⁠
Uncategorized

Current Affairs 01 April 2019

ISRO: पीएसएलव्ही सी ४५ अवकाशात झेपावले

  • इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटचे आज ९. २७ वाजता प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणासह इस्रोने एमिसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे आहे.
  • या महत्त्वाकांक्षी मिशनद्वारे इस्त्रोने विविध देशांच्या २८ नॅनो उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण केले.
  • जगभरातील २८ देश या मिशनमध्ये सहभागी झाले. या कामगिरीमुळे भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. जाणून घेऊ या या मिशनची वैशिष्ट्ये.
  • पीएसएलव्ही सी४५ द्वारे उपग्रह प्रक्षेपित करता येतात. तसंच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रहही प्रक्षेपित करता येतात. हे उपग्रह संरक्षण विषयक संशोधनासाठी उपयोगी ठरतात.
  • या रॉकेटमधून एमीसॅटसोबत २९ नॅनो उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले. यामध्ये अमेरिकेतील २४, लिथुआनियातील ११ ,स्पेनमधील १ तर स्वित्झरलंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.
  • हे पूर्ण मिशन तीन तास चालणार आहे.
  • हा इस्रोचा ४७ वा पीएसएलव्ही प्रोग्राम आहे.
  • हे रॉकेट अंतराळात ७४९ किमीवर एमिसॅट सोडेल आणि ५०४ किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करेल.
  • डीआरडिओ आणि इस्रो या मिशनसाठी संयुक्तपणे काम करत आहेत.
  • विशेष म्हणजे सामान्यांच्या उपस्थितीत या रॉकेटचं प्रक्षेपण होणर आहे. इस्रोने यासाठी खास गॅलरी तयार केली असून या गॅलरीत ५००० लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

उत्पन्नवाढीत मुंबई जगात तिसरी

  • मुंबई सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या जागतिक सूचीत मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीसाठीची (२०१४-१८) ही आकडेवारी नाइट फ्रँक या संस्थेच्या जागतिक अहवालात देण्यात आली आहे. संशोधन कालावधीत मुंबईने वार्षिक कौटुंबिक उत्पन्नामध्ये २०.४ टक्के वाढ साधल्याचे दिसून आले.
  • याच कालावधीत मुंबईतील घरांच्या किमती मात्र केवळ ८ टक्क्यांनी वाढल्या. सॅन फ्रान्सिस्को शहराने सर्वाधिक वार्षिक म्हणजे २५ टक्के उत्पन्नवाढ साध्य केली. घरांच्या किमती व उत्पन्न यांतील तफावत समजून घेण्यासाठी या अहवालात जगभरातील ३२ शहरांचे मूल्यांकन करण्यात आले. मुंबई ही भारतातील सर्वांत महागडी गृहनिर्माण बाजारपेठ समजली जाते.
  • परंतु घरखरेदीसाठी २०१४ मध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाच्या ११पट रक्कम मोजावी लागत होती, ती आता वार्षिक उत्पन्नाच्या ७ पटींवर आली आहे.

भारतीय नेमबाजांकडून सुवर्णपदकांची लयलूट

  • भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल गटातील चारही सुवर्णपदकांना गवसणी घालत भारताच्या सुवर्णपदकांच्या संख्येला १२पर्यंत पोहोचवले आहे. तैपेईच्या तायुअन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत भारताने आतापर्यंत झालेल्या स्पर्धेतील १४ पैकी १२ प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
  • पाचव्या दिवशी भारताच्या दिव्यांशू सिंह पनवार आणि एलव्हेनिल व्हॅलारिवान यांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या गटात सुवर्णपदकांची कमाई केली. दिव्यांशूने २४९.७ गुणांसह सुवर्ण तर किमने २४७.४ गुणांसह रौप्य आणि शिनने २२५.५ गुणांसह कांस्यपदकांची कमाई केली.
  • महिलांच्या गटात एलाव्हेनिलने २५०.५ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले, तर तैपेई लिन यिंग शिनने २५०.२ गुणांसह रौप्य आणि कोरियाच्या पार्क सनमिनने २२९.१ गुणांसह कांस्यपदक मिळवले. पुरुषांच्या सांघिक प्रकारात दिव्यांशू, रवी कुमार आणि दीपक कुमार यांनी १८८०.७ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. कोरियाच्या संघाने १८६२.३ गुणांसह रौप्यपदक पटकावले.

पॅन-आधार जोडणीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

  • पॅन (परमनंट अकाऊंट नंबर) व आधार क्रमांक जोडणीस केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. पॅन-आधार जोडणीची मुदत ३१ मार्चला संपत होती.
  • मात्र केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतलेल्या निर्णयानुसार ही मुदत सहा महिन्यांनी म्हणजे ३० सप्टेंबर २०१९पर्यंत वाढवण्यात आली आहे. सीबीडीटीतर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
  • पॅन-आधार जोडणीस आतापर्यंत सहावेळा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ३० जून २०१८ला ही मुदत संपली होती. मात्र त्यानंतर ही मुदत ३१ मार्च २०१९पर्यंत वाढवण्यात आली.

Related Articles

Check Also
Close
Back to top button