Uncategorized
Current Affairs 01 June 2019
एस जयशंकर थेट मंत्री झालेले परराष्ट्र सेवेतील पहिलेच अधिकारी
- मोदींच्या सरकार मध्ये विदेश व्यवहार मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आलेले एस जयशंकर हे पहिलेच परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. चीन आणि अमेरिका यांच्याशी असलेल्या भारताच्या संबंधांचा त्यांना विशेष अभ्यास आहे.सोळा महिन्यापुर्वीच ते विदेश सचिव पदावरून निवृत्त झाले होते. 64 वर्षीैय जयशंकर यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागणार आहे.
- जयशंकर हे के सुब्रमण्यम यांचे चिरंजीव आहेत. सुब्रमण्यम यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात युपीए सरकारच्या काळात झालेल्या ऐतिहासिक अणु कराराच्या प्रक्रियेत मोठे योगदान दिले होते.
नवे नौदलप्रमुख म्हणून ऍडमिरल करमबीर सिंह यांनी कार्यभार स्वीकारला
- भारतीय नौदलाचे 24 वे नवे प्रमुख म्हणून ऍडमिरल करमबीर सिंह यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. ऍडमिरल करमबीर सिंह पुण्याजवळच्या
- खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत.
1980 साली त्यांनी नौदलात प्रवेश केला आणि 1981 साली हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांनी चेतक आणि कमाऊ हेलिकॉप्टर्स हाताळली. - आपल्या 39 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तटरक्षक दल, आय एन एस विजयदुर्ग तसेच क्षेपपणास्त्र विनाशिका युद्धनौका आय एन एस राणा आणि आय एन एस दिल्ली यावर काम केले आहे.
विकासदराला उतरली कळा; चौथ्या तिमाहीत 5.8 टक्क्यांवर घसरला
- भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नातील (जीडीपी) वाढ जानेवारी ते मार्च महिन्यात 5.8 टक्क्यांवर आली आहे. त्याआधीच्या तिमाहीत हा विकासदर 6.6 टक्के होता.
- सांख्यिकी विभागाने आज ही आकडेवारी जाहीर केली. मागील पाच वर्षांतील हा नीचांकी विकास दर आहे.
- कृषी क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्राची खराब कामगिरी याला प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे. याआधी 2013-14 मध्ये विकासदर 6.4 टक्के या नीचांकी पातळीवर होता. मागील आर्थिक वर्षातील विकासदर 6.8 टक्के आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात तो 7.2 टक्के होता.
- भारताचा चौथ्या तिमाहीतील विकासदर कमी झाल्यामुळे चीनने आता आघाडी घेतली आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मान चीनला मिळाला आहे. याआधी तो भारताकडे होता. चीनचा विकासदर
- सध्या 6.4 टक्के आहे.
विकासदर - (आकडे टक्क्यांमध्ये)
5.8 - जानेवारी ते मार्च 2019
6.6 - ऑक्टोबर ते डिसेंबर 2018
6.8 - आर्थिक वर्ष 2018-19
7.2 - आर्थिक वर्ष 2017-18
निर्मला सीतारमण ठरल्या पहिल्या महिला अर्थमंत्री
- अर्थमंत्रालयाचा कार्यभार निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपविण्यात आला असून त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात त्या पहिल्या संरक्षण मंत्री ठरल्या होत्या.
- दरम्यान, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काही काळासाठी त्यांच्याकडे अर्थमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची जबादारी होती. परंतु, निर्मला सीतारमण पाच वर्षांसाठी म्हणजेच पूर्णवेळ अर्थमंत्री असून त्यांच्याकडे कॉरर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाची जबाबदारीही सोपविण्यात आलेली आहे.
मोदी सरकारची मंत्रिपदे जाहीर
- अमित शहा यांना गृहमंत्री पद देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. तर
- राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
- सदानंद गौडा – खत आणि रसायन मंत्री
- निर्मला सीतारामन – अर्थमंत्री
- नितीन गडकरी – वाहतूक दळणवळण मंत्रालय
- राम विलास पासवान – ग्राहक मंत्रालय
- नरेंद्र सिंह तोमर – कृषीमंत्री
- रवी शंकर प्रसाद – कायदा व न्याय मंत्रालय, दूर संचार, तंत्रज्ञान व माहिती
- तंत्रज्ञान मंत्रालय
- सुब्रमण्यम जयशंकर – परराष्ट्र मंत्रालय
- स्मृती इराणी – महिला व बाल कल्याण मंत्रालय
- थावरचंद गेहलोत – सामाजिक न्याय
- रविशंकर प्रसाद – कायदा आणि माहिती व प्रसारण मंत्रालय
- हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
- रमेश पोखरीयाल निशंक – मनुष्यबळ विकास मंत्रालय
- अर्जुन मुंडा – आदिवासी विकास मंत्रालय
- डॉ. हर्षवर्धन – कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालय, विज्ञान आणि
- तंत्रज्ञान आणि भू विज्ञान विभाग
- प्रकाश जावडेकर – पर्यावरण, माहिती प्रसारण
- पीयुष गोयल – रेल्वे मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, उद्योग मंत्रालय
- धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, स्टील मंत्रालय
- मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक विकास मंत्रालय
- प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज तसेच कोळसा आणि खाण मंत्रालय
- महेंद्र नाथ पांडे – कौशल्य विकास आणि नवोद्योजक मंत्रालय
- अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्रालय
- गिरीराज सिंह – पशूपालन, दुग्धविकास आणि मत्सोद्योग मंत्रालय
- गजेंद्र सिंह शेखावत – जलशक्ती मंत्रालय
- राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
- संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री पद
किरेन रिजिजू भारताचे नवीन क्रीडामंत्री
- रिजिजू यांना राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार देण्याबरोबरच युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय व अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
- २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर रिजिजू यांना देण्यात आलेले मंत्रीपद हे काटेरी मुकुट असल्याचे बोलले जात आहे. माजी क्रीडा मंत्री राठोड यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप चांगले काम केले आहे.
- त्यांनी खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळवून दिल्या आणि त्याचा सकारात्मक निकालही पाहायला मिळाला होता.