Current Affairs 01 April 2020
करोनामुळे १.१० कोटी लोकांवर भविष्यात भीषण आर्थिक संकट

करोनामुळे पूर्व आशिया व पॅसिफिकमध्ये १.१० कोटी लोकांची आर्थिक स्थिती बिकट होणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे.
सोमवारी वॉशिंग्टन येथील एका कर्जदार संस्थेने म्हटले आहे की, करोनाच्या आधीच्या एका अंदाजानुसार पूर्व आशिया व पॅसिफकमध्ये २०२० मध्ये ३.५ कोटी, तर चीनमध्ये २.५ कोटी लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार होती; परंतु करोनामुळे त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे. एप्रिल २०२० साठीच्या अंदाजानुसार आता १.१० कोटी लोकांची आर्थिक स्थिती बिकट होणार आहे.
आर्थिक विकास दर..
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेची बैठक लवकरच होणार असून त्यापूर्वी हे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. विकसनशील पूर्व आशिया व पॅसिफिकमध्ये आर्थिक विकास दर २.१ टक्के राहील. वाईटात वाईट स्थितीत तो ऋण ०.५ टक्के असू शकतो.
- सुरुवातीला २०१९ मध्ये आर्थिक विकास दर ५.८ टक्के राहील असा अंदाज देण्यात आला होता. चीनची आर्थिक वाढ २.३ टक्के, तर वाईट स्थितीत ०.१ टक्के राहील. २०१९ मध्ये चीनचा वाढीचा अंदाज ६.१ टक्के देण्यात आला होता.
- जागतिक बँकेचे पूर्व आशिया व पॅसिफिक विभागाच्या अध्यक्षा व्हिक्टोरिया कावका यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय व्यापार तणावाखाली आहे. यात सर्व काही संपले अशातला भाग नाही पण या देशांना परिस्थिती सुधारण्यासाठी खूप वेगाने प्रयत्न करावे लागतील.
आयआयटी-गांधीनगरने कोरोना लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थ्यांसाठी सुरू केला ‘प्रोजेक्ट इसाक(Isaac)’

आयआयटी-गांधीनगरने कोरोना लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोजेक्ट इसाक(Isaac)’ सुरू केला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर (Indian Institute of Technology, Gandhinagar – IITGN) ने कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना सर्जनशील प्रकल्पांमध्ये गुंतवण्यासाठी त्यांनी ‘प्रोजेक्ट इसाक(Isaac)’ सुरू केला आहे
सध्या घरातच बंदिस्त अवस्थेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ होणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज आणला ३.५ टक्क्यांवर
क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज ३.५ टक्क्यांवर आणला आहे.
क्रिसीलकडून २०२१ च्या एकूण देशांतर्गत उत्पादनाबाबतच्या (Gross Domestic Product – GDP) आर्थिक वाढीचा अंदाज अपेक्षित ५.२% वरून ३.५% पर्यंत खाली आणला गेला आहे.
कोविड -१९ (साथीचा रोग) पसरल्यामुळे जागतिक वाढीचा अंदाज भौमितिकदृष्ट्या कमी झाला आहे. सध्या २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापेक्षा आर्थिक स्थैर्य धोक्यात आल्याने प्रचंड मानवी दु:ख आले आहे. क्रिसीलने वित्तीय वर्ष २०२१ साठी वर्तवलेला ५.२% GDP वाढीचा अंदाज ३.५% वर आणला आहे