Current Affairs 06 April 2020
Coronavirus : जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी आढळला
जगभरातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी अमेरिकेत आढळला आहे. न्यूयॉर्क येथील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, मानसांसह आता प्राण्यांमध्येही कोरोनाच धोका निर्माण झाला आहे.
चीनमधील वुहान शहरातूनच डिसेंबर 2019मध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण समोर आला होता, असे अमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे. मात्र, आता फक्त माणसांनाच नाही तर न्यूयॉर्कमध्ये प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. न्यूयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातील वाघिण कोरोना पॉझिटिव्ह आहे. नॅशनल जॅग्रॉफीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात वाघिण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेच्या विभागानुसार प्राण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही पहिली घटना आहे. ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, कोरोना प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यामुळे 4 वर्षाच्या या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्याला आधीपासूनच कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि वाघ त्याच्या संपर्कात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटीव्ह झाला. या वाघिणीचं नाव नाडिया असून गेल्या १६ मार्चपासून हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या वाघिणीच्या संसर्गातून पर्यटकांना लागण झाल्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, आता प्राण्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.
टपाल विभागाचा अनाेखा पुढाकार; ‘पोस्ट ऑफिस ऑन व्हील’ चा प्रारंभ
काेराेनाव्हायरसशी लढण्यासाठी सध्या देशात सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये लाेकांना टपाल सेवा मिळवण्यासाठी काेणतीही अडचण येऊ नये यासाठी टपाल विभागाने पुढाकार घेतला अाहे. उत्तर प्रदेशातल्या टपाल विभागाने लखनऊ मध्ये ‘पाेस्ट अाॅफिस अाॅन व्हिल’ ही अनाेखी माेहीम हाती घेतली अाहे. उत्तर प्रदेश परिमंडळाचे मुख्य पाेस्ट मासि्तर जनरल काैशलेंद्र सिन्हा यांनी या माेहीमेला हिरवा झेंडा दाखवला. लाॅकडाऊनच्या काळात टपाल कार्यालयात सर्व अावश्यक सेवा सुरू ठेवण्यात अाल्या अाहेत. अशामध्ये टपाल सेवा लाेकापर्यंत पाेहचवणे ही अामची जबाबदारी अाहे. ही सुविधा लखनऊ व्यतिरिक्त अाग्रा, बरेली व कानपूरमध्ये सुरू करण्यात अाली अाहे.