लिंगभाव समानता निर्देशांकात भारत १४० व्या क्रमांकावर
जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवालात भारत १५६ देशात १४० क्रमांकावर राहिला असून भारताचे स्थान २८ क्रमांकांनी घसरले आहे.
दक्षिण आशियात वाईट कामगिरी असलेला भारत हा तिसरा देश ठरला आहे.
या अहवालानुसार लिंगभाव समानतेत भारताची टक्केवारी ६२.५ टक्के राहिली असून २०२० मध्ये भारत १५३ देशात ११२ व्या क्रमांकावर होता. आता तो १४० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
आर्थिक सहभाग व संधी उपनिर्देशांकात भारताची घसरण झाली असून या वर्षी या काही पैलूत भारतातील लिंगभाव समानतेतील दरी ३ टक्क््यांनी वाढली असून ती ३२.६ टक्के आहे. राजकीय सक्षमीकरणात भारताला मोठा फटका बसला असून त्यात १३.५ टक्के नोंद आहे.
२०१९ मध्ये भारताची टक्केवारी २३.१ होती ती २०२१ मध्ये ९.१ टक्के झाली आहे. कामगार- कर्मचारी यात महिलांचा घटता सहभाग हे याचे प्रमुख कारण ठरले असून हा सहभाग २४.८ टक्क््यांवरून २२.३ टक्के झाला आहे. याशिवाय व्यावसायिक व तंत्रज्ञानात्मक भूमिकात महिलांचा सहभाग कमी होऊन तो २९.२ टक्के राहिला आहे.
वरिष्ठ व व्यवस्थापकीय पातळीवर महिलांचा सहभाग कमीच असून १४.६ टक्के वरिष्ठ पदांवर महिला आहेत. व्यवस्थापकीय पदांवर महिलांचे प्रमाण ८.९ टक्के आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न भारतात एक पंचमांश आहे. त्यामुळे भारत खालच्या दहा देशात गेला आहे.
-महिलांविरोधातील भेदभाव जास्त असून आरोग्य व जीवन संघर्षात टिकून राहण्याच्या निर्देशांकात भारताने खराब कामगिरी केली आहे. भारत त्यामुळे यात घटक निर्देशांकात खालच्या पाच देशात आहे.
-जन्मदरात स्त्री पुरुष असमानता कायम असून दर चार महिलांपैकी एकीला जीवनात एकदातरी शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावे लागते असे दिसून आले.
-माध्यमिक व इतर शैक्षणिक पातळ्यांवर फरक कायम असून दर तीन महिलांमागे एक निरक्षर आहे. हे प्रमाण एकूण ३४.२ टक्के आहे. पुरुषांत ते १७.६ टक्के आहे.
-बांगलादेश ६५, नेपाळ १०६, पाकिस्तान १५३, अफगाणिस्तान १५६, भूतान १३०, श्रीलंका ११६ या प्रमाणे इतरांचे क्रमांक आहेत.
– दक्षिण आशियात भारत ६२.३ टक्के पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा खराब कामगिरी करणारा देश ठरला आहे. बांगलादेशात ७१.९ टक्के तर अफगाणिस्तानात ४४.४ टक्के असमानता आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली.
दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेक्षेत्रातील कामगिरीसाठी केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.
कोरोना महामारीमुळे यंदा सर्व पुरस्कारांची घोषणा विलंबाने झाली. नुकतीच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली.
किमान ७.५ ते कमाल १२.५ टक्क्यांदरम्यान अर्थवृद्धी
मागील एका वर्षात करोना महामारी आणि दीर्घकाळ सुरू राहिलेल्या टाळेबंदीचे गंभीर घाव सोसूनही भारतीय अर्थव्यवस्थेने त्यातून आश्चर्यकारक उभारी दाखविली असली तरी, अद्याप संकट पुरते सरलेले नाही, असे निरीक्षण जागतिक बँकेने ताज्या अहवालात नोंदविले आहे.
हे पाहता देशाच्या वास्तविक आर्थिक विकास दरात वाढीसंबंधीचा अंदाज तिने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी किमान ७.५ टक्के ते कमाल १२.५ टक्के अशा रुंद खिडकीतून व्यक्त केला आहे.
जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) यांच्या संयुक्त वार्षिक बैठकीआधी प्रसृत दक्षिण आशियाई देशांच्या आर्थिक दृष्टिक्षेपावरील या महत्त्वपूर्ण टिपणांत, करोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू होण्याआधीच भारतीय अर्थव्यवस्था मंदावली होती, असे निरीक्षणही नोंदवले आहे.
२०१६-१७ मध्ये नोंदविला गेलेला ८.३ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढ २०१९-२० मध्ये ४ टक्क्यांवर रोडावल्याचे दिसून आल्याचे या जागतिक बँकेने म्हटले आहे.
‘व्हेक्टस’ला स्टोअरेज टँक श्रेणीत ‘सुपरब्रँड २०२१’ पुरस्कार जाहीर
वॉटर स्टोअरेज सोल्युशन क्षेत्रात देशातील बहुप्रतिष्ठित कंपनी व्हेक्टस इंडस्ट्रीज लिमिटेडला पाणी साठवणूक टाकीच्या श्रेणीत २०२१ वर्षासाठी सुपरब्रँड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले