एकापाठोपाठ १९ उपग्रह अवकाशात
ध्रुवीय प्रक्षेपकाच्या मदतीने ब्राझीलचा ‘अॅमेझॉनिया १’ हा उपग्रह व इतर १८ उपग्रह रविवारी सकाळी यशस्वीरीत्या अवकाशात सोडण्यात आले.
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे या वर्षांतील हे पहिले प्रक्षेपण होते.
पीएसएलव्ही सी ५१ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाण सकाळी १०.५४ वाजता सतीश धवन अवकाश केंद्राच्या पहिल्या तळावरून करण्यात आले.
चेन्नईच्या ‘स्पेस किड्स इंडिया’ या संस्थेचा उपग्रह असून त्याचे नाव ‘सतीश धवन उपग्रह’ असे आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र कोरलेले आहे. पीएसएलव्ही सी- ५१ हा ध्रुवीय प्रक्षेपक व्यावसायिक स्वरूपाचा असून न्यूस्पेस इंडिया लिमिटेड या इस्रोच्या व्यावसायिक संस्थेचा या मोहिमेत सहभाग होता.
चार इस्रोच्या नॅशनल स्पेस प्रमोशन अॅथोरायझेशन सेंटरचे होते. ही संस्था तीन संस्थांची मिळून बनली आहे.
अॅमेझॉनिया-१ उपग्रह
अॅमेझॉनिया उपग्रह ६३७ किलो वजनाचा असून तो प्रकाशीय पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. अॅमेझॉनच्या जंगलातील हानीची माहिती घेण्याकरिता हा उपग्रह सोडण्यात आला आहे. ब्राझीलमधील शेतीच्या विविधतेचाही अभ्यास यात केला जाणार आहे.
कुस्ती : विनेश फोगाटला सुवर्णपदक
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने कोरोनानंतर मॅटवर आपल्या जबरदस्त शैलीत पुनरागमन केले.
तिने आपल्या पहिल्या स्पर्धेत युक्रेन कुस्ती स्पर्धेत दोन वेळची जागतिक चॅम्पियन वानेसा केलेदजिंस्केला चित केले.
३ किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत एशियन व कॉमनवेल्थ चॅम्पियन विनेशने बेलारूसच्या वानेसाला १०-८ ने पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी भारताची एकमेव महिला कुस्तीपटू आहे.
जगातील १० देशांत महिलांना मिळतात समान हक्क; भारत १२३ व्या क्रमांकावर
जगात केवळ दहा असे देश आहेत, जेथे महिलांना पूर्ण समान हक्क आणि पूर्ण कायदेशीर संरक्षण मिळते, तर भारतासह १८० देश असे आहेत, जे महिलांना समान हक्क देण्यात सक्षम नाहीत.
जागतिक बँकेच्या महिला, व्यवसाय व कायदा २०२१ च्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे.
अहवालात म्हटले आहे की, १९० देशांच्या यादीत बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, लॅटव्हिया, लक्झेंबर्ग, स्वीडन, आइसलँड, कॅनडा, पोर्तुगाल, आयर्लंड असे देश आहेत, जेथे महिलांना आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह समान काम-समान वेतनाचा हक्क आहे. तसेच लग्न करणे, मुले जन्मास घालणे आणि व्यवसाय निवडण्याचाही अधिकार आहे.
यात भारत १२३ व्या क्रमांकावर आहे. महिलांना समान हक्क देण्याबाबत इस्लामिक देश तुर्की (७८), इस्रायल (८७) व सौदी (९४) देखील आपल्या पुढे आहेत. अहवालात म्हटले आहे की, भारत काही बाबतीत महिलांना पूर्ण हक्क देतो
. मात्र, समान वेतन, मातृत्व, व्यवसाय, मालमत्ता व निवृत्तिवेतनसारख्या बाबतीत मागे आहे. जागतिक बँकेने भारताला १०० पैकी ७४.४ गुण दिले आहेत. दुसरीकडे महिलांना हक्क देण्याच्या बाबतीत सौदीच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे, तर अमेरिका, पेरू, अल्बानिया यांची घसरण झाली आहे. यादीत येमेन, कुवेत व सुदान सर्वात मागे आहेत.