आंध्र प्रदेशसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय
- आंध्र प्रदेशसाठी वेगळं उच्च न्यायालय स्थापन करण्याचा आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जारी केला आहे. बुधवारी(दि.26) हा आदेश जारी करण्यात आला असून 1 जानेवारी 2019 पासून अमरावती येथून नव्या उच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरूवात होईल.
- तेलंगणाच्या निर्मीतीनंतर आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांचे उच्च न्यायालय हैदराबाद येथून कार्यरत होते. नव्या उच्च न्यायालयाच्या निर्मितीमुळे देशातील उच्च न्यायालयांची संख्या 25 झाली आहे.
- सध्या उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले न्या. रमेश रंगनाथन हे नव्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे प्रमुख असतील. नव्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिशांव्यतिरिक्त 15 अन्य न्यायाधीश असतील.
बिमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेची समिती
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा राखीव निधी जास्तीत जास्त किती असावा याची निश्चिती करण्यासाठी सहा तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालन अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून राकेश मोहन हे समितीचे उपाध्यक्ष असतील.
- १९ नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाने केंद्रीय बँकांच्या फ्रेमवर्कची समीक्षा करण्यासाठी तज्ज्ञाची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. ही समिती आरबीआयचा आर्थिक भांडवल आराखडा निश्चित करेल.
राज्य साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे
- राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
- या मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासह अन्य ३५ नव्या सदस्यांची नियुक्तीही करण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
- विचारवंत डॉ.मोरे हे यापूर्वी पुणे विद्यापीठातील तत्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सदस्यपदी कलावंत गिरीष प्रभूणे, चित्रपट समिक्षक अशोक राणे, लेखक अरुण शेवते, भारत ससाणे, डॉ मार्तंड कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, संगीतकार संदीप खरे, आसाराम कसबे, ज्योतीराम कदम, उत्तम बंडू तुपे, रेणू पाचपोर, आशुतोष अडोणी, रवींद्र गोळे, सिसिलीया कार्व्हालो, उमा कुलकर्णी, सुप्रिया अय्यर, डॉ, विद्या पाटील, फरझाना डांगे, उषा परब, राणी दुर्वे, सुधीर पाठक, ए.के.शेख, विजय पाडळकर, जगन्नाथ शिंदे, अशोक सोनावणे, डॉ. रणधीर शिंदे, लखनसिंग कटारे, पत्रकार अरुण करमकर, शंकर धडके, संजय ढोले, देवीदास पोटे, रमेश पवार, डॉ. उत्तम रुद्रावतार, डॉ. मधुकर वाकोडे यांच्यासह ३५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.