Current Affairs 04 July 2020
ज्येष्ठ कॅरम संघटक जनार्दन संगम यांचे निधन
ज्येष्ठ माजी कॅरमपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम यांचे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
संगम यांनी खेळाडू म्हणून नेव्हल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व केले. परंतु खेळापेक्षा त्यांनी संघटनेची कार्ये करण्यास अधिक पसंती दिली. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रमुख पंचांची भूमिका बजावणाऱ्या संगम यांनी तांत्रिक अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
१९९२ ते २०१९ या २७ वर्षांच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या कार्यकारिणीवर संयुक्त सचिव पद सांभाळले. तसेच संघटनेचे माजी सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. त्याशिवाय कॅरमच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रे आणि क्रीडा वाहिन्यांद्वारे त्यांनी अमूल्य योगदान दिले.
लॉकडाऊनमुळे जीडीपी घटणार ६.४ टक्के
- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे अर्थव्यवस्था अद्यापही पूर्ण क्षमतेने कार्य करू शकत नाही. यामुळे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ६.४ टक्के घट होण्याची शक्यता आहे.
- केअर रेटिंग्ज या रेटिंग एजन्सीने याबाबतचा अंदाज जाहीर केला आहे. मे महिन्यात याच संस्थेने देशातील एकूण राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) १.५ ते १.६ टक्के कमी होण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने अर्थव्यवस्थेवर त्याचे अधिक गंभीर परिणाम होत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
- मे महिन्यात केअर या एजन्सीने भारतीय अर्थव्यवस्थेमधील घसरण १.५ ते १.६ टक्के राहाण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मे महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊन संपून व्यवहार सामान्य स्थितीत येण्याची अपेक्षा गृहीत धरून हा अहवाल तयार केला गेला होता. मात्र लॉकडाऊनचा कालावधी आणखी दोन महिन्यांनी वाढल्याने अर्थव्यवस्थेतील घसरण आणखी तीव्र झालेली दिसून येत आहे. सन २०१९-२० या वर्षात अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ४.२ टक्के राहिला असून, तो दशकातील नीचांकी पोहोचला आहे. यावर्षात अर्थव्यवस्थेमध्ये वाढीऐवजी घटच होण्याचा अंदाज आहे.
- केवळ कृषिक्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा
- चालू आर्थिक वर्षात केवळ कृषी आणि सरकारी उद्योगांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
- लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे देशातील हॉटेल, पर्यटन, मनोरंजन या क्षेत्रामधील कामकाज सुरू होण्यास विलंब होत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असून, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याला विलंब लागण्याची शक्यता आहे.
- चलनवाढीचा दर जाणार ५ टक्क्यांवर
- चालू आर्थिक वर्षात देशातील एकूण राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे देशाचा जीडीपी ६.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची दाट शक्यता वाटत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
- जीडीपीमध्ये तीव्र घसरण झाल्यामुळे देशातील उत्पादनही कमी होणार आहे. त्याचप्रमाणे देशातील चलनवाढीचा दर ५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती असल्याचे केअरने या अहवालात नमूद केले आहे.
- चलनवाढ झाल्याने सरकारची अर्थसंकल्पीय तूट वाढणार आहे. सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात तूट जीडीपीच्या ३.५ टक्के राहण्याचा अंदाज केला आहे. मात्र, सध्याची स्थिती बघता चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तूट
भारतीय रेल्वेनं 2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे
- गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. तर काळाप्रमाणे रेल्वेही बदलत आहे.
- नुकताच भारतीय रेल्वेनं 8.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे. या मालगाडीला रेल्वेनं शेषनाग असं नाव दिलं आहे.
- भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रेल्वेगाडी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
- भारतीय रेल्वेनं रेषनाग या मालगाडीला चार मालगाड्यांचे डबे एकत्र जोडून तयार केली आहे. या मालगाडीत एकूण 251 डबे जोडण्यात आले होतं.
- तसंच ही मालगाडी खेचण्यासाठी सात इलेक्ट्रिक इंजिनही लावण्यात आली होती. सुरूवातीला तीन आणि मध्यभागी चार अशा इंजिनच्या मदतीनं ही रेल्वे चालवण्यात आली.
फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा
- फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. हा फेरबदल अपेक्षित मानला जात होता.
- अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कारकीर्दीत नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले असून फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे.
तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन
- गाण्यांच्या कोरिओग्राफर सरोज खान (७१) यांचे निधन झाले.
- सरोज खान जन्म १९४८ मध्ये मुंबईत झाला. त्यांचे कुटुंब फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आले होते.
- अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून ‘नजराणा’ चित्रपटांतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. नंतर नायिकेच्या मागे बॅकग्राउंड डान्सर म्हणून अनेक गाण्यांमध्ये जुन्या काळातील प्रसिद्ध नायिकांमागे सरोज खान दिसल्या.
- १९७४ मध्ये त्यांनी प्रथमच ‘गीता मेरा नाम’ चित्रपटांत नृत्य दिग्दर्शन केले. १९८७ मध्ये ‘मि. इंडिया’ चित्रपटातील श्रीदेवीचे हवा हवाई गाणे तसेच माधुरी दीक्षितसोबत धक धक करने लगा, एक दो तीन, चोली के पिछे क्या है, डोला रे डोला अशी अनेक गाणी सुपरहिट झाली. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.