---Advertisement---

चालू घडामोडी : ०४ मार्च २०२१

By Chetan Patil

Published On:

current affairs 04 march 2021
---Advertisement---

ICC T20I Ranking

ICC Ranking for T20 teams International Cricket Council

आयसीसीकडून फलंदाजांसाठीची टी २० रँकिंग जारी करण्यात आली
यादीमध्ये विराट कोहलीने ६९७ पॉइंटसह ६व्या स्थानी झेप घेतली आहे. याआधी विराट कोहली सातव्या स्थानावर होता.
त्यासोबतच के एल राहुलने ८१६ पॉइंटसह आपले दुसरे स्थान कायम राखले आहे.
या यादीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये दोन भारतीय फलंदाजांचा समावेश असून, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे देखील प्रत्येकी २ फलंदाज आहेत.
याशिवाय, पाकिस्तान, द. आफ्रिका, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या प्रत्येकी एका फलंदाजाचा यादीत समावेश आहे.
यादीमध्ये सर्वात वर इंग्लंडचा डेविड मलन असून त्याच्या नावावर ९१५ पॉइंट आहेत.

---Advertisement---

जगातील पहिले सुपरसॉनिक ड्रोनArrow, a supersonic combat drone that can be used autonomous or remotely, is introduced - Buss The World

हे जगातील पहिले सुपरसॉनिक ड्रोन ‘अॅरो’ आहे. या मानवरहित लढाऊ ड्रोनचा वापर टेहळणी मोहिमेत होतो.
सिंगापूरच्या कॅली एअरोस्पेसच्या या ड्रोनची सुरुवातीची किंमत ६५ कोटी रुपये आहे

नीरा टंडेन यांची व्हाइट हाउस बजेट चीफ पदावरून माघारnira tendon

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नियुक्‍ती केलेल्या भारतीय वंशाच्या नीरा टंडेन यांनी व्हाइट हाउसच्या बजेट चीफ पदावरून माघार घेतली आहे.
व्हाइट हाउसच्या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालक म्हणून त्यांची नियुक्‍ती नामनिर्देशित करण्यात आली होती.
बायडेन यांनी नामांकन केलेल्या 23 मंत्र्यांच्या नियुक्‍तीमधील हाय प्रोफाईल नियुक्‍तीतून माघार घेण्याची पहिली नामुष्की बायडेन प्रशासनावर ओढवली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now