Uncategorized
Current Affair 30 January 2019
पाकिस्तानात प्रथमच हिंदू महिला न्यायाधीशपदी
- पाकिस्तानात प्रथमच एका हिंदू महिलेची न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. सुमन कुमारी असे या महिलेचे नाव आहे. दिवाणी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
- सुमन या कम्बर-शाहदकोट येथे राहतात. याच जिल्ह्यात त्या न्यायाधीश म्हणून सेवा देणार आहे. त्यांनी हैदराबादमधून एलएलबी केले आहे तर कराचीच्या सय्यद जुल्फिकार अली भुट्टी विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेतून विधीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.सुमन यांचे वडील नेत्ररोग तज्ञ आहेत. त्यांचा मोठा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. बहीण चार्टर्ड अकाऊंटंट आहेत.
- पाकिस्तानात एकूण लोकसंख्येच्या २ टक्के हिंदू आहेत. पाकिस्तानात कुठल्या हिंदू व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी न्या. राणा भगवानदास यांची पहिले हिंदू न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. २००५ ते २००७ या कालावधीत त्यांनी कामकाज पाहिले.
5जी सेवेला चीनमध्ये प्रारंभ
- दक्षिण चीनमधील गुआंगझोऊ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून 5 जी सेवा सुरु करण्यात आली आहे. 5जी सेवा उपलब्ध करुन देणारा हा देशातील पहिला विमानतळ ठरला आहे.
- गुआंगडाँग प्रांतात हा विमानतळ आहे. 5जी सेवेमुळे या विमानतळावर आता 1.14 गिगाबाइट प्रतिसेकंद या सर्वोच्च वेगाने इंटरनेट सेवा मिळू शकते. 4जी सेवेपेक्षा हा वेग 50 पटींनी अधिक आहे.
- चायना युनिकॉमने यासाठीचे बेस स्टेशन तयार केले आहे. यासाठी हुआवेई 5जी लँपसाइटचा वापर करण्यात आला आहे.
- गुआंगझोऊ बैयून हा दक्षिण चीनमधील मोठा विमानतळ आहे. येथून 90 हून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे केली जातात. विमानतळाव्यतरिक्त गुआंगझोऊमधील मोठ्या औद्योगिक वाटिकांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
- ३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीचे केंद्रातील विद्यमान सरकारचे हे शेवटचे असेल. या अधिवेशनादरम्यान आजवरची संसदीय परंपरा मोडीत काढून लेखानुदानाऐवजी केंद्र सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असल्याची चर्चा आहे.
- १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, हे अधिवेशन १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. दरम्यान, राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अधिवेशन सुरळीत पार पडावे म्हणून ३० जानेवारी रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
माजी जगज्जेत्यां व्लादिमिर क्रॅमनिकची निवृत्ती!
- रशियाचा माजी जगज्जेता व्लादिमिर क्रॅमनिक याने व्यावसायिक बुद्धिबळातून निवृत्ती जाहीर केली. नेदरलँड्समधील विक आन झी येथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेनंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
- जवळपास तीन दशके व्यावसायिक बुद्धिबळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या क्रॅमनिकने १९९६ मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेत सर्वानाच अचंबित केले होते. अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला होता.
- त्यानंतर त्याचा हा विक्रम नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने २०१० मध्ये मोडीत काढला. २००० साली ग्रँडमास्टर क्रॅमनिकने गॅरी कास्पारोव्हचे साम्राज्य मोडीत काढत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला. त्यानंतर सात वर्षे त्याने जगज्जेतेपदाचा किताब आपल्याकडेच कायम राखला.
- ग्रँडमास्टर किताब : १९९२
- जगज्जेता : २००० ते २००६ – २००७
- फिडे रेटिंग : २७७७ (जानेवारी २०१९)
- सर्वोत्तम रेटिंग : २८१७ (ऑक्टोबर २०१६)
- क्रमवारीतील स्थान : ७ (जानेवारी २०१९)
- सर्वोत्तम क्रमवारी : १ (जानेवारी १९९६)