Current Affairs : 04 November 2020
विख्यात पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे निधन
मध्य पूर्वेतील वार्ताकनात निष्णात मानले गेलेले प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे डब्लिन येथे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
मध्य-पूर्वेतील संघर्षग्रस्त भागात राहून त्यांनी वार्ताकन केले होते.
नामवंत पत्रकार अशा शब्दांत दी इंडिपेंडंटने त्यांचा गौरव केला आहे.
अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन याची अनेकदा मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांपैकी ते एक होते.
११ सप्टेंबर २०११ रोजीच्या हल्लय़ानंतर ते पाकिस्तान अफगाण सीमेवर गेले होते. तेथे अफगाणी शरणार्थीनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
अमेरिकेतील सहावीच्या अभ्यासक्रमात भारताचे पायेंग यांच्या जीवनावर आधारित धडा
भारताचे वनपुरुष म्हणजेच ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जादव यांनी एकट्याने संपूर्ण जंगल उभारलं आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. पायेंग यांच्या या कामाची दखल आता थेट पाश्चिमात्य देशांकडून घेण्यात येत आहे.
अमेरिकेतील एका अभ्यासक्रमामध्ये भारताचे पायेंग यांच्या कार्याबद्दल माहिती देणाऱ्या एका धड्याचा समावेश करण्यात आला आहे.
कनेक्टीकटमधील ब्रिस्टोल येथील ग्रीन हिल्स स्कूलने सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कामासंदर्भातील धड्याचा समावेश केला आहे.
इकोलॉजी म्हणजेच पर्यावरणशास्त्रामध्ये या धड्याचा समावेश करण्यात आला आहे.
आता येथील मुलं पद्मश्री पुरस्कारप्राप्त पायेंग यांच्या कार्याबद्दल शिकणार आहेत.
जगभरामध्ये पर्यावरणासंदर्भात अनेक गोष्टी घडत असतानाच वातावरणातील बदलांसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहण्यासंदर्भात लहान मुलांना शालेय वयामध्येच शिक्षण देण्याच्या उद्देशाने जगभरामध्ये प्रयत्न सुरु आहेत.
अशा मुलांसमोर वयाच्या १६ वर्षापासूनच पर्यावरण संरक्षणाचे काम करणाऱ्या पायेंग यांच्यापेक्षा अधिक चांगले उदाहरण कोणाचे असू शकते. पायेंग यांच्या कार्याने मुलांनाही प्रेरणा मिळेल या उद्देशाने त्यांच्या आयुष्यावरील धड्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.
मलबार-20: बहुपक्षीय सागरी कवायत
मलबार’ सागरी कवायतीच्या 24 व्या आवृत्तीचे आयोजन नोव्हेंबर 2020 दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.
पहिला टप्प्याचे आयोजन दि. 3 ते 6 नोव्हेंबर 2020 मध्ये होणार आहे. विशाखापट्टणम येथे बंगालच्या खाडीत ही संयुक्त कवायत होणार आहे.
द्वितीय टप्प्याचे आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या मधात अरबी सागरात करण्यात येणार आहे.‘मलबार 20’ याच्या पहिल्या टप्प्यात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नौदलांची पथके सहभागी होणार आहेत.
कवायतीमध्ये भारतीय नौदलाच्यावतीने विनाशक रणविजय, युद्ध नौका शिवालिक, तैनाती जहाज सुकन्या, पुरक जहाज शक्ती आणि पाणबुडी सिंधुराज यांचा सहभाग असणार आहे. याच्याच जोडीला अत्याधुनिक जेट ट्रेनर हॉक, लांब पल्ल्याचे तैनाती पी-81, डॉर्नियर आणि हेलिकॉप्टर यांचाही सहभाग संयुक्त कवायतीमध्ये असणार आहे.