⁠  ⁠

चालू घडामोडी : ०४ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 04 February 2020

भारतीय रेल्वेचा पहिला कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प भुवनेश्वरमध्ये

  • भारतीय रेल्वेचा पहिला कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प भुवनेश्वरमध्ये ,सुरु करण्यात आला आहे.
  • मंचेश्वर कॅरेज दुरुस्ती कार्यशाळा, भुवनेश्वर येथे हा सुरु केला आहे.
  • पूर्व किनारा रेल्वे झोन

जागतिक बुद्धिबळ क्रमवारी : विदीत दुसऱ्या स्थानी

c 10

– विश्वनाथन आनंद याच्यानंतर पेंटाल्या हरिकृष्ण याने भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू म्हणून गेली अनेक वर्षे मान पटकावला होता.
पण नाशिकचा युवा ग्रँडमास्टर विदीत गुजराथी याने हरिकृष्णला मागे टाकत दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे.
अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार, विदीतने २७२१ एलो रेटिंग गुणांसह भारतीयांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. पाच वेळचा जगज्जेता आनंद २७५५ गुणांसह अव्वल स्थानी आहे. हरिकृष्णला २७१३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत जगज्जेता मॅग्नस कार्लसन अग्रस्थानी विराजमान आहे. तर आनंद १५व्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’चा ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार पटकावणाऱ्या विदीतने २०१९मध्ये खेळलेल्या ७५ क्लासिकल सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत २६९५वरून २७२१ एलो रेटिंग गुणांवर झेप घेतली आहे.
बाएल मास्टर्स आणि टाटा स्टील या दोन बुद्धिबळ स्पर्धामध्ये विदीतने घसघशीत एलो रेटिंग गुणांची कमाई केली. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत विदीतने व्लादिमिर क्रॅमनिक आणि शाखरीयार मामेद्यारोव्ह यांना पराभवाचा धक्का देत १६ एलो रेटिंग गुण मिळवले. विशेष म्हणजे तब्बल १६ बुद्धिबळपटूंनी २६००पेक्षा जास्त रेटिंग गुणांची कमाई केली आहे. त्यापैकी पाच बुद्धिबळपटू अवघ्या २२ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

सुरजकुंड मेळा, २०२०: जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा

२०२० सालचा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा सुरजकुंड मेळा सुरु करण्यात आले. फरिदाबाद, हरियाणा या ठिकाण असणार आहे.
आवृत्ती ३४ वा असणार, भागीदार देश -उझबेकिस्तान, थीम राज्य – हिमाचल प्रदेश,.

मेरठ येथे प्राण्यांसाठीचे पहिले युद्ध स्मारक नियोजित

मेरठ येथे प्राण्यांसाठीचे पहिले युद्ध स्मारक नियोजित

मेरठ येथे प्राण्यांसाठीचे पहिले युद्ध स्मारक नियोजित करण्यात आलं आहे. प्राण्यांसाठीचे हे पहिले युद्ध स्मारक असणार आहे. ही योजना भारत सरकार द्वारे नियोजित असणार आहे. विशेषता भारताचे पहिले प्राण्यांसाठीचे युद्ध स्मारक आहे. यांची उभारणी केंद्र रिमाउंट आणि पशुवैद्यकीय केंद्र (Remount and Veterinary Corps – RVC) केंद्र आणि महाविद्यालय, मेरठ.

जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे तेलंगणामध्ये उद्घाटन

जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे तेलंगणामध्ये उद्घाटन

तेलंगणामध्ये जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आयोजक हार्टफुलनेस संस्था जागतिक मुख्यालय, हैदराबाद.
या ध्यानाची क्षमता १ लाख इतकी आहे. यात ८ बाह्य इमारती आहे. शारीरिक महत्व दृष्ट्या रचनेत उपयुक्तता वाढवणे हा केंद्रचे उद्देश आहे.

Share This Article