‘मुंबई हायकोर्ट’ नावासाठी विधेयक
- सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिश आमदानीत स्थापन झालेल्या बॉम्बे, कलकत्ता व मद्रास या तीन सर्वात जुन्या उच्च न्यायालयांची नावे शहरांच्या बदललेल्या नावानुरूप बदलण्यासाठीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.
- या उच्च न्यायालायंची नावे अनुक्रमे मुंबई, कोलकाता व चेन्नई अशी बदलण्यासाठी याआधी जुलै २०१६ मध्ये लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र तमिळनाडू, कोलकातासाठी आता सुधारित विधेयक मांडावे लागणार आहे.
झिका विषाणूवरील देशी लसीच्या लवकरच चाचण्या
- झिका विषाणूवरील देशी लसीच्या चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (दी इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च-आयसीएमआर) लवकरच केल्या जातील. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये या विषाणूने बाधित झालेल्या व्यक्ती आढळल्या आहेत.
- हैदराबाद येथील भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. या लसीमुळे झिका विषाणूच्या आशियाई आणि आफ्रिकी या दोन्ही प्रकारांपासून होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण होईल, असा या कंपनीचा दावा आहे. या कंपनीने सुमारे दोन वर्षांपूर्वी ही लस तयार केली होती. त्या वेळी भारतात झिकाची लागण झालेली नव्हती.
- झिका विषाणूचा वाहक असलेल्या एडिस प्रजातीच्या डासापासून मुख्यत्वे झिकाचा प्रसार होतो. सध्या काही राज्यांत त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तो रोखण्यासाठी डास-कीटक नियंत्रण हे मोठेच आव्हान असते.
अमेरिकेकडून सबमरीन भेदी हेलिकॉप्टर खरेदी करणार भारत
- भारत अमेरिकेकडून 24 अँटी सबमरीन हेलिकॉप्टर ‘रोमियो’ खरेदी करणार आहे. या हेलिकॉप्टरची किंमत 2 बिलियन अमेरिकी डॉलर सांगितली जातेय. भारताला गेल्या 10 वर्षांपासून अँटी सबमरीन हेलिकॉप्टरची गजर आहे.
- अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली होती. भारतानं अमेरिकेच्या या हेलिकॉप्टर्ससाठी एक पत्र लिहिलं आहे, ज्यात 24 हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे.
- अर्जेटिंनामध्ये जी-20 समीटमध्ये मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीपूर्वीच पेंस आणि मोदींची झालेली भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
लक्ष्य सेनला कांस्यपदकावर समाधान
- भारताचा आघाडीची ज्युनिअर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला कॅनडात सुरु असलेल्या World Junior Badminton Championship स्पर्धेत अखेर कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.
- उपांत्य फेरीत लक्ष्यला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या कुनलावत वितीद्सरनकडून पराभव पत्करावा लागला. 1 तास 11 मिनीटं चाललेल्या या सामन्यात कुनलावतने 20-22, 21-16, 21-13 अशा 3 गेममध्ये बाजी मारली.
मराठा आरक्षण १६ टक्के
- अन्य कोणत्याही प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
- राज्य मागसवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. या अहवालात आयोगाने तीन शिफारसी केल्या आहेत. मराठा समाजास सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणून जाहीर केले आहे.
- मराठा सामाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून घोषित केल्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम १५(४ ) व १६(४) मधील तरतुदीनुसार हा समाज आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी पात्र ठरला आहे.