Current Affairs 05 December 2019
‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचाई यांची नियुक्ती
गुगलची मुख्य मातृकंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ‘गुगल’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगल कंपनीचे संस्थापक लॅरी पेज व सर्जेई ब्रिन हे अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष या पदावरून पायउतार होत असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले होते.
पिचाई (वय ४७) हे सध्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून अनेक वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. आता ते अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतील.
पिचाई हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एका शक्तिशाली पदावर पोहोचले आहेत. ड्रोन, इंटरनेट बिमिंग बलून, जाहिराती, स्मार्टफोन सॉफ्टवेअर, नकाशे, ऑनलाइन व्हिडिओ या सर्व सेवांची सूत्रे त्यांच्या हातात असतील.
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं आहे. दरम्यान, या विधेयकाची आता राज्यसभेत कसोटी लागणार आहे. कलम ३७० रद्द करणाऱ्या विधेयकाप्रमाणेच नागरिकत्व दुरूस्ती विधेयकही महत्त्वाचं असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीदरम्यान व्यक्त केलं होतं.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित झाल्यास इतर देशांमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीय नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळवणं सोपं होणार आहे. मुस्लीम बहुल देशांमध्ये इतर धर्माच्या लोकांवर अन्याय होतो. त्यामुळे अशा लोकांना भारतात येणं शक्य होणार आहे. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकामध्ये मुस्लीम धर्माचा समावेश नसेल. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाची राज्यसभेत आता कसोटी लागणार आहे. यापूर्वी विरोधी पक्षांनी नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला विरोध केला होता.
नागरिकत्व विधेयकातील अधिनियम १९५५ मध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. नागरिकत्व अधिनियम १९५५ नुसार भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी १४ वर्षांपैकी ११ वर्ष भारतात राहणे बंधनकारक आहे. परंतु या अधिनियमातील दुरूस्तीनंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तानमधील नागरिकांसाठी ही मर्यादा १४ वर्षांवरून कमी करून ६ वर्षे करण्यात आली आहे.
पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; १००० किलोची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता
भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची दि. ४ रोजी रात्री यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या बालासोर येथील प्रक्षेपण केंद्रावरुन ही चाचणी करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे ही चाचणी घेण्यात आली.
यापूर्वी, याच ठिकाणाहून २० नोव्हेंबर रोजी पृथ्वी-२ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. काल झालेल्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असून त्याने सर्व आवश्यक मानकं पूर्ण केली आहेत. या क्षेपणास्त्रामध्ये ५०० ते १००० किलो वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे.
या क्षेपणास्त्रामध्ये लिक्विड प्रोपल्शन इंजिन वापरण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किमीपर्यंत आहे. यामध्ये अॅडव्हान्स गाईडन्स सिस्टिमही बसवण्यात आली आहे. ही यंत्रणआ आपल्या लक्ष्याचा अचूनकतेने वेध घेते.
पृथ्वी क्षेपणास्त्र सन २००३ पासून अद्यापपर्यंत भारतीय लष्कराला सेवा पुरवत आहे. डीआरडीओद्वारे निर्माण करण्यात आलेले हे पहिले क्षेपणास्त्र आहे.
इंग्लंडचे माजी कर्णधार बॉब विलिस यांचे निधन
सहा फूट, सहा इंच उंचीचे वेगवान गोलंदाज आणि इंग्लंडचे माजी कर्णधार बॉब विलिस यांचे बुधवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
विलिस यांनी वयाच्या २१व्या वर्षी १९७१च्या अॅशेस मालिकेत पदार्पण केले. अॅलन वॉर्डला दुखापत झाल्यामुळे विलिस यांना ही संधी चालून आली. मग ते मालिकेतील उर्वरित चारही सामने खेळले. इंग्लंडने सात सामन्यांची ती मालिका २-० अशी जिंकली होती. १९७१ ते १९८४ या कालावधीतील ९० कसोटी सामन्यांत ३२५ बळी मिळवले. १९८१च्या हेडिंग्ले येथील ऐतिहासिक कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर मात केली.
आर्थर श्रीलंकेचे नवे प्रशिक्षक
दक्षिण आफ्रिकेच्या मिकी आर्थर यांची पुढील दोन वर्षांकरिता श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकपदावर निवड करण्यात आली आहे. सध्याचे प्रशिक्षक चंद्रिका हथुरूसिंघा यांच्याकडून ते प्रशिक्षकपदाची सूत्रे घेतील.
याचप्रमाणे मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी ग्रँट फ्लॉवर फलंदाजी प्रशिक्षक असतील, तर डेव्हिड सेकर गोलंदाजीचे प्रशिक्षक असतील. श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच शेन मॅकडरमॉट यांनी सांभाळली आहे. महिन्याअखेरीस श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून, यावेळी आर्थर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येईल.
ICC Test Ranking : विराट कोहली कसोटी क्रमावरीतील नंबर वन
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्यामध्ये कसोटी क्रमावरीतील नंबर वनच्या शर्यतीत भारताच्या विराट कोहलीनं बाजी मारली आहे. विराट कोहलीनं ९२८ अंकासह अव्वलस्थानी पुन्हा एकदा झेप घेतली आहे. स्मिथ ९२३ अंकासह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
फलंदाजाचे नाव अंक
विराट कोहली ९२८
स्टिव स्मिथ ९२३
केन विल्यमसन ८७७
चेतेश्वर पुजारा ७९१
डेव्हिड वॉर्नर ७६४
अजिंक्य रहाणे ७५९
ज्यो रूट ७५२
मार्नस लॅब्यूशाने ७३१
हेन्री निकोलस ७२६
गोलंदाजांच्या यादीत भारताच्या मोहम्मद शामीनं टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. ७७१ अंकासह शामी दहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सने अव्वल स्थान कायम राखलं आहे.