---Advertisement---

चालू घडामोडी : ०४ सप्टेंबर २०२०

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Current Affairs : 04 September 2020

भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलाय जगातील सर्वात मोठा सोलर ट्री

solar tree copy copy

काही वर्षांपासून सौर ऊर्जा वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. सर्व क्षेत्रात याचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यातच आता भारतीय शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात मोठं यश मिळावलं आहे.
पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये सीएसआयआर – सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने (सीएमईआरआय) त्यांच्या निवासी संकुलात सोलर ट्री बसवलं आहे. हा जगातील सर्वात मोठा सोलर ट्री आहे.
या सोलर ट्रीमधून ११.५ वॅटपेक्षा अधिक ऊर्जा निर्माण होईल. म्हणजेच वर्षाला १२,००० ते १४,००० स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्माण होईल. यातील सोलर ट्रीमध्ये ३५ फोटोव्होल्टाईक पॅनल लावले आहे.
यातून प्रत्येकी ३३० वॅट ऊर्जा निर्माण होते, अशी माहिती सीएसआयआर – सीएमईआरआयचे संचालक हरीश हिरानी यांनी दिलीये.
या सोलर ट्रीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला खूप मदत होणार आहे.
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (पीएम-केएसयुएसयुएम) या योजनेअंतर्गत हे उपलब्ध केलं जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. हे सोलर ट्री कार्बनडाय ऑक्साईडचे १० ते १२ टन उत्सर्जन थांबवणार आहे. याची किंमत ७.५ लाख रुपये आहे.

भारतीय सैनिकांना मिळणार AK-47 203

AK 47 203 1

भारत आणि रशियाने अद्ययावत AK-47 203 रायफलींची डील फायनल केली आहे.
जुन्या मॉडेलपेक्षा ही रायफल हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये, लडाखसारख्या किंवा कारगिलसारख्या उंच ठिकाणी लढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. यामुळे उंचीवर लपलेल्या शत्रूच्या सैनिकांना खालूनच अचूक टिपता येणार आहे.
रशियाचे चॅनल स्पूतनिक न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सैन्याला 7.7 लाख रायफली हव्या आहेत. यापैकी एक लाख रायफली रशियात बनविल्या जाणार असून उर्वरित भारतात बनविल्या जाणार आहेत.
या रायफलींचे निर्माण इंडो-रशिया प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL) मध्ये केले जाणार आहे. हा सहकार्य करार कलाश्निकोव्ह आणि रोसोबोरोनएक्सपॉर्ट सोबत करण्यात आला आहे.

नाणेनिधीचे भाकीत ; अर्थव्यवस्थेचा पाय आणखी खोलात जाणार

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ नव्हे तर अधोगती झाली.एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकासदर (GDP) उणे २३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला.
दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी खोलात जाईल, असा भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) व्यक्त केले आहे.
देशात जवळपास अडीच महिने कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात देशात उद्योगधंदे ठप्प पडले. बेरोजगारी वाढली. देशांतर्गत वस्तूंचा खप कमी झाला. यामुळे वृद्धीला खीळ बसली.
यावर नजर असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दुसऱ्या तिमाहीतील विकासदराचे केलेले भाकीत धडकी भरवणारे आहे.
दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी हा उणे २५.६ टक्के इतका खाली घसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आतापर्यंतची जीडीपीतील ही ऐतिहासिक घसरण असेल, असे नाणेनिधीने म्हटलं आहे.
नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्या मते चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी जी-२० समूहात सर्वात कमी राहील.
अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजनुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर उणे १०.९ टक्के इतका राहील, असे म्हटलं आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

2 thoughts on “चालू घडामोडी : ०४ सप्टेंबर २०२०”

Comments are closed.