Current Affairs : 02 January 2021
जपान तयार करतोय जगातील पहिलं ‘लाकडी सॅटलाइट
अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन केंद्राच्या माहितीनुसार अवकाशात सध्या 5 लाखांहून अधिक निरुपयोगी तुकडे पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहेत.
तर यातील अनेक तुकडे हे अतिशय वेगानं फिरत असून यातून सॅटलाइट आणि उपग्रहांचं नुकसान होऊ शकतं. या निरुपयोगी तुकड्यांमुळे अवकाशातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रालाही धोका निर्माण झाला आहे.
तसेच 2023 सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो यूनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry एकत्र आले आहेत.
तर येत्या काळात ‘लाकडी सॅटलाइट’ तयार करण्यासाठी जपान प्रयत्न करत आहे.
जपानने अंतराळातील प्रदुषणावर मात करण्यासाठी लाकडी सॅटलाइट तयार करण्यावर काम सुरू केलं आहे.
तापमानात होणारे बदल आणि सूर्याच्या प्रखर किरणांना झेलू शकेल इतक्या क्षमतेचा सॅटलाइट तयार करण्यात येत आहे.
तसेच यासाठी पृथ्वीवरील विविध परिस्थितींमध्ये लाकडाचे परिक्षण केले जात आहे.
लाकडी सॅटलाइट त्यांचं अवकाशातील काम पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर परतत असताना पूर्णपणे जळून राख होतील आणि त्याचे कोणतेही अवशेष अवकाशात राहणार नाहीत, यावर संशोधन केलं जात आहे.
चीनचे बॉटल वॉटर किंग शानशान बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
चीनचे के झोंग शानशान आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
भारताचे मुकेश अंबानी आणि चीनचे जैक मा आणि इतर श्रीमंतांना मागे टाकत त्यांनी हे स्थान पटकावलं आहे.
ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, शानशान यांची एकूण संपत्ती ७०.९ अब्ज डॉलरपासून ७७.८ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे.
याप्रकारे शानशान जगातील ११ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
मुकेश अंबानी यांच्यासाठी देखील हे वर्ष चांगलं गेलं. त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे.
अंबानी यांची एकूण संपत्ती १८.३ अब्ज डॉलरपासून ७६.९ अब्ज डॉलर झाली आहे. तर जैक मा यांची एकूण संपत्ती ५१.२ अब्ज डॉलर आहे.
कायदेशीर गर्भपाताच्या विधेयकाला अर्जेटिनामध्ये मंजुरी
गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या अर्जेटिनामधील महिलांच्या चळवळीला अखेर यश मिळाले असून अर्जेटिनाच्या सिनेटने कायदेशीर गर्भपात विधेयकाला मंजुरी दिली आहे.
तर या विधेयकाच्या बाजूने 38 मते पडली तर विरोधात 29, तर एक जण गैरहजर होते.
तसेच 14 आठवडय़ांपर्यंतचा गर्भपाताला तसेच बलात्काराच्या प्रकरणातील आणि मातेच्या जिवाला धोका असल्यास गर्भपाताला मंजुरी देण्यात आली आहे.
वाणिज्यिक बँकात ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’लागू
रिझव्र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत.
तर 50,000 रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता 2020 मध्ये अंमलात आली.
सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे.
एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली 2,000 रुपयांची मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.