अंदमान निकोबारमधील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव
- सरकारने अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावे बदलण्याची तयारी सुरु केली आहे. बेट समुहातील रोज आइसलॅण्ड, नील आइसलॅण्ड आणि हेवलॉक आइसलॅण्ड या तीन बेटांची नावे बदलून ती नेताजी सुभाषचंद्र बोस आइसलॅण्ड, शहीद द्विप आणि स्वराज द्विप असे नामकरण करण्यात येणार असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
- बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेयर येथे भारताचा झेंडा फडकवला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडविरुद्ध लढणाऱ्या जपानने अंदमान निकोबार बेटांचा परिसर ताब्यात घेतल्यानंतर नेताजींची हे ध्वजारोहण केले होते.
- मार्च २०१७मध्ये एका भाजपा नेत्याने राज्यसभेमध्ये हेवलॉक आइसलॅण्डच्या नामांतरणाची मागणी केली. १८५७ च्या उठावामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांविरुद्ध लढलेल्या व्यक्तीच्या नावाने हे बेट ओळखले जाते
इराणच्या चाबहार बंदराचे भारताकडून संचालन सुरु
- भारताने औपचारिकपणे इराणच्या चाबहार बंदराचे संचालन हाती घेतले आहे. या बंदरामुळे भारत, अफगाणिस्तान आणि इराणमधील व्यापाराला चालना मिळणार आहे.
- अमेरिकेने इराणवर निर्बंध घालताना त्यातून चाबहारला वगळले आहे. इराण, अफगाणिस्तान आणि भारतामध्ये चाबहार बंदरासंदर्भात करार झाला आहे. जून २०१५ मध्ये चाबहार बंदर विकसित करण्याचा करार झाला होता. इराणने २०१६ मध्ये चाबहार बंदर विकासाला परवानगी दिली.
- चाबहार जवळच पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित केले आहे. त्यामुळे भारतासाठी चाबहार बंदर महत्त्वाचा आहे. या बंदराच्या विकासासाठी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी भारताने इराणला ५० कोटी डॉलरची मदत केली होती.
- चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे. त्यामुळे भारत- इराण – अफगाणिस्तान या तिन्ही देशांसाठी हे बंदर अत्यंत महत्त्वाचे आहे.
यूपीएससीची वयोमर्यादा कायम
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेला बसण्याची कमाल वयोमर्यादा बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारतर्फे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. यूपीएससीच्या परीक्षेला बसण्यासाठीची कमाल वयोमर्यादा सध्या ३२ वर्षे आहे.
- यूपीएससी परीक्षेला बसण्यासाठीची कमाल वयोमर्यादा २७ वर्षे करण्याचा विचार असल्याबाबतचे वृत्त गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाले होते
वीस रुपयांची नवी नोट लवकरच
- रिझर्व्ह बँकेतर्फे लवकरच वीस रुपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०१६मध्ये गांधीजींचे चित्र असलेल्या नोटांची नवी श्रेणी चलनात आणली होती. आता चलनात येणाऱ्या या नव्या नोटाही याच श्रेणीतील असतील; मात्र वीस रुपयांच्या यापूर्वीच्या नोटांच्या तुलनेत या नोटा आकार व रचनेमध्ये वेगळ्या असतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
- रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत १०, २०, ५०, १०० व ५०० रुपयांच्या नव्या नोटा दाखल केल्या आहेत. तसेच, दोनशे व दोन हजार रुपयांच्या नोटा नव्याने चलनात आणल्या आहेत. मार्च २०१८पर्यंत वीस रुपयांच्या नोटांचे एकूण चलनातील प्रमाण ९.८ टक्के होते, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.