Uncategorized
Current Affair 24 November 2018
पन्नाशीच्या उंबरठय़ावरही तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कार्यक्षम!
- वीजनिर्मिती क्षेत्रात देशात अणुऊर्जेचा स्रोत खुला करणारा ‘तारापूर अणुऊर्जा प्रकल्प’ पन्नाशीत येऊन ठेपला असला तरी आजही कार्यक्षमतेने सुरू असून आणखी काही वर्षे तो किफायतशीर वीजनिर्मिती आणि वितरणाचा मुख्य स्रोत ठरणार आहे.
- २८ ऑक्टोबर १९६९ या दिवशी या केंद्रातून व्यावसायिक तत्त्वावर वीजउत्पादन सुरू झाले. त्यामुळे पुढील वर्षी २८ ऑक्टोबरला हा प्रकल्प पन्नाशीत प्रवेश करीत आहे.
- स्वातंत्र्यानंतर अवघ्या सात महिन्यात म्हणजे २३ मार्च १९४८ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत अणुऊर्जा विधेयक मांडले आणि ते संमत झाले.
- लालबहाद्दूर शास्त्री यांच्या कारकिर्दीत त्याची उभारणी सुरू झाली आणि इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत १९६९ मध्ये या केंद्रातून व्यावसायिक तत्त्वावर वीजउत्पादन सुरू झाले आणि एप्रिल १९७०मध्ये तो पूर्ण क्षमतेने ४२० मेगावॉट विजेचे उत्पादन करू लागला.
महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन साधने निर्मिती प्रकल्प
- अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये इंधन साठवणूक आणि ऊर्जा वहनासारख्या विविध उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या उपकरणांसह इतर आवश्यक सामग्री पुरवठादारांमध्ये अग्रणी होलटेक इंटरनॅशनल कंपनीने महाराष्ट्रामध्ये उत्पादन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे अणुऊर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
- हा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कंपनीकडून ४,९०० कोटी रुपयांची (६८ कोटी डॉलर) गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. होलटेक कंपनीच्या अमेरिकेतील प्रकल्पासारखाच हा प्रकल्प असेल, अशी माहिती करारावेळी देण्यात आली.
- होलटेक इंटरनॅशनल ही ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील, विशेषत: अणुऊ र्जा क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ कंपनी आहे. आजवर विविध ३५ देशातील २०० हून अधिक अणुऊ र्जा प्रकल्पांना या कंपनीने सुटे भाग पुरविले आहेत.
चीन सुरू करणार समुद्रातून जाणारी हायस्पीड ट्रेन!
- नियोजित रेल्वेचा समुद्रातील मार्ग हा निंग्बो आणि झोउशान दरम्यान एकूण १६.२ किमीचा असणार आहे. ही रेल्वे सुमारे २५० किमी प्रति तास वेगाने धावणार आहे. यामुळे चिनी नागरिकांच्या नेहमीच्या प्रवासात अर्धा तास ते दीड तासाची बचत होणार आहे.
- नव्या रेल्वे मार्गामुळे चीनमधील एकूण रेल्वे मार्ग हा २५ हजार किमीचा होणार आहे. हा रेल्वे मार्ग जगाच्या एकूण रेल्वे मार्गापैकी ६० टक्के आहे. बीजिंग-शांघाय मार्गावर जगात सर्वाधिक वेगाने म्हणजे ३५० किमी प्रति तास वेगाने रेल्वे धावते. हा रेल्वे मार्ग हाँगकाँग आणि नॅशनल रेल नेटवर्कला जोडलेला आहे. गेली ५ वर्षे हाय स्पीड ट्रेन हा चीनच्या पायाभूत विकासाचा महत्त्वपूर्ण घटक झाला आहे.
- भारत
देशात मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ते अहमदाबादच्या साबरमती रेल्वे स्थानकापर्यंत बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या रेल्वेचा वेग ताशी ३२० किलोमीटर असणार आहे. भारत सरकार आणि जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) हे या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक आहेत. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यातील रक्कम म्हणून ५५०० कोटींची मदत जपानकडून करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया यांचे निधन
- बीड – राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया उर्फ बाबुजी यांचे ८१ वर्षी निधन झाले.
- बाबुजींनी मानवलोकच्या माध्यमातून राज्यात रचनात्मक काम केले आहे. ७० च्या दशकात मराठवाडा विकास आंदोलन, दुष्काळ विरोधी आंदोलन आणि भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभे करणारे व्यक्ती म्हणून अंबाजोगाई शहरात डॉ. द्वारकादासजी लोहिया प्रसिद्ध आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून घडलेल्या लोहिया यांनी जनसहयोगच्या माध्यमातून सामान्यांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली. मानवलोकच्या माध्यमातून मागच्या ४ दशकात जलसंधारण, महिला सक्षमीकरण, आदिवासी विकास, भूकंप पुनर्वसन आणि पर्यावरण आदीं क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी
- ज्येष्ठ नाटककार व लेखक प्रेमानंद गज्वी यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. गज्वी यांचा १९४७ मध्ये चंद्रपूरमध्ये जन्म झाला.
- साहित्य, पत्रकारिता, वृत्तपत्रीय लेखन असे कार्यक्षेत्र असलेले गज्वी हे नाट्यचळवळीशी जाेडले गेलेले अाहेत. प्रेमानंद गज्वी यांनी किरवंत, देवनवरी छावणी, जय जय रघुवीर समर्थ, डॅम इट अनू गाेरे, नूर महंमद साठे, शुद्ध बीजापाेटी ही नाटके व साहित्यसंपदांचे लिखाण केले आहे.
सोनिया चहल वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत:
- World Boxing Championship या स्पर्धेत भारताची महिला बॉक्सर सोनिया चहल हिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि किमान रौप्यपदक निश्चित केले.
- उपांत्य फेरीत सोनियाने उत्तर कोरियाच्या जो सोन व्हा हिचा 5-0 असा पराभव केला. 57 किलो वजनी गटात भारताच्या सोनियाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले होते.
- तिने प्रतिस्पर्धी बॉक्सरला सामन्यात डोके वर काढण्याची संधींचंज दिली नाही. त्यामुळे तिला एकतर्फी विजय मिळवता आला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सोनिया चहल हिने कोलंबियाच्या येनी कास्टनाडा हिच्यावर 4-1 असा विजय मिळवला होता आणि उपांत्य फेरीत धडक मारली होती.