⁠  ⁠

चालू घडामोडी : ०१ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 01 February 2020

आयबीएमच्या सीईओपदी अरविंद कृष्णा यांची नियुक्‍ती

arvind krishna

जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारणार आहेत.
रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. 40 वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या 2020च्या अखेरीस निवृत्त होणार असल्याचेही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
57 वर्षीय अरविंद सध्या आयबीएमच्या क्‍लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. क्‍लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात. आयबीएम क्‍लाऊड, आयबीएम सिक्‍युरिटी, कग्नेटीव्ह ऍप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत.
त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्‍नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्याआधी 1990 साली कंपनीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते आयबीएमच्या डेटासंदर्भातील उद्योग विभागामध्ये होते. आयआयटी कानपूरमधून अरविंद यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इलिनॉयमधील उर्बाना चॅम्पियन विद्यापिठातून इलेक्‍ट्रीक इंजिनियरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.

साडेसहा टक्के विकासाचा दावा!

देशाने आर्थिक विकास घडवायचा असेल तर संपत्तीची निर्मिती केली पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारगाभ्याला यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात (२०१९- २०)केंद्रस्थानी ठेवण्यात आले.
पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी बाजारपेठेच्या ‘अदृश्य हाता’ला सरकारच्या पाठिंब्याची गरज असल्याचे मत अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. चालू वर्षांत (२०२०-२१) विकासाला अधिक चालना मिळण्याची शक्यता गृहित धरली असून ६-६.५ टक्क्य़ांच्या गतीने देश विकास साधेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वसंध्येला परंपरेप्रमाणे शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.
पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समितीकडून गेल्या बारा महिन्यांतील देशाच्या अर्थिक परिस्थितीचे चित्र या अहवालात मांडले जाते. सरलेल्या आर्थिक वर्षांत (२०१९-२०) आर्थिक विकासाचा दर पाच टक्के राहील. गेल्या पाहणी अहवालाने सात टक्के विकासाचा अंदाज मांडलेला होता. यंदा तो साडेसहा टक्के असेल, असे भाकित वर्तविले आहे.
आर्थिक पाहणी अहवालाचे मुखपृष्ठ निळसर-जांभळ्या रंगात आहे. नवी शंभर रुपयांची नोटही याच रंगाची असून २०१८ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने निळसर- जांभळ्या रंगातील नोट बाजारात आणली. हा रंग जाणीवपूर्वक निवडण्यात आला असून नव्या आणि जुन्या संकल्पनांचा संगम असल्याची प्रतिक्रिया मुख्य आर्थक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी दिली.

युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर

vdh01

बऱ्याच चर्चेनंतर ब्रिटनच्या संसदेने ब्रेग्झिट विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री ब्रिटन अधिकृतपणे युरोपीय समुदायातून मुक्त झाला आहे.
ब्रेग्झिट समझोता करारावर गुरुवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वाक्षरी केली व नंतर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनीही या करारास मंजुरी दिली होती. सार्वत्रिक निवडणुकीतील यशानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कुठल्याही परिस्थितीत ब्रेग्झिट तडीस नेण्याचा निर्धार केला होता. युरोपीय समुदायाच्या वतीनेही करारावर स्वाक्षऱ्यांचे सोपस्कार पार पडले. ब्रिटनची पुढील वाटचाल कशी होते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
२०१६ मध्ये जनमताच्या माध्यमातून ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ४३ महिन्यांनी हे स्वप्न अखेर पंतप्रधान जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली साकार झाले.
माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या मुद्दय़ावर जनमत घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर २०१६ मध्ये हे जनमत झाले. त्यात जास्त लोकांनी (५२ टक्के) ब्रेग्झिटच्या बाजूने कौल (विरोधात ४८ टक्के) दिल्यानंतरही प्रत्यक्ष बाहेर पडण्याच्या मुद्दय़ावरून वाटाघाटी सतत फिसकटत गेल्या त्यामुळे युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला.
ब्रिटनच्या प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजता युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडला, तर युरोपीय समुदायातील ब्रसेल्सच्या प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सहा वाजता काडीमोडाची अखेरची घटिका पार पडली

‘बीसीसीआय’ची क्रिकेट सल्लागार समिती जाहीर

spt01

भारताचे माजी क्रिकेटपटू मदनलाल, रुद्र प्रताप सिंग आणि सुलक्षणा नायक यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे.
राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांच्या जागी दोन नवे सदस्य नेमण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीचा कार्यकाळ एक वर्षांचा असेल, असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे.
देशाच्या विविध संघांचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारीसुद्धा क्रिकेट सल्लागार समितीकडेच असते. गतवर्षी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी हितसंबंधांचे आरोप झाल्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला होता.
मदनलाल
३९ कसोटी आणि ६७ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव. १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य. भारताचे माजी प्रशिक्षक तसेच वरिष्ठ गटाच्या निवड समितीचे माजी सदस्य.
आर. पी. सिंग
१४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव. २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या संघाचा सदस्य.
सुलक्षणा नायक
भारताचे ११ वर्षे प्रतिनिधित्व करताना २ कसोटी, ४६ एकदिवसीय आणि ३१ ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव.

बुद्धिबळ: रशियाचा डेव्हिड ठरला जिब्राल्टर मास्टर्स चॅम्पियन

रशियाच्या डेव्हिड परवयनने १८ व्या जिब्राल्टर बुद्धिबळ स्पर्धेचा मास्टर्स किताब पटकावला. त्याने टायब्रेकरमध्ये अापल्याच देशाच्या इसिपेनकाे अाणि चीनच्या वांगाे हाऊला पराभूत केले. भारताचे चार खेळाडू शेवटच्या फेरीत अपयशी ठरला. त्यामुळे त्यांचा किताबाचा प्रयत्न अपयशी ठरला. डेव्हिडला अाता २८ लाख रुपये अाणि ट्राॅफी देउन गाैरवण्यात अाले. महिला गटात चीनची जाेंगयी विजेती ठरली. तिलाही ट्राॅफी देण्यात अाली.

Share This Article