अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा
- अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर राजीनामा दिला आहे. भारत व अमेरिका लष्करी संबंधाचे ते खंदे पुरस्कर्ते होते.
- संघर्षग्रस्त सीरियातून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयानंतर पेंटॅगॉनमध्ये सर्वानाच धक्का बसला होता. मॅटिस व ट्रम्प यांच्यात समेट न घडून येणारे मतभेद या धोरणबदलांवर झाले होते.
- मॅटिस (वय६८) हे अमेरिकेतील निवृत्त मरीन कोअर जनरल असून ते गुरूवारी दुपारी ट्रम्प यांना सीरियात सैन्य कायम ठेवण्याची भूमिका पटवून देण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये गेले होते.
- मॅटिस यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी नुकतीच भारत अमेरिका संरक्षण संबंधावर चर्चाही केली होती.
- सप्टेंबरमध्ये दोन अधिक दोन संवादाच्या वेळी ते भारतात आले होते. एस ४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली रशियाकडून घेण्यासाठी भारताला र्निबधातून सूट देण्यात यावी, असे आवाहन मॅटिस यांनी काँग्रेसला केले होते.
राजीव गांधींचा ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घ्या,
दिल्ली विधानसभेत प्रस्ताव मंजूर
- भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र पुरस्कार परत घेण्यात यावा असा प्रस्ताव दिल्लीच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला.
- आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा कारण १९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते असा आरोप आप सरकारने केला आहे. याच आरोपामुळे आपने राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
- याच आठवड्यात १९८४ च्या शिखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
संगणक, मोबाइलवर आता सरकारचे लक्ष
- तुमच्या-आमच्या संगणक वा मोबाइलवरून होणारी माहितीची देवाण-घेवाण, त्यांत साठवलेली माहिती तपासण्याचा, तिच्यावर पाळत ठेवण्याचा आणि तिच्या छाननीचा अधिकार दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केल्याने वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.
- ही अधिसूचना म्हणजे देशाची वाटचाल ‘हुकुमशाही राज्या’कडे होत असल्याचे लक्षण आहे, टीका विरोधी पक्षांनी केली. तर ‘या अधिसूचनेत काहीही नवे नाही, विरोधक नाहक आगपाखड करत आहेत’, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले.
- राष्ट्राच्या सुरक्षेला बाधा पोहोचेल, अशी शंका आली तर संगणकांवरील माहितीच्या देवाणघेवाणीवर नजर ठेवण्याची अधिसूचना 2009 मध्ये काढण्यात आली होती. तशीच तंतोतत अधिसूचना केंद्रीय गृहखात्याने काढली.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी जय कवळी
- राज्यभरात बॉक्सिंगचे जाळे विणण्यात मोलाची भूमिका बजावणारे तसेच महाराष्ट्रातील बॉक्सिंगचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जय कवळी’ यांची महाराष्ट्र बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
- महासंघाच्या कार्यकारिणीची निवडणूक 30 डिसेंबर रोजी कल्याण येथे होत असून महासचिव, सचिव आणि खजिनदार या तीन पदांसाठी चुरस रंगणार आहे. boxing
- कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील व पुण्याचे रमेशदादा बागवे यांच्यासह मराठवाडय़ातील माजी आमदार श्रीकांत जोशी तसेच परभणीचे आमदार राहुल पाटील हे उपाध्यक्षपदी असतील. खेळाडू या नात्याने माजी ऑलिम्पियन मनोज पिंगळे, कॅप्टन शाहू बिराजदार तसेच कॅप्टन गोपाल देवांग आणि गुरुप्रसाद रेगे हे उपाध्यक्षपदी कार्यरत असतील.