Current Affairs 06 August 2020
मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल
- जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- जीसी मूर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- बुधवारी संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झालं.
- मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचं सांगण्यात येतं. तसंच राज्यात दहशतवाद आणि दगडफेकीसारख्या घटनांमध्येही घट झाली आहे.
राम मंदिर भूमिपूजन: २२ किलो वजनाची चांदीची वीट ठेवून रचला जाणार पाया
- अयोध्येतील प्रभू राम मंदिराचं भूमिपूजन आज दुपारी १२.३० च्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी २२ किलो ६०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला गेला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन केलं गेल आहे.
- एवढंच नाही तर भूमिपूजन करण्यासाठी देशातल्या पवित्र नद्यांचं पाणीही गेलंआहे. तसंच पवित्र मातीही आणली गेली आहे.
आसामची स्वतंत्र दूरदर्शन वाहिनी सुरू
- आसाम राज्यासाठी दूरदर्शन आसाम या 24 तास समर्पित वाहिनीचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
- ही वाहिनी आसामच्या लोकांसाठी एक भेट असून ही वाहिनी आसाममधल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचेल आणि ती खूप लोकप्रिय होईल
- इतर राज्यांच्या वाहिन्या डीडी फ्री डिशवर उपलब्ध आहेत. यावेळी त्यांनी दूरदर्शनच्या सहा राष्ट्रीय वाहिन्यांवरील कार्यक्रमांची प्रशंसा केली. ही वाहिनी आसामच्या सर्व क्षेत्रातील विकासाला चालना देईल आणि त्याचवेळी सरकारच्या उपक्रम आणि कार्यक्रमांना तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत करेल, असे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.
- प्रसारभारतीची डीडी ईशान्य भारत वाहिनी, ही चोवीस तास चालणारी संमिश्र वाहिनी आठही राज्यांसाठी, 1 नोव्हेंबर 1990 साली सुरू करण्यात आली होती. 27 डिसेंबर 2000 पासून ही वाहिनी 24 तास सुरू करण्यात आली आहे.
- सध्याच्या कोविड संकटात, तात्पुरती उपाययोजना म्हणून ईशान्य भारतातील सर्व वाहिन्यांचे अपलिंकिंग केले जात आहे. एप्रिल 2020 पासून डीडी नागालॅंड, डीडी त्रिपुरा, डीडी
श्री रामाच्या नावाचे चलन अमेरिका आणि नेदरलँडमध्ये वापरले जाते
- अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाला सुरूवात होत आहे. यामुळे अयोध्येचा विकास होईल, धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आदी गोष्टींची चर्चा होत असताना अमेरिका आणि नेदरलँड या देशात श्री रामाचे चलन वापरले जाते.
- अमेरिका आणि नेदरलँडमध्ये श्री रामाचे नाव असेलल्या चलनी नोटा आहेत. या नोटांवर रामाचा फोट देखील आहे.
- अमेरिकेतील आयोवा राज्यातील महर्षी वेदिक सिटीमधील द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस नावाची या संस्थेने हे चलन २००२ साली वाटले होते.
- आयोवा राज्यात अमेरिकन इंडियन समुदायाचे लोक राहतात. या सोसायटीतील लोक महर्षी महेश योगी यांना मानतात. महर्षी वेदिक सिटीतील लोक कामांच्या बदल्यात या नोटेचा वापर करतात. २००२ साली त्यांनी द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस नावाच्या एका संस्थेच्या माध्यमातून या नोटी छापण्यात आल्या आणि समर्थकांमध्ये वाटल्या. अर्थात या नोटेला अधिकृत मान्यता दिलेली नाही. पण या दोन्ही देशात एका विशिष्ट गटात त्याचा वापर केला जातो.