Current Affairs 03 March 2020
अर्मेनियात ‘मेड इन इंडिया’ला मागणी; ४० दशलक्ष डॉलर्सचा संरक्षण करार
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ अभियानाला मोठे यश मिळाले आहे. कारण रशिया आणि पोलंडला मागे टाकत भारताने अर्मेनियासोबत २८० कोटी (४० मिलियन डॉलर) रुपयांचा संरक्षण करार केला आहे.
या करारानुसार, डीआरडीओद्वारे विकसित आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे (बीईएल) निर्मित चार ‘स्वाती वेपन लोकेटिंग रडार’ युरोपीय देश असलेल्या अर्मेनियाला भारत निर्यात करणार आहे. या व्यवहाराची निर्यात प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अर्मेनियाने भारताकडून ही शस्त्रे घेण्यापूर्वी रशिया आणि पोलंडच्या रडारचीही चाचणी केली होती पण शेवटी त्यांनी भारतीय रडार्सलाच पसंती दिली.
‘स्वाती वेपन लोकेटिंग रडार’ या चार रडारचा हा संरक्षण व्यवहार अयसून हे ५० किमीच्या सीमेमध्ये शत्रूची हत्यारं, मोर्टार आणि रॉकेट सारख्या स्वयंचलित शस्त्रांचा नेमका शोध घेऊ शकते. त्याचबरोबर एकाच वेळी विविध ठिकाणांहून भिन्न शस्त्रांद्वारे डागलेल्या अनेक क्षेपणास्त्राचा शोधही हे रडार घेऊ शकते.
CarabaoCup : एस्टन विलाचा पराभव करत मँचेस्टर सिटीने पटकावले विजेतेपद
मँचेस्टर सिटीने रविवारी एस्टन विलाचा 2-1 असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा लीग कपचे (#CarabaoCup) विजेतेपद पटकावले. वेेम्बली येथे झालेल्या अतिंम सामन्यात मँचेस्टर सिटीने पाच मोसमात चौथ्यांदा लीग कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
मँचेस्टर सिटी संघाकडून सर्जियो अगेरो याने 20 व्या मिनिटाला तर रोड्रिगोने 30 व्या मिनिटाला गोल करत संघास विजय मिळवून दिला. तर, एस्टन विला संघाकडून मवाना समट्टाने 41 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
मध्य प्रदेशात जगातील दुसरे व देशातील पहिले लष्करी संग्रहालय
मध्य प्रदेशातील इंदूरच्या महू येथे देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय साकारत आहे.
यात लष्कराचा १७४७ पासून २०२० पर्यंतचा गौरवशाली इतिहास, शौर्यकथा व शूर सैनिकांचे बलिदान थ्रीडी प्रिंटर व घडवलेले पण सजीव वाटणारे पुतळे, म्यूरल्स व फोटो गॅलरीद्वारे दाखवण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या वर्षी लोकांसाठी तो सुरू करण्याची लष्कराची तयारी आहे. सुमारे दोन एकरात हे संग्रहालय उभे राहात आहे. तीन मजली संग्रहालय असून तीन टप्प्यात काम सुरू आहे. यात पहिल्या टप्प्याचे काम होत आले आहे. येथे १७५७ मध्ये प्लासीची लढाई, बॅटेल ऑफ सारागढी, बॅटल आॅफ बक्सर, भारत-पाक युद्ध १९६५- १९७१, सोबत छत्रपती शिवाजी महाराज व सुभाषचंद्र बोस यांचा इतिहास येथे साकारला आहे.
वज्र: चेन्नई येथे गस्तकरी पेट्रोल वेसल-६ लाँच
चेन्नई येथे ‘वज्र’ या गस्तकरी पेट्रोल वेसल-६ चे लाँचिंग करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाला प्राप्त ७५०० किमी लांबीची किनारपट्टी असणार आहे.
२० लाख चौरस किलोमीटर एक्सक्लुझिव्ह आर्थिक क्षेत्र आहे.
जगभरातून हिंद महासागरामध्ये जाणारी १ लाख व्यापारी जहाजे आहे,
भारत: तटरक्षक दल क्षेत्रे
पश्चिम विभाग (मुंबई)
उत्तर-पूर्व विभाग (कोलकाता)
अंदमान आणि निकोबार प्रदेश (पोर्ट ब्लेअर)
उत्तर-पश्चिम विभाग (गांधीनगर)
पूर्व विभाग (चेन्नई)
तिमाही विकासदर ४.७ टक्के, सात वर्षांच्या नीचांकाला!
रोडावलेल्या निर्मिती क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर सात वर्षांपूर्वीच्या नीचांकपदाला पोहोचला आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ४.७ टक्के राहिल्याचे शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले.
यापूर्वीचा ४.३ टक्के असा किमानतम विकासदर जानेवारी ते मार्च २०१३ या तिमाहीदरम्यान होता. तर या आधीच्या जुलै ते सप्टेंबर २०१९ तिमाहीत तो ४.५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, याच ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीदरम्यान तो ५.६ टक्के असा होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर करताना चालू आर्थिक वर्षांतील यापूर्वीच्या दोन तिमाहीतील विकास दर सुधारून जाहीर केला आहे. त्यानुसार, एप्रिल ते जून २०१९ दरम्यान तो ५ टक्क्यांऐवजी ५.६ टक्के तर जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान तो ४.५ टक्क्यांऐवजी ५.१ टक्के असा होता, असे नमूद करण्यात आले आहे. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत शून्यावर (०.२ टक्के) येऊन ठेपला आहे. वर्षभरापूर्वी, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ मध्ये त्याचा ५.२ टक्के दराने विस्तार झाला होता.
विद्यमान संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी ५ टक्के विकास दराचा पूर्वअंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने कायम ठेवला असून, या कार्यालयाचा हा अंदाज रिझव्र्ह बँकेच्या अंदाजाच्या समकक्षच आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०१९ या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यात सकल राष्ट्रीय उत्पादनाचे प्रमाणही वर्षभरापूर्वीच्या ६.३ टक्क्यांवरून कमी होत ५.१ टक्क्यांवर आले आहे.
गेल्या तिमाहीत कृषी क्षेत्राची वाढ ३.५ टक्के झाली आहे. यात वार्षिक तुलनेत, २ टक्क्यांच्या तुलनेत यंदा वाढ नोंदली गेली आहे.
बांधकाम क्षेत्र वर्षभरापूर्वीच्या ३.२ टक्क्यांवरून थेट ०.३ टक्क्यावर येऊन ठेपले आहे.
पोलाद क्षेत्राची वाढदेखील कमी होत ४.४ टक्क्यांवरून यंदा ३.२ टक्क्यांवर आली आहे. ऊर्जा, वायू, जल पुरवठा तसेच अन्य बहुपयोगी सेवा गटाचा प्रवास गेल्या तिमाहीत ०.७ टक्के नोंदला गेला आहे.