राजस्थानमध्ये आता प्रत्येक कुटुंबाचा आरोग्य विमा; देशातलं ठरलं पहिलंच राज्य!
राजस्थान सरकारने राज्यातल्या प्रत्येक कुटुंबासाठी तब्बल ५ लाख रुपयांच्या आरोग्य विम्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे आता राजस्थानमधल्या प्रत्येक कुटुंबाची विमा पॉलिसी असणार आहे.
असं करणारं राजस्थान हे पहिलंच राज्य ठरणार आहे.
“राजस्थान सरकारची सर्वांसाठी कॅशलेस उपचार योजना म्हणजेच मुख्यमंत्री चिरंजीवी स्वास्थ्य विमा योजना राज्यात सुरू झाली आहे.
‘जीएसटी’ संकलन मार्चमध्ये विक्रमी १.२३ लाख कोटींवर
मार्च २०२१ मध्ये या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या माध्यमातून सार्वकालिक उच्चांकी १.२४ लाख कोटी रुपये संकलित केले गेले आहेत.
आधीच्या फेब्रुवारी महिन्यांतही जीएसटीच्या माध्यमातून सरकारने विक्रमी १.१३ लाख कोटी रुपये गोळा केले होते, तर मार्च महिन्यांतील संकलन हे त्यापेक्षा तब्बल १०,००० कोटी रुपयांहून अधिक १.२३ लाख कोटी रुपये नोंदविण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले.
बनावट बीजके बनविण्याच्या कुप्रवृत्तीला पायबंद, माहिती-तंत्रज्ञान प्रणाली मजबूत बनवून, जीएसटी, प्राप्तिकर आणि सीमा शुल्क अशा बहुविध स्रोतांमधून मिळालेल्या माहितीचे सखोल विश्लेषण आणि त्या परिणामी कर-चोरीला आळा घालणारे प्रभावी कर प्रशासन व देखरेखीमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये कर-अनुपालनात वाढ झाली आहे,
त्याचप्रमाणे करापोटी गोळा होणाऱ्या महसुलांतही वाढीला लक्षणीय हातभार लागला आहे, असे या वाढलेल्या संकलनामागील कारणे अर्थमंत्रालयाने सांगितली आहेत.
मार्चमधील संकलनात, केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) म्हणून २२,९७३ कोटी रुपये, राज्यांचे वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) संकलन २९,३२९ कोटी रुपये, एकात्मिक वस्तू व सेवा कर (आयजीएसटी) म्हणून ६२,८४२ कोटी रुपये आणि उपकराच्या रूपात ८,७५७ कोटी रुपये असे एकंदरीत १,२३,९०२ कोटी रुपये इतके आहे.
मागील पाच महिन्यांमध्ये दिसून आलेल्या कलाप्रमाणे, मार्च २०२१ मधील जीएसटी संकलन हे, मार्च २०२० मधील संकलनाच्या तुलनेत २७ टक्के अधिक आहे, अशी पुस्तीही अर्थमंत्रालयाने जोडली आहे.
शिवाजी विद्यापीठाला नॅककडून ए प्लस प्लस मानांकन
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला बंगळुरु येथील राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून ए प्लस प्लस मानांकन मिळालं आहे.
नॅकच्या नव्या मानांकनासह 3.52 गुण मिळवत शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वल ठरलं आहे.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन बंगळुरु येथील राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून करण्यात आलं होते.
शिवाजी विद्यापीठाचं यापूर्वी तीनवेळा मूल्यांकन झालेलं आहे. विद्यापीठाला तिसऱ्या टप्प्यातील मूल्यांकनामध्ये ‘ए’ मिळालं होतं.
आता चौथ्या टप्प्यातील मूल्यांकनामध्ये ए प्लस प्लस मानांकन मिळालं आहे.