‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ यांना ऑस्करची दहा नामांकने
- येत्या २४ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणाऱ्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली असून त्यात रोमा आणि द फेव्हरिट यांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत.
- रोमा या चित्रपटाची कथा मेक्सिको राष्ट्रात घडते. त्याचे दिग्दर्शन अल्फान्सो क्वारोन यांनी केले आहे. सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या दोन्ही गटात त्याला नामांकने मिळाली आहेत. उत्कृष्ट सहअभिनेत्रीसाठी रोमाची अभिनेत्री मारिना डी टॅव्हिरा हिला अनपेक्षित नामांकन मिळाले असून ‘अ स्टार इज बॉर्न’ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट अभिनेत्री (लेडी गागा), उत्कृष्ट अभिनेता (ब्रॅडले कूपर) यासाठी नामांकने आहेत. सहअभिनेत्रीसाठी अॅमी अॅडम्स (व्हॉइस) एमा स्टोन ( द फेव्हरिट) यांना नामांकने असून उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘दी वाइफ’ मधील ग्लेन क्लोज हिला नामांकन मिळाले आहे. ख्रिस्तियन बेल, महेर्शला अली, सॅम रॉकवेल, रेचल वेझ यांचाही नामांकनात समावेश आहे.
- उत्कृष्ट चित्रपट
ब्लॅक पँथर, ब्लॅक क्लान्झमन, दी बोहेमियन ऱ्हाप्सडी, द फेव्हरिट, ग्रीन बुक, रोमा, अ स्टार इज बॉर्न, व्हाइस
*सर्वोत्तम अभिनेत्री
यालित्झा अपॅरिशियो -रोमा
ग्लेन क्लोज – द वाइफ
ऑलिव्हिया कोलमन- द फेव्हरिट
लेडी गागा – अ स्टार इज बॉर्न
मेलिसा मॅकार्थी – कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी.
*उत्कृष्ट दिग्दर्शक
स्पाइक ली, ब्लॅकक्लान्झमन
पावेल पावलीकोवस्की, कोल्ड वॉर
योरगॉस लँथीमोस, द फेव्हरिट
अल्फान्सो क्वारोन, रोमा
अॅडम मॅक्के , व्हाइस
*सर्वोत्तम अभिनेता
ख्रिस्तियन बेल, व्हाइस
ब्रॅडले कुपर , अ स्टार इज बॉर्न
विल्यम डॅफो, अॅट इटर्निटीज स्टेट
रामी मॅलेक, बोहेमियन ऱ्हाप्सडी
व्हिगो मॉर्टेन्सन, ग्रीन बुक
*उत्कृष्ट परभाषिक चित्रपट
कॅपरनम, कोल्ड वॉर, नेव्हर लुक अवे, रोमा, म्शॉपलिफ्टर्स
*सर्वोत्तम सहअभिनेत्री
अॅमी अॅडम्स- व्हाइस, मरिना डी ताविरा, रोमा रेगिना किंग, इफ बियल स्ट्रीट क्लाउड टॉक ,एमा स्टोन, द फेवरिट ,रेचल वेझ, दी फॅव्हरीट
*सर्वोत्तम सहअभिनेता
महेर्शला अली- ग्रीन बुक, अॅडम ड्रायव्हर- ब्लॅकक्लान्झमन, सॅम इलिय- अ स्टार इन बॉर्न
रिचर्ड इ ग्रँट- कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी., सॅम रॉकवेल-व्हाइस
अमेरिकेच्या अध्यक्षपद शर्यतीत कमला हॅरिस
- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही उडी घेतली आहे. हॅरिस यांनी घोषणा केल्यामुळे, पहिल्यांदाच भारतीय वंशाची व्यक्ती अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरत असून, भारतीय-अमेरिकन समुदायामध्ये या घोषणेनंतर उत्साह निर्माण झाला आहे.
- अमेरिकेमध्ये पुढील वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक होत असून, दोन्ही डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांकडून या वर्षी इच्छुकांकडून प्रचार करणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून आतापर्यंत चार जणांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.
- वर्णद्वेषाविरुद्ध लढणारे नेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यु) यांनी महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेतल्याच्या दिवसाला सोमवारी ४७ वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवशी हॅरिस यांनी केलेली घोषणा लक्षणीय आहे. कमला हॅरिस या ५४ वर्षांच्या असून, त्यांच्या आई भारतीय असून, त्यांचे वडील जमैकन आहेत.
आयसीसी पुरस्कारांवर विराटचा झेंडा
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या गेल्या मोसमात कसोटी आणि वनडेमध्ये भरीव कामगिरी केल्याचे श्रेय विराट कोहलीला पुरस्कारांच्या रुपात लाभले आहे. हे पुरस्कार साधेसुधे नव्हे, तर मानाचे आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौंसिल) पुरस्कार आहेत.
- ‘सर गारफील्ड सोबर्स सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार’ या सर्वोच्च मानाच्या पुरस्कारासह विराटने गेल्या मोसमातील सर्वोत्तम कसोटीपटू अन् वनडेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कारही पटकावला आहे.
- आयसीसीचे हे तीनही पुरस्कार एकाच वर्षी पटकावणारा विराट हा क्रिकेट इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
- ‘आयसीसीच्या पुरस्कारांची बातच निराळी आहे. संपूर्ण जगातील क्रिकेटपटूंची कामगिरी या पुरस्कारांमध्ये लक्षात घेतली जाते अन् त्यातून तुमची निवड होणे हे खरोखरच कष्टाचे फलित झाल्यासारखे आहे.
- भारताचा २१ वर्षांचा यष्टीरक्षक ऋषभ पंत आयसीसीचा सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू ठरला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था घेणार झेप; ७.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
- भारतीय अर्थव्यवस्था २0१९ मध्ये ७.५ टक्क्यांनी, तर २0२0 मध्ये ७.७ टक्क्यांनी वाढेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. या दोन वर्षांतील चीनच्या ६.२ टक्के या अनुमानित वृद्धिदराच्या तुलनेत भारताचा वृद्धिदर अत्यंत प्रभावशाली आहे.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सोमवारी आपला ‘जानेवारी वर्ल्ड इकॉनॉमी आउटलूक’ हा अहवाल जारी केला. त्यात म्हटले आहे की, २0१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था गतिमान होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सध्या नरमाई असून, महागाई घसरल्यामुळे पतधोरणातील कठोरपणा कमी होण्यास मदत होणार आहे. ेयाचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळेल.
- नाणेनिधीने म्हटले की, अमेरिकेने केलेल्या करवाढीचा परिणाम रोखण्यासाठी काही वित्तीय प्रोत्साहन उपाय चीनने योजले आहेत, तरीही चीनची अर्थव्यवस्था मंदावेल.
- २0१८ मध्ये ६.५ टक्के असलेला येथील वृद्धिदर २0१९ मध्ये ६.३ टक्के आणि २0२0 मध्ये ६.४ टक्के होईल. २0१७ मध्ये चीनचा वृद्धिदर ६.९ टक्के, तर भारताचा वृद्धिदर ६.७ टक्के होता. २0१८ मध्ये चीनचा वृद्धिदर ६.६ टक्के राहिला; २0१९ आणि २0२0 मध्ये तो ६.२ टक्के राहील.
राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’चे वितरण
- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते २०१९ च्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे राष्ट्रपती भवनात वितरण करण्यात आले. यावर्षी वेगवेगळ्या प्रकारात अनेक बालकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- नाविन्यपूर्ण शोध (सहा पुरस्कार), शैक्षणिक प्रगती(तीन), समाजसेवा(तीन), कला आणि संस्कृती(पाच), क्रीडा(सहा) तसेच शौर्य(तीन) या क्षेत्रातील पुरस्कारांचे यावेळी वाटप करण्यात आले. १ लाख रूपये रोख, १० हजारांच्या पुस्तकांचे व्हाऊचर्स, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- यावर्षीच्या बाल शक्ती पुरस्कारासाठी एकूण ७८३ अर्ज आले होते. महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने विजेत्यांची निवड केली होती.
- १९५७ पासून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसोबतचा करार सरकारने रद्द केल्याने यावर्षीचा पुरस्कार सोहळा चर्चेत आला होता.