चालू घडामोडी : ०५ सप्टेंबर २०२०
Current Affairs : 05 September 2020
रिलायन्स जिओ – ब्रुकफिल्डच्या २५ हजार कोटींच्या व्यवहारास सरकारची मंजुरी
रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) २५,२१५ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे.
पीटीआयनं हे वृत्त दिलं असून टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या माध्यमातून रिलायन्स जिओ इन्फ्राटेल ताब्यात घेण्यास दूरसंचार खात्यानं ब्रुकफिल्डला मंजुरी दिल्याची माहिती आहे.
ब्रुकफिल्ड ही कॅनडास्थित कंपनी असून देशभरातील १.३५ लाख मोबाइल टॉवर्सची विक्री या माध्यमातून होत असल्याचे वृत्त आहे.
मुकेश अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्म्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगामध्ये याआधीही सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली होती.
ईशा, आकाश अंबानी यांना फॉर्च्युनच्या ‘४० अंडर ४०’ यादीत स्थान
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचं नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामिल करण्यात आलं आहे.
आता त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांना फॉर्च्युनच्या ‘४० अंडर ४०’ या यादीत स्थान देण्यात आलं आहे.
वित्त, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, राजकारण आणि माध्यमं व मनोरंजन या विभागातील फॉर्च्युन यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक यादीत जगभरातील ४० जणांच्या ज्यांचं वय ४० वर्षांपेक्षा कमी आहे अशा नावाचा समावेश करण्यात आला आहे.
ईशा आणि आकाश अंबानी यांचं नाव तंत्रज्ञान या विभागाच्या यादीत सामिल करण्यात आलं आहे. तर बायजूचे फाऊंडर बायजू रविंदरन यांनादेखील या फॉर्च्युनच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.
या दोघांनीच फेसबुकसोबत ९.९९ टक्के हिस्सा विकत ५.७ अब्ज डॉलर्सची मेगा डिलही पूर्ण केली.