Current Affairs : 02October 2020
सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. ‘ब्रह्मोस’ हे भारताचे सर्वात अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे.
भारत आणि रशियाने मिळून या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओच्या पीजे-१० प्रकल्पातंर्गत ही चाचणी करण्यात आली.
हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ३०० किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र.
या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक असेल.
चांदोबाचे चित्रकार के. सी. शिवशंकर कालवश
मुलांसाठी असलेल्या ‘चांदोबा’ मासिकातील विक्रम आणि वेताळच्या चित्रांसाठी ओळखले जाणारे चित्रकार के. सी. शिवशंकर यांचे बुधवारी निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते.
मूळचे तेलुगु नियतकालिक असलेल्या ‘चंदामामा’ मासिकाची स्थापना चित्रपट निर्माते बी. नागी रेड्डी व चक्रपाणी यांनी १९४७ साली केली होती.
मुलांमध्ये प्रचंड लोकप्रियता लाभल्याने हे मासिक नंतर १३ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागले.
या प्रकाशनाच्या मूळ डिझायनर चमूतील शिवशंकर हे अखेरचे सदस्य होते.
१९४६ साली यात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘कलाईमगल’ या तमिळ मासिकात काम सुरू केले.
१९५२ साली ते चंदामामा मासिकात रुजू झाले आणि २०१२ साली या मासिकाचे प्रकाशन बंद होईपर्यंत ६० वर्षे त्यांनी यात चित्रे काढण्याचे काम केले. त्यानंतर ते रामकृष्ण विजयम मासिकात काम करू लागले.
शिवशंकर यांनी चंदामामा मासिकात महाभारत व रामायणातील कथांसह अनेक कथांसाठी चित्रे काढली, मात्र ‘विक्रम आणि वेताळ’ मालिकेसाठी काढलेल्या चित्रांमुळे त्यांना ख्याती मिळाली.
एका हातात तलवार घेतलेल्या आणि खांद्यावर शव घेऊन जाणाऱ्या विक्रम राजाचे चित्र चंदामामा मासिकाच्या वाचकांच्या नेहमी स्मरणात राहील.
फुटबॉल : बायर्न म्युनिच क्लबने आठव्यांदा जर्मन कप पटकावला
बायर्न म्युनिचने डॉर्टमंडला ३-२ ने पराभूत करत जर्मन सुपर कप किताब जिंकला. कोरेंटिन टॉलीसो (१८ वा मि.), थॉमस मुलर (३२ वा मि.) व जाेशुअाने (८२ वा मि.) विजय निश्चित केला.
८२ क्लबने विक्रमी आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली. क्लबचा यंदा सत्रातील हा पाचवा किताब ठरला. बायर्नने बुंदेसलिगा, यूएफा चॅम्पियन लीग, यूएफा सुपरकप, जर्मन कप जिंकला आहे.