तिकिट देताना महिलांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येते. ही अडचण ओळखून दिल्लीमध्ये केवळ महिलांसाठीच एक वेगळा पक्ष स्थापन करण्यात आला. या पक्षाचे नाव राष्ट्रीय महिला पार्टी असे आहे. या पक्षाची स्थापना एका 36 वर्षीय डॉक्टरने केली आहे.
- राष्ट्रीय महिला पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्वेता शेट्टी या आहेत
- 2019 मध्ये लोकसभा निवडणुकाही लढविण्यात येणार असून राजकीय क्षेत्रातील पुरुषांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महिलांचा पक्ष असणे गरजेचे आहे. वंचित महिलांना प्रतिनिधित्व मिळायला हवे.