भारत-ऑस्ट्रेलिया पाच करार
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी परस्पर सामरिक संबंध वाढविण्याबाबत व्यापक चर्चा केली आणि गुंतवणुकीला चालना देण्याबाबत परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत ऑस्ट्रेलियाशी पाच करारही केले.
- पहिला करार दिव्यांगांना सेवा देण्याबाबत तर दुसरा करार दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि ऑस्ट्रेड यांच्यात करण्यात आला. तिसरा करार रांचीतील सेंट्रल माइन प्लानिंग अॅण्ड डिझाइन इन्स्टिटय़ूट आणि कॅनबेरातील कॉमनवेल्थ सायण्टिफिक अॅण्ट रीसर्च ऑर्गनायझेशन यांच्यात करण्यात आला.
- कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठीचा चौथा करार गुंटूर येथील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ आणि पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ यांच्यात करण्यात आला. तर पाचवा करार संयुक्त पीएच.डी.बाबत दिल्लीतील इंद्रप्रस्थ माहिती तंत्रज्ञान संस्था आणि ब्रिस्बेनमधील क्वीन्सलॅण्ड तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात करण्यात आला.
शीख यात्रेकरूंच्या सोयीसाठी गुरदासपूर-आयबी मार्गिका भारत बांधणार
- पाकिस्तानातील रावी नदीच्या तीरावरील गुरुद्वारा दरबार साहिब कर्तारपूर येथे शीख यात्रेकरूंना जाणे सुलभ व्हावे यासाठी भारत पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्य़ातील डेरा बाब नानकपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत (आयबी) एक मार्गिका बांधून विकसित करणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.
- कर्तारपूर साहिब आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर अत्यंत शक्तिशाली टेलिस्कोप बसविण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींकडून 129 जिल्ह्यांना
सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन(CGD) प्रोजेक्टची घोषणा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 129 जिल्ह्यांसाठी सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन(CGD) प्रोजेक्टची घोषणा केली आहे. देशातल्या 19 राज्यांतील संपन्न झालेल्या नवव्या बिडिंग राऊंडमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकार देशातल्या 14 राज्यांतील 124 जिल्ह्यांमध्ये 50 नव्या जियोग्राफिकल एरिया(जीए)नुसार सीजीडी योजना लवकरच सुरू करणार आहे.
- देशातल्या 29 राज्यांतील प्रत्येक जियोग्राफिकल एरिया(जीए)साठी अधिकृत कंपनी स्थानिक स्तरावर या योजनेच्या कामाला सुरुवात करणार आहे. पेट्रोलियम अँड नॅच्युरल गॅस रेग्युलेटरी बोर्डा(पीएनजीआरबी)द्वारे ही गॅस पाइपलाइनची सुविधा 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या देशातल्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
भारतातल्या ‘या’ शहरात मिळतो सर्वाधिक पगार
- कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देणाऱ्या शहरांच्या यादीत बंगळुरु अव्वल आहे. तर सर्वाधिक पगार देणाऱ्या क्षेत्रांमध्ये नेटवर्किंग, सॉफ्टवेयर आणि आयटी या तीन क्षेत्रांचा क्रमांक वरचा आहे. लिंक्डइननं देशात पहिल्यांदाच पगाराचे आकडे लक्षात घेऊन याबद्दलचं सर्वेक्षण केलं आहे. जगातील ५ कोटी लोक लिंक्डइनशी जोडले गेलेले आहेत. यातील सर्वाधिक लोक अमेरिकेतील आहेत.
- मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र लिंक्डइनच्या सर्वेक्षणानं हा समज खोटा ठरला आहे. यामधून बंगळुरु शहरात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती समोर आली.
- बंगळुरु शहरातील मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या पॅकेजची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. इथल्या कंपन्या एका कर्मचाऱ्याला वार्षिक सरासरी ११.६७ लाख रुपयांचं पॅकेज देतात. यानंतर मुंबई (९.०३ लाख रुपये) दुसऱ्या, तर दिल्ली-एनसीआर (८.९९ लाख रुपये) स्थानावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर हैदराबाद (८.४५ लाख रुपये) आणि पाचव्या स्थानावर चेन्नई (६.३० लाख रुपये) आहे.
ब्रेग्झिटोत्तर संबंधांबाबत ब्रिटनकडून करार सादर
- ब्रेग्झिटनंतर अर्थात युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर उभयतांमधील संबंध नेमके कसे राखले जातील, याबाबतच्या कराराच्या मसुद्यावर दोघांचे एकमत झाले. आता युरोपीय समुदायातील २७ देशांचे प्रतिनिधी रविवारी होणाऱ्या बैठकीत या कराराबाबत निर्णय घेतील.
- युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनमधील युरोपीय देशांच्या नागरिकांना ब्रिटनबाहेर पडण्यासाठी तसेच ब्रिटनच्या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी इ.स. २०२०ची मुदत आहे. मात्र गरजेनुसार ती एक ते दोन वर्षांनी वाढविण्यावरही एकमत झाले.
आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला अपयश
- आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला अपयश आले. अंतिम फेरीत इंग्लिश महिलांची गाठ ऑस्ट्रेलियाच्या संघाशी पडणार आहे.
- भारताने दिलेल्या ११३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही खराब झाली होती.