Current Affairs : 05 December 2020
भारतीय वंशाची संशोधक ‘टाइम’च्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’ची मानकरी
भारतीय -अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या पंधरा वर्षांच्या संशोधक मुलीस ‘टाइम’चा पहिलाच ‘किड ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तिने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत.
टाइमने पाच हजार उमेदवारांतून राव हिची निवड केली असून तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली.
दूषित पाण्यापासून अनेक समस्यांवर तिने अभिनव उत्तरे शोधली असून गप्पांमधूनही तिच्या बुद्धीची चमक प्रत्ययास आली.
‘ प्रत्येक प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा,’ असा संदेश तिने तरुणांना दिला.
‘फिक्की’च्या अध्यक्षपदी उदय शंकर यांची निवड
स्टार इंडियाचे माजी अध्यक्ष आणि वॉल्ट डिस्ने कंपनी फॉर एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष उदय शंकर यांची ‘फिक्की’च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. ते संगीता रेड्डी यांची जागा घेतील.
जागतिक आरोग्य संघटनेचा ‘जागतिक मलेरिया अहवाल 2020’
गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणाऱ्या ‘जागतिक मलेरिया अहवाल (WMR) 2020’ जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) प्रसिद्ध केला आहे. भारताने मलेरियाचा धोका कमी करण्यात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे.
मलेरियाचा प्रसार असणाऱ्या देशांपैकी भारत हा एकमेव असा देश आहे जिथे 2018 सालाच्या तुलनेत 2019 साली प्रकरणांमध्ये 17.6 टक्के घट झाली. प्रादेशिक स्तरावरील संख्येनुसारही भारतामध्ये या आजाराची रुग्णसंख्या 20 दशलक्ष ते 6 दशलक्ष अशी लक्षणीय रित्या कमी झाली आहे.
मलेरियात दगावण्याच्या प्रमाणात 92 टक्के घट झाली आहे. परिणामी ‘मिलेनियम विकास ध्येये’ मधले सहावे ध्येय (वर्ष 2000 ते वर्ष 2019 या काळात रुग्णसंख्येत 50-75 टक्के घट) साध्य करण्यात यश आले आहे.