Current Affairs 04 June 2020
लोकप्रिय सीएम यादीत उद्धव ठाकरे ५ व्या स्थानी
- आयएएनएस आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेक्षणामध्ये देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थान पटकावले आहे. उद्धव यांना ७२.५६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली असून देशातील ५ व्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपशासित राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही.
- ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. ८२.९६ टक्के लोकांनी पटनायक यांच्या कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटले आहे. त्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (८१.०६ टक्के), तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (८०.२८) यांचा समावेश आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर असण्याचा मान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (७८.५२ टक्के) यांना मिळाला आहे.
- पाचव्या स्थानावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांचे नाव आहे. केजरीवाल यांना ७४ टक्के मते आहेत.
- हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर सर्वात कमी लोकप्रिय
- सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरयाणाचे मनोहर लाल खट्टर (४.४७ टक्के मते), उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (१७.७२) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (४२.७९) या तीन भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. तळाच्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (३०.८२) आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (२७.५१) यांचा समावेश आहे.यादीत भाजपशासित राज्यांच्या एकाही मुख्यमंत्र्यांना स्थान नाही
एक देश एक बाजार धोरणाला मंजुरी
- शेतीमाल देशभर कुठेही विकण्याची मुभा देणाऱ्या ‘एक देश एक बाजार’ या धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- तर या संदर्भातील अध्यादेश काढला जाणार असून आत्मनिर्भर भारत योजनेचा तपशील जाहीर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या धोरणाचा उल्लेख केला होता.
- तसेच शेतकऱ्यांना आता स्थानिक कृषी बाजारावर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे शेतीमालाला जिथे अधिक दर मिळेल तिथे विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळेल, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
- आत्ता शेतकऱ्यांना कृषी बाजारात शेतीमाल विकावा लागतो. शिवाय, आंतरराज्य विक्रीलाही परवानगी नाही. पण नव्या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल कुठेही व कुणालाही विकता येईल. या संदर्भात नवा कायदा केला जाईल. मात्र, विद्यमान कृषी बाजार समित्या अस्तित्वात राहणार आहेत.
- तर या नव्या धोरणामुळे फक्त अडत्यांना शेतीमालाची विक्री करण्याचे बंधन शेतकऱ्यांवर राहणार नाही. या बाजारांबाहेर अन्नप्रक्रिया कंपन्यांनाही शेतकऱ्यांना शेतीमाल विकता येईल.
- शेतीमालाच्या विक्रीसंदर्भात हंगामापूर्वी कंपन्यांशी करार करता येईल. या करारातील दरांच्या आधारावर शेतीमालाची विक्री केली जाऊ शकेल. या विक्रीवर कोणत्याही प्रकाराचा कर व शुल्क आकारणी केली जाणार नाही.
- प्रक्रिया उद्योग कंपनी, निर्यातदार, मोठे घाऊक व्यापारी, ई-व्यापार करणाऱ्या कंपन्या अशा शेतीमाल विक्रीशी निगडित विविध क्षेत्रांशी शेतकरी विक्री करार करू शकतील.
6 जूनला अस्मानी संकटाचा नासाने दिला इशारा
- पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकणारी एकी एक लघुग्रह (अॅस्टेरॉईड) पृथ्वीजवळून जाणार असल्याचा इशारा अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने दिला आहे.
- जून महिन्यामध्ये हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असून यासंदर्भातील माहिती नासानेच आपल्या वेबसाईटवर दिली आहे.
- तर या लघुग्रहाचे नाव ‘163348 (2002 एनएच फोर)’ असं असल्याचे नासाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
- सहा जून रोजी हा लघूग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असून त्याचा व्यास 250 ते 570 मीटर इतका असल्याचं नासानं म्हटलं आहे.
- ‘163348 (2002 एनएच फोर)’ हा लघुग्रह पृथ्वीपासून 5.1 दशलक्ष किमी दूरून जाणारा असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे.