Current Affairs : 03 November 2020
न्यूझीलंडमध्ये प्रथमच भारतीय वंशाची महिला मंत्री
न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.
अर्डर्न यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला त्यात राधाकृष्णन यांचा समावेश आहे.
भारतात जन्मलेल्या राधाकृष्णन ४१ वर्षांच्या असून सिंगापूरला शिकलेल्या आहेत.
नंतरचे शिक्षण न्यूझीलंडमध्ये झाले. त्यांनी घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला. त्या संसदेवर मजूर पक्षाच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये निवडून आल्या.
२०१९ मध्ये त्यांची वांशिक समुदाय खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाली.
त्यानंतर त्यांनी राजकीय जम बसवून काम केले. आता सर्वसमावेशकता व विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या त्या मंत्री झाल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये त्या भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री सतीश सिंह यांचे निधन
बिहारचे सगळ्यात कमी पाच दिवसांचे मुख्यमंत्री झालेले शाेषित समाज दलाचे नेते सतीश प्रसाद सिंह यांचे दिल्लीत निधन झाले.
२८ जानेवारी १९६८ ला काँग्रेसच्या पाठिंब्याने सतीश प्रसाद मुख्यमंत्री झाले हाेते.
साैर ऊर्जेवरची पहिली छोटी रेल्वे केरळात सुरू
साैर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली छाेटी गाडी साेमवारी येथील व्हॅली टुरिस्ट व्हिलेजमध्ये सुरू करण्यात अाली.
पर्यटकांना अांतरराष्ट्रीय सुविधा देण्याच्या प्रकल्पांतर्गत ६० काेटी रुपये खर्च करून ही गाडी बनवण्यात अाली अाहे.
या गाडीच्या तीन डब्यांत ४५ प्रवासी बसू शकतात.