Current Affairs 05 June 2020
चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन
- “छोटी सी बात’, “रजनीगंधा’, “बातों बातों में’, “खट्टा-मीठा’ यांसारख्या क्लासिक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, पटकथा लेखक बासू चटर्जी यांचे निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या रूपाली गुहा या त्यांच्या कन्या.
- बासू चटर्जी यांचा 30 जानेवारी 1930 रोजी अजमेर येथे जन्म झाला.
- चटर्जी यांनी हिंदीसोबत बंगाली चित्रपटही दिग्दर्शित केले होते. त्यांचे चित्रपट अधिक वास्तववादी समजले जात.
- 70च्या दशकात ऍक्शन चित्रपटांचे युग असताना बासू चटर्जी यांचे चित्रपट सर्वार्थाने वेगळे ठरले. दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांनी “छोटी सी बात’, “रजनीगंधा’ आणि “चितचोर’ यासारख्या चित्रपटांचे सोने केले. “एक रुका हुआ फैसला’, “चमेली की शादी’, “छोटी सी बात’, “रजनीगंधा’, “बातों बातों में’, “मनपसंद’, “हमारी बहु अलका’, “उस पार’, “प्यार का घर’ अशा अनेकविध चित्रपटांचे बासू चॅटर्जी यांनी दिग्दर्शन केले होते.
- दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बासू चटर्जी यांनी “व्योमकेश बक्षी’ आणि “रजनी’ या दोन हिट टीव्ही मालिकाही केल्या. 1992 मध्ये त्यांना “दुर्गा’ या चित्रपटासाठी कौटुंबिक कल्याण विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सात फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाचे मिलिट्री बेस वापरणार भारत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक केली.
- तर या बैठकीत दोन्ही देशांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत दोन्ही देशांना एकमेकांचे सैन्य तळ वापरता येणार आहेत.
- तसेच “हा करार म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीचे नवे मॉडेल आहे,” असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारानंतर केला.
- याबैठकीतदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. तसंच यावेळी आरोग्य सेवा, व्यवसाय आणि संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर दोन्ही देशांच्य पंतप्रधानांनी चर्चा केली.
- नव्या करारानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांची लढाऊ जहाजं आणि लढाऊ विमानं एकमेकांच्या सैन्य तळांचा वापर करू शकणार आहेत. तसंच गरज भासल्यास त्यांना इंधनाचा पुरवठादेखील केला जाणार आहे.
- हिंद महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप पाहता तो रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र आल्याचं म्हटलं जात आहे. भारतानं अमेरिकेसोबतही असाच एक करार केला आहे.
सायकल दिनी अॅटलस फॅक्टरी बंद
- अॅटलस सायकल तयार करणारी प्रसिद्ध कंपनी आर्थिक संकटात आहे. जागतिक सायकल दिनी एकीकडे लोक सायकल चालवण्यासाठी प्रमोशन करत असताना गाजियाबादमध्ये सायकलच्या फॅक्टरीला कुलूप ठोकलं आहे. येथे काम करणारे हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार झाले आहेत.
‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ स्थापन करण्यास मंजुरी
दिनांक 3 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ (Pharmacopoeia Commission for Indian Medicine and Homoeopathy -PCIM&H) याची पुनःस्थापना करण्याला मंजूरी दिली गेली आहे.
आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांच्या परिणामांविषयी प्रमाणीकरण करून प्रभावी पद्धतीने त्यांचे नियमन व गुणवत्तेवर नियंत्रण असा उद्देश या निर्णयामागे ठेवण्यात आला आहे.
‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ स्थापन करण्यास मंजुरी
- दिनांक 3 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ (Pharmacopoeia Commission for Indian Medicine and Homoeopathy -PCIM&H) याची पुनःस्थापना करण्याला मंजूरी दिली गेली आहे.
- आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांच्या परिणामांविषयी प्रमाणीकरण करून प्रभावी पद्धतीने त्यांचे नियमन व गुणवत्तेवर नियंत्रण असा उद्देश या निर्णयामागे ठेवण्यात आला आहे.
जगातील सर्वात मोठं कडीपत्त्याचं झाड; भारतीय शेतकऱ्याचं नाव गिनीज बुकात
- संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करत असताना उत्तराखंडमधल्या एका प्रतीशील शेतकऱ्यानं वेगळीच कमाल केली आहे. त्याबद्दल त्याच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे.
- उत्तराखंडच्या अल्मोडामधल्या ताडीखेत विकासखंड इथे राहणाऱ्या गोपाल दत्त उप्रेती यांनी लावलेल्या कडीपत्त्याची झाडाची उंची २.१६ मीटरवर (७ फूट १ इंच) पोहोचली आहे. याआधी जर्मनीतल्या एका व्यक्तीनं लावलेलं कडीपत्त्याचं झाड १.८० मीटरपर्यंत (सहा फूट) वाढलं होतं.