‘एल अँड टी’ समूहाची ‘के ९ वर्ज-टी’ तोफनिर्मिती
- तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, निर्मिती, संरक्षण क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या ‘लार्सन अॅंड टुब्रो’ कंपनीने विकसित केलेल्या भारताच्या खासगी क्षेत्रामधील पहिले ‘आर्मर्ड सिस्टीम कॉम्प्लेक्स’ (एएससी—संरक्षणकवच पद्धती संकुल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले.
- या संकूलामध्ये अत्याधुनिक रणगाडय़ांवरून मारा करणाऱ्या तोफा, लढाऊ लष्करी वाहने तसेच लढाऊ रणगाडय़ांची निर्मिती केली जाणार आहे.
- या संकुलातून सध्या ‘के ९ वज्र—टी’ या स्वयंचलित तोफांची निर्मिती केली जात आहे. संरक्षण खात्याने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत जागतिक पातळीवर बोली मागवित हे काम ‘एल अॅंड टी’ कंपनीकडे सोपविले होते.
- ‘एल अँड टी’च्या हाझिरा येथील ४० एकरच्या जागेवर हे संकुल वसविण्यात आले असून त्यात तोफखान्यांसह भारतीय लष्करातील इतर अत्याधुनिक शस्त्रे तसेच यंत्रसामग्रीची निर्मिती तसेच त्यांचे परीक्षण केले जाते.
- संकुलामध्ये अवजड ऑफशोअर मॉडय़ुल, रिअॅक्टर एन्ड शील्ड्स, अणु ऊर्जा प्रकल्पांसाठी ‘स्टीम जनरेटर्स’, हायड्रोकार्बनसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, औष्णिक ऊर्जा आणि अल्ट्रा—क्लीन स्पेशल स्टील्सची निर्मितीही केली जाणार आहे.
नेपाळ, बांगलादेशाशी शारदानगरचा करार
- शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार विद्यार्थी, प्राध्यापकांना परस्परदेशांमध्ये प्रशिक्षणे, कार्यशाळा, चर्चासत्रे, अभ्यास यांचे आदानप्रदान करता येणार आहे.
- कौशल्याधारित शैक्षणिक प्रशिक्षण व परस्पर सहकार्यातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा या करारामागील हेतू आहे. यामध्ये नेपाळमधील बालकुमारी कॉलेज चितवन आणि बांगलादेशातील राजशाही विद्यापीठाचा या कराराचा संबंध आहे.
- तर यामध्ये बारामती आणि नेपाळ किंवा बारामती व बांगलादेश यांनी एकमेकांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांमध्ये सहभागी होणे व विविध अभ्यासक्रमांच्या विकासासाठी योगदान देण्याचा समावेश आहे.
- शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने या सामंजस्य करारांतर्गत इंटरनॅशनल स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम 7 ते 12 जानेवारीदरम्यान घेतला.
- तसेच यामध्ये चितवनच्या बालकुमारी कॉलेजमधील नऊ विद्यार्थी व बांगलादेशातील राजशाही विद्यापीठाच्या जीवरसायन व आण्विक जीवशास्त्र विभागाचे अकरा विद्यार्थी शारदानगर येथे सहभागी झाले होते.
…तर भारतातून अन्य देशांना होईल F-16 फायटर विमानांची निर्यात
- एफ-१६ फायटर विमान निर्मितीचा प्रकल्प भारतात हलवण्याची तयारी दाखवणाऱ्या लॉकहीड मार्टिन कंपनीची भारतातूनच अन्य देशांना एफ-१६ विमाने निर्यात करण्याची योजना आहे.
- भारताबाहेर अन्य देशांनी एफ-१६ च्या २०० पेक्षा जास्त विमानांसाठी मागणी नोंदवली आहे. हा सर्व व्यवहार २० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कमेचा आहे असे लाल यांनी सांगितले. एफ-१६ चा उत्पादन प्रकल्प भारतात सुरु झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाला मोठी चालना मिळू शकते. यातून हजारो रोजगार तयार होतील.
- लॉकहीड मार्टिन भारताकडून सर्वात मोठे ११४ फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेत आहे. त्यासाठीच त्यांनी एफ-१६ चा संपूर्ण प्रकल्प भारतात हलवण्याची तयारी दाखवली आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी त्यांची बोईंग एफ/ए १८, साब ग्रिपेन, राफेल, युरोफायटर टायफून आणि रशियन विमान कंपन्यांबरोबर स्पर्धा आहे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताला ४२ स्क्वाड्रनची गरज आहे. म्हणजे ताफ्यात ७५० फायटर विमाने असणे आवश्यक आहे. १९६० च्या दशकातील रशियन बनावटीची मिग-२१ विमाने निवृत्त होत आहेत.
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : आनंद कार्लसनसह अग्रस्थानी
- पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या विश्वनाथन आनंदने आठव्या फेरीत अझरबैजानच्या शाखरीयार मामेद्यारोव्ह याच्यावर रोमहर्षक विजय मिळवत टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनसह अग्रस्थान पटकावले आहे.
- गेल्या फेरीत रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकला हरवल्यानंतर या स्पर्धेचे पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या आनंदने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत मामेद्यारोव्हचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मामेद्यारोव्हला हरवतानाच आनंदने ५.५ गुणांनिशी कार्लसनसह अव्वल स्थान पटकावले आहे. कार्लसनने अप्रतिम कामगिरी करत हंगेरीच्या रिचर्ड रॅपोर्टला पराभूत केले.
- रशियाचा इयान नेपोमनियाची, चीनचा डिंग लिरेन तसेच नेदरलँड्सचा अनिश गिरी हे विजेतेपदाच्या शर्यतीत असून प्रत्येकी ५ गुणानिशी संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. अझरबैजानचा तेमौर रादजाबोव्ह ४.५ गुणांसह सहाव्या तर भारताचा विदिथ गुजराती ४ गुणांसह सातव्या स्थानी आहे.