Current Affairs 02 June 2020
आता भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश
- भारत आता जगतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईत उत्पादक देश बनला आहे. आतापर्यंत देशात 300 मोबाईल निर्मिती युनिट्स सुरू झाले आहेत, अशी माहिती कायदा आणि न्याय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सोमवारी दिली.
- भारत 330 मिलियन मोबाईल फोन तयार करण्यात आले आहेत. 2014मध्ये देशात 60 मिलियन स्मार्टफोन तयार करण्यात आले होते. तेव्हा केवळ 2 मोबाईल निर्मिती युनिट भारतात होते. 2014मध्ये भारतात तयार झालेल्या मोबाईल फोनची किंमत 3 बिलियन डॉलर होती. तर आता 2019मध्ये ही किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते आज इंडियन इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित नव्या योजनेची घोषणा करणार आहेत. सॅमसंगने नोएडामध्ये बनवली जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी –
- सॅमसंगदेखील भारतातच फोन तयार करो. सॅमसंगने नोएडामध्ये मोबाईल तयार करणारे जगातील सर्वात मोठे मोबाइल युनिटदेखील तयार केले आहे. याशीवा आता हळू-हळू अनेक कंपन्या भारतात मोबाईलचे उत्पादन सुरू करणार आहेत
‘मुडीज’कडून भारताच्या पतमानांकनात घट
- करोना आणि टाळेबंदीमुळे देशाचा अर्थप्रवास बिकट ठरणार आहे. अमेरिकी मूडीजने भारताचे पतमानांकन खाली खेचतानाच देशाला कमी विकास दर व सरकारला वाढत्या वित्तीय तुटीचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला आहे.
- देशाच्या गुंतवणूकविषयक आवश्यक अशा वातावरणासाठीचे सार्वभौम पतमानांकन मूडीजच्या गुंतवणूक सेवा विभागाने सध्याच्या बीएए२ वरून बीएए३ असे कमी केले आहे. करोना संकटाचे आव्हान पेलण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनांच्या निर्धोक अंमलबजावणीबाबतही मूडीजने शंका उपस्थित केली आहे.
- मूडीजने यापूर्वी, नोव्हेंबर २०१७ मध्ये भारताचे पतमानांकन बीएए३वरून बीएए२ असे उंचावले होते. तब्बल १३ वर्षांच्या कालावधीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सुधारणा झाल्याचे मत याद्वारे मांडण्यात आले होते. भारताचा चालू वित्त वर्षांचा विकास दर शून्याखाली राहण्याचा अंदाज अनेक वित्तसंस्था, दलालीपेढय़ा तसेच पतमानांकन संस्थांनी व्यक्त केला आहे. गेल्या वित्त वर्षांत भारताची अर्थप्रगती गेल्या ११ वर्षांच्या सुमार स्थितीतील राहिल्याचे गेल्याच आठवडय़ातील आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.
शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सरकारनं १४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. करोना संकटाच्या काळातही शेतकऱ्यांनी न थांबता धान्य पिकवलं, असं म्हणत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकऱ्यांचं कौतुक केलं. १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना खर्चापेक्षा ५० ते ६० चक्के अधिक उत्पन्न मिळणार असल्याचंही तोमर म्हणाले. दरम्यान,मक्याच्या आधारभूत किंमतीत ५३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर तूर, मूग यांच्या आधारभूत किंमतीत ५८ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
- ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आहे, त्यांना कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी वाढवून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत या रकमेची परतफेड करता येणार आहे. शेतकऱ्यांनी करोना कालावधीत केलेल्या उत्पादनापैकी ३६० लाख मेट्रिक टन गहू आणि १६.०७ लाख मेट्रिक टन डाळ सरकारनं खरेदी केल्याचंही तोमर यांनी स्पष्ट केलं.
मे महिन्यात बेरोजगारीचा दर २३.४८ टक्क्यांवर
- देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, देशातील बेरोजगारीचा दर २३.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) ने जाहीर केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.
- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दरम्यान, बेरोजगारीच्या दरामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एप्रिलमध्यी २३.५२ टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यामध्ये बेरोजगारीच्या दरामध्ये किंचीतशी घट झाली आहे.