Current Affairs 02 january 2020
चीनमध्ये सुरू झाली जगातील पहिली स्मार्ट हायस्पीड ट्रेन
चीनमध्ये ५६४९६ कोटी रुपये खर्चून जगातील पहिली स्मार्ट व हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही चालकविरहित आहे. ताशी ३५० किमी वेगाने चालणाऱ्या या रेल्वेत ५ जी सिग्नल, वायरलेस चार्जिंग व स्मार्ट लायटिंगसह सर्व सुविधा आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आहेत.
सोमवारी बीजिंगपासून झांगजियाकोदरम्यान १७४ किमीचा प्रवास या रेल्वेने १० थांब्यासह ४७ मिनिटांत पूर्ण केला. या रेल्वेचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे संचालन करण्याचे प्रत्येक तंत्र, जीपीएस सिस्टिमसुद्धा चीनमधील आहे. ही रेल्वे २०२२ च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी सुरू केली.
चांद्रयान 3 सन 2020 मध्ये नव्हे तर 2021 मध्ये
देशाची तिसरी चांद्रयान मोहीम चांद्रयान 3 ही पुढील वर्षी म्हणजे सन 2021 मध्ये हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती इस्त्रोच्यावतीने देण्यात आली.
या तिसऱ्या चांद्रयान मोहीमेला 250 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. इस्त्रोने आपल्या मोहीमांसाठी आणखी एक प्रक्षेपण केंद्र विकसित करण्याचे योजले असून त्यासाठी तामिळनाडु जिल्ह्यातील तुतीकोरिन जिल्ह्यातील जमीन निश्चीत करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले. इस्त्रोचे पहिले प्रक्षेपण केंद्र श्रीहरीकोटा येथे आहे.
पुढील सात वर्ष हा ऑर्बिटर सक्रिय राहणार असून यामधून वैज्ञानिकांसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल”.
याआधी के सिवन यांनी या मोहिमेत महिला अंतराळवीराचा समावेश असेल अशी घोषणा केली होती. मात्र निवड झालेल्या अंतराळवीरांमध्ये महिलेचा समावेश नाही.
सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटीच्या संकलनात वाढ
जीएसटी (वस्तू-सेवाकर) संकलनाचा आकडा सलग दुसऱ्या महिन्यात एक लाख कोटीच्या वर गेला आहे.
डिसेंबर 2019 या महिन्यात एक लाख 3 हजार 184 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात एकूण 1,03,492 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. तर ऑक्टोबर महिन्यात 95,380 कोटी रुपये आणि सप्टेंबर महिन्यात 91,916 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.
एकूण जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 19,962 कोटी रुपये, तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) 26,792 कोटी रुपये वसूल झाले आहेत. एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) 48,099 कोटी रुपये आहे. उपकर 8,331कोटी रुपयांचा आहे.
२०२० मध्ये देशात ६ नवीन AIIMS सुरू होणार
वीन वर्षाला सुरुवात झाली आहे. २०२० मध्ये आणखी सहा AIIMS सुरू होणार आहेत. या सहा AIIMS पैकी दोन उत्तर प्रदेश, एक पश्चिम बंगाल, एक महाराष्ट्र तर एक आंध्र प्रदेश राज्यात बनवण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेशातील रायबरेली व गोरखपूर या दोन ठिकाणी एम्स बनवण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. आंध्र प्रदेशातील मंगलगिरीत तर महाराष्ट्रातील नागपूरमध्ये हे बनवण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील कल्याणी, व पंजाबमधील बठिंडामध्ये यावर्षी AIIMS तयार होतील असे सांगितले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२० मध्ये सर्वात आधी पहिले एम्स उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये सुरू करण्यात येईल. या एम्ससाठी जवळपास १०११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एप्रिलमध्ये गोरखपूर कार्यरत होईल. गोरखपूर हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे.
देशातील 12 राज्यांत ‘एक देश, एक रेशन कार्ड’ची योजना सुरू
देशातील 12 राज्यांमध्ये ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना आजपासून सुरू झाली आहे.
1 जानेवारी 2020 पासून देशातील एकूण 12 राज्यांत ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना सुरु करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये ही ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच, जून 2020 पर्यंत देशातील सर्व राज्यांत ही योजना अंमलात आणली जाणार आहे,