भारत-चीन यांच्यात सीमा प्रश्नावर चर्चा
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी दोन्ही देशांदरम्यान नैऋत्य सिचुआन प्रांतात बोलणीची २१ वी फेरी सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- सीमा तंटय़ाशिवाय दोन्ही अधिकाऱ्यांनी वुहान शिखर बैठकीनंतर भारत व चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात एप्रिलमध्ये वुहान येथे चर्चा झाली होती. डोवल व वँग हे सीमा प्रश्नी दोन्ही देशांचे प्रतिनिधी असून त्यांच्यात दुजियांग्यान या निसर्गसुंदर शहरात चर्चा सुरू झाली.
- दोन्ही देशांनी संवाद व सल्लामसलतीतून मतभेद कमी केले असून सीमावर्ती भागात आता स्थिरता आहे असे त्यांनी सांगितले होते. आताच्या चर्चेच्या फेरीत सीमेवरील शांतता व दोन्ही देशातील व्यापार यातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
- पंतप्रधान मोदी व अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात वुहान येथे चर्चा झाली होती त्यानंतर भारताने दोन्ही देशातील ५१ अब्ज डॉलर्सची व्यापार तूट भरून काढण्याचा आग्रह संवादात धरला होता. या घटनाक्रमानंतर भारतातून चीनला तांदूळ, साखर, औषधे यांची निर्यात वाढवण्यात आली आहे.
- भारत व चीन यांच्यात ३४८८कि.मी लांबीची सीमा रेषा असून चीनने नेहमीच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा केला आहे
सांगली जिल्हयात सौरऊर्जेद्वारे २७ मेगावॅट वीज निर्मिती
- शेती पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी जिल्ह्य़ात सौरऊर्जेद्वारे २७ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार असल्याचे राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या केंद्रातून शेती पंपाना उच्च दाबाने वीज पुरवठा करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
- सौरऊर्जा वाहिनीचा प्रकल्प प्रायोगिक पातळीवर राळेगणसिध्दी आणि यवतमाळ जिल्हयात कोळंबी येथे राबविण्यात येत असून दुस-या टप्प्यात संपूर्ण राज्यात हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
- योजनेसाठी जिल्ह्य़ातील सात गावांची निवड करण्यात आली आहे. जत तालुक्यातील उटगी, उमदी, सोन्याळ, बोर्गी आणि दरीकोणूर तर मिरज तालुक्यात सलगरे आणि आरग या गावांची निवड करण्यात आली आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामध्ये २७ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार.
कन्नड अभिनेते, माजी मंत्री अंबरीश यांचं निधन
- कन्नड सिनेसृष्टीतील ‘अँग्री मॅन’, अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री एमएच अंबरीश यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी सुमलता आणि मुलगा अभिषेक असा परिवार आहे.
- अंबरीश हे तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. कर्नाटक सरकारमध्येही त्यांनी मंत्रीपद भूषविले होते. कन्नड सिनेसृष्टीत खलनायक म्हणून अभिनयास सुरुवात करणाऱ्या अंबरीश यांनी २०० हून अधिक सिनेमात काम केलं होतं.
WWT20 : ऑस्ट्रेलियन महिलांचा विश्वविजेतेपद
- अंतिम सामन्यात इंग्लंड महिला संघाचा ८ गड्यांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने महिला टी-२० वर्ल्डकपवर चौथ्यांदा नाव कोरलं आहे. गार्डनसच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचा ८ गड्याने पराभव केला.
- यजमान विंडीजला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियन महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर इंग्लंडने बलाढ्य भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
- अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे इंग्लंड महिला संघाचे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद १०५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन महिला संघाने १५.१ षटकांत १०६ धावा करत अजिंक्यपद आपल्या नावे केले.
World Boxing
विक्रमी विजेतेपद
- भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोमने शनिवारी इतिहास रचला. महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटात युक्रेनच्या हॅना ओखोतावर ५-० असा निर्भेळ विजय मिळवून जागतिक स्पर्धेतील सहाव्या सुवर्णपदकावर मोहोर उमटविली. जागतिक स्पर्धेत सहा सुवर्णपदके जिंकणारी मेरी कोम ही पहिलीच महिला बॉक्सर ठरली आहे.
- पुरुषांमध्ये क्युबाच्या फेलिक्स सॅव्हनच्या सहा सुवर्णपदकांशी बरोबरी करत मेरीने आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
- जागतिक स्पर्धेतील कामगिरी
- सन २००१मध्ये रौप्यपदक
- २००२, २००५, २००६, २००८, २०१०, २०१८ मध्ये सुवर्णपदके
- महिलांमध्ये आयर्लंडच्या कॅटी टेलरला टाकले मागे
- पुरुष बॉक्सर फेलिक्स सॅव्हनच्या सहा सुवर्णपदकांशी बरोबरी
World Boxing Championship : सोनियाची ‘चंदेरी’ कामगिरी, जर्मनीच्या ओर्नेला वानरला सुवर्णपदक
- नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सोनिया चहलचं पहिलं सुवर्णपदक मिळवण्याचं स्वप्न आज अपूर्णच राहिलं. 57 किलो वजनी गटात जर्मनीच्या ओर्नेला वानरने सोनियावर मात करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
- संपूर्ण सामन्यात ओर्नेलाने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ओर्नेलाने आपल्या ठोश्यांनी सोनियाला पुरतं जेरीस आणलं.