Current Affairs 04 April 2020
महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाची व्हॉट्स अॅपवर कोविड-19 हेल्पलाइन सुरू :
- नागरिकांच्या मनात कोरोना विषाणूसंदर्भात अनेक प्रश्न आहेत. सोशल मीडियावर फॉरवर्ड होणा-या चुकीच्या माहितीमुळे अनेकांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामन्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोशल मीडियाचेच माध्यम निवडले असून, व्हॉट्स अॅपवर स्टेट कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे.
- तर ही सेवा विनामूल्य असून, सध्या पसरलेल्या कोविड-19 साथीबद्दल अचूक, विश्वासार्ह व अद्ययावत माहिती मिळवण्याचा केंद्रीय स्रोत म्हणून ही हेल्पलाइन काम करणार आहे.
- व्हॉट्स अॅपवरील ही कोविड महाराष्ट्र हेल्पलाइन वापरण्यासाठी केवळ +91 20 2612 7394 हा क्रमांक आपल्या फोन कॉण्टॅक्ट्समध्ये सेव्ह करावा आणि मग असा मेसेज या क्रमांकावर पाठवावा. ही हेल्पलाइन सेवा सुरू होईल.
- तसेच ही सेवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांत उपलब्ध होणार आहे. कोविड हेल्पलाइन महाराष्ट्र ही एक स्वयंचलित चॅटबोटसेवा असून, याद्वारे नागरिकांच्या कोरोना विषाणूसंदभार्तील प्रश्नांना सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 24 तासांच्या आत खात्रीशीर उत्तरे दिली जात आहेत.
एअर इंडियाची तिकिट विक्री 30 एप्रिल पर्यंत बंद
- सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं 30 एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली.
- सध्या देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील काय निर्णय होईल याकडे आमचं लक्ष आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.
- तसेच विमान कंपन्या 14 एप्रिल नंतर कोणत्याही तारखेची तिकिट विक्री सुरू करू शकतात.
रविवारी दिवे लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
- करोनाच्या महासाथीविरोधात देशावासीयांना पुन्हा एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरचित्रवाणी संदेशाद्वारे केले.
- रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी लोकांनी आपापल्या घरातील दिवे बंद करावेत व मेणबत्ती, मोबाइलचा दिवा वा बॅटरीचा दिवा लावून दिव्यांचा झगमगाट करावा. हा प्रकाश म्हणजे करोनामुळे पसरलेल्या अंधकाराविरोधातील लढाई असल्याचे मोदी म्हणाले.
- तर करोनाविरोधातील हा नवा सामुदायिक उपक्रम राबवताना लोकांनी घरातून बाहेर पडू नये. आपापल्या घरात-बाल्कनीत दिवे उजळावेत, अशी सूचनाही मोदींनी केली. 22 मार्च रोजी जनता संचारबंदीत पाच मिनिटे थाळी वाजवण्याचे आवाहन मोदींनी केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोकांनी रस्त्यावर उतरून प्रतिसाद दिला होता.