चालू घडामोडी : ०३ जानेवारी २०२१
Current Affairs : 03 January 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते
२०२१ चा पहिला दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हितचिंतकांसाठी चांगला ठरला.
कारण, जागतिक नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या डाटा फर्म ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणामध्ये, नरेंद्र मोदी जगातील सर्वात ‘स्वीकारार्ह’ नेते ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींचे ‘अप्रूव्हल रेटिंग’ सर्वाधिक राहिले आहे.
५५ टक्के स्वीकृती रेटिंगसह नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांमध्ये अव्वल ठरलेत.
मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, ७५ टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे.
तर २० टक्के लोकांनी मोदींना विरोध केला. त्यामुळे त्यांची एकूण स्वीकृती रेटिंग ५५ टक्के राहिली.
जगातील इतर देशांच्या नेत्यांच्या तुलनेत मोदींची रेटिंग सर्वाधिक ठरली. संकेतस्थळानुसार, या सर्वेक्षणासाठी भारतात नमुन्यांचा आकडा २ हजार १२६ होता. तर, यामध्ये त्रुटीची शक्यता २.२ टक्के आहे.
‘ICC अवॉर्ड्स ऑफ द डिकेड (2011-2020)’ या पुरस्कारांची घोषणा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्यावतीने ‘ICC अवॉर्ड्स ऑफ द डिकेड (2011-2020)’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
‘ICC मेन्स ODI प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – विराट कोहली.
‘ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द डिकेड’ म्हणून ‘ICC सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार 2020’ याचा विजेता – विराट कोहली.
‘ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – महेंद्रसिंग धोनी.
‘ICC मेन्स टेस्ट प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया).
‘ICC मेन्स T20I प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – रशीद खान (अफगाणिस्तान).
‘ICC विमेन्स प्लेअर ऑफ द डिकेड’, ‘रॅचेल हेहो फ्लिंट पुरस्कार’, ‘ODI प्लेअर ऑफ द डिकेड’ आणि ‘T20I प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्कारांची विजेता – एलिसे पेरी (ऑस्ट्रेलिया).