⁠
Uncategorized

Current Affair 21 December 2018

भारताची चीनला ५०० टन तांदुळाची निर्यात

  • भारतीय निर्यातदारांनी चीनला तांदळाची (बासमती सोडून) निर्यात कऱण्याचे ठरवले असून त्याअंतर्गत ५०० टन तांदूळ पाठवणार असल्याचे निश्चित झाले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, हा तांदूळ पुढील आठवड्यात आशियायी देशांमध्ये पोहोचेल.
  • सरकार आणि बाजार विषयातील अधिकारी यांच्यात बिजिंगमध्ये नोव्हेंबरमध्ये याबाबतची बैठक यश्स्वीपणे पार पडली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
  • भारतात पिकणाऱ्या तांदळाला जागतिक पातळीवर मागणी वाढावी यासाठी भारतीय तज्ज्ञांनी चीनमध्ये जाऊन मागणीचा अंदाज घेतला होता, त्यानंतर ५०० टन तांदूळ निर्यात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
  • आता हा आकडा ५०० टन असला तरीही या आर्थिक वर्षाच्या अखेरीस १० हजार टन तांदूळ निर्यात केला जाईल अशी माहिती टिकर मार्केटद्वारे देण्यात आली आहे.
  • या तांदळाची निर्यात करण्यासाठी चीन भारतात आणखी ५ गिरण्या उभारणार आहे. त्यामुळे चीनच्या भारतातील गिरण्यांची संख्या २४ वर पोहोचणार आहे.

‘स्टार्टअप’ इंडियात ‘महाराष्ट्राचा पहिला नंबर

  • देशातील सर्वाधिक २७८७ नवोदित उद्योग (स्टार्टअप) महाराष्ट्रात आहेत. नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी गुजरात हे सर्वोत्तम राज्य ठरले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी) यासंबंधीची मानांकने घोषित केली.
  • त्यामध्ये गुजरात हे सर्वोत्तम राज्य ठरले असले तरी देशामध्ये स्टार्टअपच्या संख्येत गुजरात अखेरच्या स्थानी आहे. तेथील स्टार्टअपची संख्या अवघी ७६४ आहे.
  • स्टार्टअप क्षेत्रात राज्य सरकारांनी केलेल्या कामाची पाहणी डीआयपीपीने अलिकडेच केली. धोरण आखणे, नवोदित उद्योगांचे हब उभारणे, कल्पकतेला वाव, उद्योगांशी संवाद या माध्यमातून राज्य सरकारांनी स्टार्टअपसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी केलेल्या उपाययोजना यांचा या पाहणीत समावेश होता.
  • २७ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेश यात सहभागी झाले होते. त्यांना सर्वोत्तम, अग्रणी, महत्त्वाकांक्षी, उदयोन्मुख आदी श्रेणीत क्रमांक देण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राला ‘उदयोन्मुख’ हे मानांकन मिळाले.
  • राज्यात अधिकाधिक स्टार्टअप उद्योग सुरू होण्यासाठी गुजरातने १०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. त्याचा २०० उद्योग प्रकल्पांना लाभ झाला. यामुळेच गुजरातला यामध्ये सर्वोत्तम राज्याचा खिताब मिळाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्काराने
उदय सर्वगोड, भाऊराव तायडेंचा सन्मान

  • भारतीय दलित साहित्य अकादमीच्यावतीने दिला जाणारा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी देशातील समाजसेवक, डॉक्टर, वकील, सिनेकलाकार आणि साहित्यकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते उदय सर्वगोड आणि पालघर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊराव तायडे यांना यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार नंदकिशोर मसुरकर आणि ग्लोरिया डिसोझा यांना प्रदान करण्यात आले.
  • भारतीय दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर, भारतीय दलित साहित्य अकादमीचे ग्रेट ब्रिटनचे राष्ट्रीय अध्यक्ष ओ.पी. आझाद आणि माजी समाजकल्याण बबनराव घोलप यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
  • दरम्यान, भारतीय दलित साहित्य अकादमीच्यावतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे हे 34 वे वर्ष आहे.

पेटीएमच्या पेमेंट बँकेवर निर्बंध

  • डिजिटल पेमेंटमध्ये आघाडीवर असणाऱ्या पेटीएमच्या पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध आणले आहेत. ई वॉलेट व पेमेंट बँकेत नवी खाती सुरू करणे यावर ऑगस्टपासूनच निर्बंध घालण्यात आले आहेत.
  • पेटीएम बँकेने खातेदारांच्या केवायसीसंबंधी (नो यूवर कस्टमर) नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. तसेच, १०० कोटी रुपयांचे नेटवर्थ राखणे आणि एका खात्यात जास्तीत जास्त एक लाखांची रक्कम राखणे यासंबंधी नियमांचेही पेटीएम बँकेने उल्लंघन केल्याचे दिसत आहे.
  • याशिवाय, पेटीएमचे प्रवर्तक विजयशेखर शर्मा यांच्या पेटीएम बँकेतील भांडवली हिश्श्यावरूनही रिझर्व्ह बँक नाराज आहे. पेटीएम बँकेमध्ये शर्मा यांचे ५१ टक्के भांडवल आहे. तर, उर्वरित भांडवल हे ९७ कम्युनिकेशन्स व अन्य संस्थांचे आहे.

मा. गो. वैद्य यांना अटल जीवनगौरव

  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या अटल सन्मानातील पहिला अटल जीवनगौरव पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांना प्रदान करण्यात आला.
  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरेश भट सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर प्रमुख पाहुणे होते.
  • कला क्षेत्रात लाखनी येथील डॉ. हरिश्चंद्र बोरकर, संगीत क्षेत्रासाठी व्हायोलिनवादक ‘सूरमणी’ पं. प्रभाकर धाकडे, शिक्षणक्षेत्रात मुबारक सय्यद (खराशी, भंडारा), महिला सक्षमीकरणासाठी संगीता सव्वालाखे (यवतमाळ), प्रेरणा सन्मान-भाऊ काणे, प्रगतिशील शेतकरी-अनंता वाघ (अकोला), समाजसेवा- सुचिता सोळंके (कारंजा, वाशीम), कृषी- गणराज पाटील (मेळघाट), जलसंधारण- माधव कोटस्थाने आणि पर्यावरण- गोपाळराव ठोसर यांना अटल सन्मानने गौरवण्यात आले.

Related Articles

One Comment

Back to top button