सुप्रसिद्ध हिंदी लेखक, साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन
- प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन झालं. मृत्युसमयी ते 92 वर्षांचे होते.
- नामवर सिंह यांनी डझनांहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. कविताचे नवीन प्रतिमान(1968), छायावाद(1955), दुसरी परंपरा की खोज(1982) या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या.
- इतिहास आणि आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), वाद विवाद आणि संवाद(1989) यांसारख्या कादंबऱ्यासुद्धा त्यांनी लिहिल्या. नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927ला वाराणसीतल्या एका छोट्याशा खेडेगावात झाला. त्यानंतर कौशल्याच्या जोरावर हिंदी साहित्यमध्ये पीएचडी मिळवली. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
- 1959मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.
झरीन, मीनाकुमारीला सुवर्णपदक
- भारताची माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन आणि मीनाकुमारी देवी यांनी सोफिया (बल्गेरिया) येथे सुरू असलेल्या स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील भारतीय महिलांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
- राष्ट्रीय विजेती झरीनने महिलांच्या ५१ किलो गटाच्या अंतिम फेरीत फिलिपिनोच्या इरिश मॅग्नोवर ५-० अशी मात केली
- यानंतर महिलांच्या ५४ किलो गटात मीनाकुमारी देवीने फिलिपिन्सच्या एरा व्हिलगसवर ३-२ असा विजय मिळवला. देवीने मागील वर्षी या स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले होते. यापूर्वीच या स्पर्धेतील भारतीय महिलांची सर्वोत्तम कामगिरी ही गेल्या वर्षीची होती. गेल्या वर्षी मेरी कोमने (४८किलो) रौप्यपदक मिळवले होते. महिलांच्या ४८ किलो गटात मंजू राणीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम फेरीत फिलिपिनोच्या जोसीए गाबुकोकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला.
जोकोव्हिचला चौथ्यांदा लॉरेओ पुरस्कार!
- गतवर्षांत प्रतिष्ठित चार ग्रँडस्लॅमपैकी दोन स्पर्धाचे विजेतेपद मिळवणारा सर्बियाचा नामांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याने चौथ्यांदा लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारावर नाव कोरले. वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याव्यतिरिक्त जिम्नॅस्टिक खेळाडू सिमोन बाइल्स, गोल्फपटू टायगर वूड्स व फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्स संघानेसुद्धा मानाचे पुरस्कार पटकावले.
- २०१८मध्ये जोकोव्हिचने विम्बल्डन व अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
- या पुरस्कारासाठी २०१८ या वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्याशिवाय ६८ खेळाडूंना या पुरस्कारांसाठी नामांकन लाभले होते. महिलांमध्ये सिमोनने वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. २०१७मध्येसुद्धा सिमोनने या पुरस्कारावर नाव कोरले होते. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षीच सिमोनने १४ जेतेपदे मिळवली आहेत.
भारताची अमेरिकेकडून प्रथमच कच्च्या इंधनाची खरेदी
- आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘इंडियन ऑइल’तर्फे (आयओसी) प्रथमच अमेरिकेकडून वार्षिक ३० लाख टन कच्चे इंधन खरेदी करण्यात येणार आहे. या संदर्भातील करारही नुकताच झाला. त्यानुसार एक एप्रिल २०१९पासून अमेरिकेतून इंधन आयात करण्यात येणार आहे. या व्यवहाराचे एकूण मूल्य १.५ अब्ज डॉलर असेल. भारताने २०१७पासून अमेरिकेकडून इंधनाची आयात करण्यास सुरुवात केली होती. मात्र, प्रथमच एका भारतीय तेलशुद्धीकरण कंपनीने अमेरिकेसमवेत वार्षिक करार केला आहे.
- कंपनीने कच्च्या इंधनाची खरेदी करण्यासाठी अमेरिकेसोबत गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बोलणी सुरू केली होती. त्या वेळी नोव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत कंपनीने ६० लाख बॅरल कच्चे इंधन खरेदी करण्याचा करार केला.
इस्त्रायलची भारताला खंबीर साथ
- दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचं म्हणजे या मदतीमध्ये कुठलीही मर्यादा नसेल. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने मोक्याच्या क्षणी भारताला साथ देण्याचा शब्द दिला आहे.
- भारताने सुद्धा इस्त्रायल सारखे धोरण अवलंबून कारवाई करावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे. इस्त्रायल दहशतवादाविरुद्ध कठोर आणि वेगवान कारवाईसाठी ओळखला जातो. भारताला आपल्या संरक्षणासाठी जी काही गरज लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत.
- ५२ वर्षीय मल्का इस्त्रायली लष्करात होते. कर्नल पदावर असताना ते लष्करातून निवृत्त झाले. भारत इस्त्रायलचा महत्वाचा सहकारी आणि जवळचा मित्र असल्याचे आपल्याला पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितल्याचे मल्का म्हणाले.