ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आणखी दोन आरोपींचे भारतात प्रत्यार्पण
- ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी आरोपी ख्रिश्चन मिशेलला भारतात आणल्यानंतर आणखी दोन आरोपींना पकडण्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पथकाला यश आले आहे.
- अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दुबईतील अकाऊंटंट राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांचे दुबईहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे.
- पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांची अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय चौकशी करत आहे.
- दुबईत राहणाऱ्या राजीव सक्सेनाला अंमलबजावणी संचालनालयाने अनेकदा चौकशीसाठी समन्स पाठविले होते. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. तसेच, राजीव सक्सेना याची पत्नी शिवानी सक्सेना हिला 2017 मध्ये चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली होती. सध्या तिची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
आवर्ती सारणीच्या दीडशे वर्षांनिमित्त वर्षभर उत्सव
- रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना परिचित असलेल्या आवर्ती सारणीला दीडशे वर्षे पूर्ण झाली असून संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या संस्थेने त्यानिमित्ताने वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मूलद्रव्यांच्या संज्ञांचा समावेश आवर्ती सारणीत असतो, त्यात अणूतील प्रोटॉनच्या संख्येनुसार मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे.
- रशियन वैज्ञानिक दिमीत्री मेंडेलीव्ह याने पहिल्यांदा १८६९ मध्ये आवर्ती सारणी प्रसिद्ध केली होती. युनेस्कोने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय रासायनिक मूलद्रव्ये आवर्तीसारणी वर्ष म्हणून जाहीर केले आहे, त्यात झालेल्या पहिल्या कार्यक्रमात रसायनशास्त्राचे नोबेल विजेते व रशियाचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री उपस्थित होते.
- मुलांना आवर्तीसारणीचे आकलन कितपत आहे यासाठी काही स्पर्धात्मक परीक्षा आयोजित केल्या आहेत.
- हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम यासारख्या अनेक मूलद्रव्यांची नावे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावी लागतात. मेंडेलिव्हने त्याकाळात मांडेलली आवर्तीसारणीची संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरली आहे.
- मेंडेलिव्हने १८६९ मध्ये आवर्ती सारणी पहिल्यांदा मांडली, त्यात ६३ अज्ञात मूलद्रव्यांचा समावेश होता. सुरूवातीच्या काळात त्यांच्या अणुभारानुसार त्यांची मांडणी केलेली होती. या आवर्तीसारणीत नंतर अनेक बदल होत गेले. सातव्या आवर्तात एकूण चार मूलद्रव्यांची भर यात डिसेंबर २०१५ मध्ये पडली आहे. २०१६ अखेरीस त्यात एकूण ११८ मूलद्रव्यांची नोंद झाली आहे.
मोदी सरकारच्या शेवटच्या ‘अर्थसंकल्पीय’ अधिवेशन आजपासून
- पाच वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. संसदेच्या ऐतिहासिक केंद्रीय कक्षात लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना संबोधून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या ‘अर्थसंकल्पीय’ अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे.
- मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीतील राष्ट्रपतींचं हे सहावं अभिभाषण असेल. दरम्यान, पूर्ण अर्थसंकल्पाची कल्पना सोडून मोदी सरकारने ‘अंतरिम अर्थसंकल्प’ मांडण्याचे ठरविले आहे. संसदेचं हे अधिवेशन ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.
- या अधिवेशनादरम्यान, सरकारकडून नागरिकता विधेयक, तीन तलाक विधेयक यांसारखे वादग्रस्त विधेयक संमत करून घेण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे या अधिवेशनादरम्यान अयोध्येच्या ‘वादरहीत’ ६७ एकर जमीन मूळ मालकाकडे हस्तांतरीत करण्याच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विनंती अर्जावरही विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाण्याची शक्यता आहे.
दिपीका पदुकोणची ‘मामि’च्या अध्यक्षपदी निवड
- मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी अभिनेत्री दिपीका पदुकोणची निवड करण्यात आली आहे.
- तर यापूर्वी अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव ही ‘मामि’ची अध्यक्ष होती. त्यानंतर आता दिपीका या पदाची जबाबदारी पार पाडणार आहे.
- किरण राव सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. किरणच्या राजीनाम्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या सदस्य मंडळाची बैठक पार पडली.
- तसेच या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी वोटिंग करण्यात आली. यामध्ये दिपीका सर्वाधिक मत मिळवून विजयी झाली.
‘एक होतं पाणी’ चित्रपटला विशेष ज्युरी पुरस्कार:
- रसिक-प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा आणि त्याची साजेशी मांडणी असणारे मराठी चित्रपट सर्व स्तरांवर नावाजले जाताना दिसत आहेत.
- अशाच एका मराठी चित्रपटाची चर्चा सध्या आहे. हा चित्रपट म्हणजेच ‘एक होतं पाणी’ होय. तत्कालीन ज्वलंत विषय मांडणाऱ्या या चित्रपटाने 6व्या नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला आहे.
- ‘न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज’ व ‘काव्या ड्रीम मुव्हीज’ प्रस्तुत ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाने अलीकडेच अंबरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये बाजी मारली.
- एका ज्वलंत सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या ‘एक होतं पाणी’ मध्ये असून एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
- पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाणी वाचवले तर आणि तरच आपली सृष्टी वाचेल असा संदेश यातून देण्यात आला आहे.