---Advertisement---

चालू घडामोडी : ०३ एप्रिल २०२०

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Current Affairs 03 April 2020

पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू

पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी (किर्तनकार) काम केलेल्या व्यक्तीचा करोनानं मृत्यू झाला आहे. पंजाबच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

जागतिक कुस्ती क्रमवारी : बजरंगची दुसऱ्या स्थानी झेप

Untitled 26 1

भारताचा अव्वल कु स्तीपटू बजरंग पुनिया याने नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक कुस्ती क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र रँकिंग गुण मिळवणाऱ्या स्पर्धामध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला तरी पुढील वर्षीच्या टोक्यो ऑलिम्पिकपर्यंत बजरंग ६५ किलो वजनी गटात चौथ्या क्रमांकावर असेल, याची खात्री त्याला वाटत आहे.
रशियाचा ऑलिम्पिक विजेता गाझीमुराद राशीदोव्ह सध्या ६५ किलो गटात चार गुणांच्या फरकाने अव्वल स्थानी आहे. मात्र बजरंग आणि राशीदोव्ह यांनी या गटात आपले स्थान भक्कम के ले आहे. प्रत्येक गटातील अव्वल चार जणांना २०२१ ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे.
बजरंग या वर्षांच्या सुरुवातीला २५ गुणांसह तिसऱ्या स्थानी होता. पण त्याने जागतिक स्पर्धेतील अंतिम फे री गाठणाऱ्या कझाकस्तानच्या दौलत नियाझबेकोव्ह याला मागे टाकू न दुसरे स्थान पटकावले.
जागतिक स्पर्धेत बजरंगने कांस्यपदकासह २५ गुणांची कमाई केली. त्यानंतर मॅटेओ पेलिकोन सीरिज स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून त्याने १६ गुण मिळवले.
५७ किलो गटात रशियाचा झौर उगेव्ह ६० गुणांसह अव्वल स्थानी आहे. दहियाला मात्र अव्वल चार जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी शेवटच्या स्पर्धेत १२ गुणांची आवश्यकता आहे.

आशियाई विकास बँक भारतीय पायाभूत क्षेत्रात करणार १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

आशियाई विकास बँक भारतीय पायाभूत क्षेत्रात १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे
सरकार प्रोत्साहित राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (National Investment and Infrastructure Fund – NIIF) च्या इंडिया फंड ऑफ फंड्स (India Fund of Funds – FoF) च्या माध्यमातून भारताच्या पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आहे.
NIIF म्हणजेच National Investment and Infrastructure Fund
NIIF हा भारताचा पहिला सार्वभौम संपत्ती निधी आहे.
भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये याची स्थापना केली होती. त्याचे मुख्यालय मनिला, फिलीपाईन्सला आहे.

अध्यक्ष
मसात्सुगु असकावा

सदस्यत्व
६८ देश

उद्देश
सामाजिक आणि आर्थिक विकास

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now